शहरं
Join us  
Trending Stories
1
छुप्या युतीचा पर्दाफाश? इराणचे सॅटेलाइटच्या मदतीनं अमेरिकन ठिकाणांवर हल्ले! या देशानं केला मोठा खेला?
2
CBSE 10th Result 2026: CBSE १० वी बोर्डाच्या परीक्षेचा निकाल जाहीर; 'असा' पाहा रिझल्ट
3
चीनचा टँकर होर्मुझमधून बाहेर पडण्यासाठी निघाला, अमेरिकेच्या युद्धनौका पाहताच माघारी फिरला...
4
"मला पक्षात पद..."; उद्धवसेनेचे कार्याध्यक्ष होण्याच्या चर्चांवर आदित्य ठाकरेंची सूचक पोस्ट
5
Latest Marathi News LIVE Updates: "धारावीकरांना हुसकावून लावण्यासाठी ९५ टक्क्यांपेक्षा जास्त...", काँग्रेस खासदारांचा गंभीर आरोप
6
Share Market Update: ₹९ लाख कोटींची लॉटरी! ट्रम्प यांच्या वक्तव्यानंतर शेअर बाजारात तेजी; Sensex १२६४ अंकांनी वधारला
7
कोण आहे 'ही' महिला पत्रकार जिला खुद्द अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी कॉल केला? म्हणाले.. 
8
आभासी दुनियेतील गर्लफ्रेंडनं दिला धोका; AI च्या प्रेमात युवकानं उचललं टोकाचं पाऊल, काय घडलं?
9
अमेरिकन नौदलाला इराणचा खुलं आव्हान! डोळ्यांदेखत टँकरने ओलांडली 'होर्मुझ'; ट्रम्प यांचे सैन्य पाहतच राहिले
10
याला म्हणतात नशीब! ९ नेते दुसऱ्या पक्षांमधून भाजपात आले; काही मुख्यमंत्री, काही उपमुख्यमंत्री बनले
11
५९१ कोटींचा तोटा; ३१ पैकी ८ विभाग नफ्यात, STचा तोटा कमी करण्यासाठी उपाययोजना करायचे निर्देश
12
कधी राहुल गांधी, कधी खर्गे, आता सिद्धरामय्या! काँग्रेसच्या मुख्यमंत्र्यांच्या कानात काय बोलले मोदी? 'तो' फोटो देशभर व्हायरल!
13
Vastu Shastra: घरात सुख-समृद्धी हवी आहे? मग एकदा भिंतीवरची चित्र बदलून पाहाच!
14
हायप्रेशर स्टील ट्यूब फुटली अन् क्षणात होत्याचं नव्हतं झालं; ७०० डिग्री वाफेने वेढलं अन् १७ जणांचा कोळसा झाला
15
पाकिस्ताननं पाठवले १३००० सैनिक; आता सौदीने दिले ३ अब्ज डॉलर, एका सैनिकाची किंमत किती?
16
IPL 2026: MS Dhoni च्या चाहत्यांची धाकधूक वाढली... १६ एप्रिलला 'थाला' मोठा निर्णय घेणार!
17
"उबाठा गट ताब्यात घेण्याचे संजय राऊतांचे प्रयत्न, आदित्य ठाकरेंशी 'सामना"; भाजपा नेत्याचा दावा
18
२०२६चा पहिला गुरुपुष्यामृत योग कधी? ‘इतके’ तास आहे शुभ मुहूर्त; पाहा, महत्त्व अन् मान्यता
19
खळबळजनक! ओडिशातील सरकारी शाळेत अन्नातून विषबाधा; १०० विद्यार्थी आजारी, एकाचा मृत्यू
20
कानपूर किडनी रॅकेटचा असा झाला पर्दाफाश, गर्लफ्रेंडची एक चूक नडली अन् पकडला गेला गुन्हेगार!
Daily Top 2Weekly Top 5

