मिस्टर आशियाई स्पर्धेत भारताच्या विजय आणि मंगला यांची बाजी

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 3, 2019 18:38 IST2019-02-03T18:37:54+5:302019-02-03T18:38:45+5:30

मिस आशिया या स्पर्धेत भारताच्या मंगला सेनने सुवर्णपदकाला गवसणी घातली. 

India's Vijay and Mangala win in Mr Asia 2019 Bodybuilding and Fitness championships | मिस्टर आशियाई स्पर्धेत भारताच्या विजय आणि मंगला यांची बाजी

मिस्टर आशियाई स्पर्धेत भारताच्या विजय आणि मंगला यांची बाजी

मुंबई : आंतरराष्ट्रीय शरीरसौष्ठव महासंघाच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या मिस्टर आशियाई स्पर्धेत भारताच्या विजय भोयरने बाजी मारली. त्याचबरोबर मिस आशिया या स्पर्धेतही भारताच्या मंगला सेनने सुवर्णपदकाला गवसणी घातली. 

नवी दिल्ली येथी तालकटोरा इंडोर स्टेडियममध्ये मिस्टर आशिया बॉडीबिल्डींग आणि फिटनेस अजिंक्यपद स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या भारतासह श्रीलंका, बांगलादेश, भुतान, नेपाळ या देशांचा समावेश होता. या स्पर्धेच्या अंतिम फेरीत एकूण 94 शरीरसौष्ठवपटूंना प्रवेश देण्यात आला होता. भारतीय शरीरसौष्ठव महासंघाचे महासचिव सुरेश कदम यांनी विजेत्यांना पारितोषिक दिले.

Web Title: India's Vijay and Mangala win in Mr Asia 2019 Bodybuilding and Fitness championships