रिओ आॅलिम्पिकच्या खराब कामगिरीची चौकशी सुरू

By admin | Updated: September 9, 2016 00:12 IST

क्रीडा मंत्रालयाने रिओ आॅलिम्पिकमध्ये भारताच्या निराशाजनक कामगिरीची ‘संपूर्ण समीक्षा’ सुरू केली

नवी दिल्ली : क्रीडा मंत्रालयाने रिओ आॅलिम्पिकमध्ये भारताच्या निराशाजनक कामगिरीची ‘संपूर्ण समीक्षा’ सुरू केली असून, त्यांनी या खेळाच्या महाकुंभात सहभागी होणाऱ्या खेळाडूंकडून त्यांची प्रतिक्रिया आणि सूचनाही मागितल्या आहेत.गेल्या महिन्यात दोन आठवडे चालणाऱ्या या महाकुंभात भारताची कामगिरी निराशाजनक ठरली होती. भारतातर्फे फक्त पी. व्ही. सिंधूने बॅडमिंटनमध्ये रौप्य आणि साक्षी मलिकने कुस्तीत कांस्यपदक जिंकले होते. क्रीडा मंत्रालयाने त्यांच्या निवेदनात म्हटले, की क्रीडामंत्री विजय गोयल यांनी क्रीडा मंत्रालयांतर्गत भारताच्या रिओ आॅलिम्पिक २०१६ मधील कामगिरीची संपूर्ण समीक्षा करण्याचा निर्णय घेतला. क्रीडामंत्र्यांनी रिओ आॅलिम्पिकमध्ये सहभागी होणाऱ्या प्रत्येक खेळाडूला वैयक्तिकपणे पत्र लिहिले असून, त्यांच्याकडून प्रतिक्रिया आणि सूचना मागितल्या आहेत. खेळाडू कधीही वैयक्तिक अथवा मेलद्वारे आपल्या सूचना अथवा प्रतिक्रिया व्यक्त करू शकतात, असेही त्यांनी कळवले आहे. या पत्रात क्रीडामंत्र्यांनी कामगिरी सुधारण्यावर भर दिला आहे. ज्यामुळे जागतिक पातळीवर खेळाडूंचा एक गट बनवला जाऊ शकेल आणि मूलभूत सुविधांना आणखी मजबूत केल्या जाऊ शकतील. रिओ आॅलिम्पिकनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी याआधी आगामी तीन आॅलिम्पिक लक्षात घेऊन एक ‘टास्क फोर्स’ स्थापन करण्याची घोषणादेखील केली होती.गोयल यांच्या विभागाने निवेदनात लिहिले, ‘मंत्रालयाने भारतीय आॅलिम्पिक संघटनेलादेखील रिओ आॅलिम्पिकमध्ये भारताच्या कामगिरीच्या प्रतिक्रिया आणि भविष्यात कामगिरी उंचावण्यासाठी पावले उचलण्याविषयी माहिती देण्यास कळवले आहे. अशा प्रकारच्या प्रतिक्रिया राष्ट्रीय क्रीडा महासंघाकडूनही मागविण्यात येणार आहेत. क्रीडामंत्री याविषयी आयओए आणि राष्ट्रीय क्रीडा महासंघाशी विस्तृत चर्चेसाठी बैठकही बोलावणार आहेत.’चौकशीसाठी मंत्रालयाचे काही अधिकारी साईच्या काही केंद्रांचा दौरादेखील करणार आहेत. ‘मंत्री काही अ‍ॅकॅडमी आणि साई केंद्राचादेखील दौरा करणार आहेत. ज्यामुळे खेळाडूंना ट्रेनिंगसाठी सुविधा उपलब्ध करून दिल्या जातील आणि त्यांच्या कामगिरीतील सुधारणेची माहिती मिळू शकेल. या महिन्याच्या १७ तारखेला ते हैदराबाद येथे गोपीचंद बॅडमिंटन अ‍ॅकॅडमीचा दौरा करणार आहेत. जेथे ते खेळाडू, प्रशिक्षक आणि अन्य स्टाफशी चर्चा करतील. ते हैदराबाद येथील ‘साई’ केंद्राचादेखील दौरा करणार आहेत.’