Lalit Upadhyay: भारतासाठी दोन ऑलिम्पिक पदक जिंकणाऱ्या खेळाडूची तडकाफडकी निवृत्ती!
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 23, 2025 11:27 IST2025-06-23T11:24:43+5:302025-06-23T11:27:26+5:30
Lalit Upadhyay Announces Retirement: चमकदार कारकिर्दीनंतर ऑलिंपिक पदक विजेता ललित कुमार उपाध्याय याने आंतरराष्ट्रीय हॉकीमधून निवृत्तीची घोषणा केली.

Lalit Upadhyay: भारतासाठी दोन ऑलिम्पिक पदक जिंकणाऱ्या खेळाडूची तडकाफडकी निवृत्ती!
भारतीय आंतरराष्ट्रीय हॉकी खेळाडू ललित उपाध्याय याने आंतरराष्ट्रीय हॉकीमधून निवृत्तीची घोषणा केली. ललित उपाध्यायने रविवारी (२२ जून २०२५) रात्री त्यांच्या सोशल मिडियाच्या माध्यमातून निवृत्तीची माहिती दिली. उपाध्याय यांनी टोकियो २०२० आणि पॅरिस २०२४ मध्ये दोन ऐतिहासिक ऑलिंपिक कांस्यपदके जिंकली.
Today, I announce my retirement from international hockey.
— Lalit Upadhyay (@lalithockey) June 22, 2025
It’s a tough moment, but one every athlete must face one day.
It has been the greatest honour and pride of my life to represent our country 🇮🇳🙏
Thank you for everything. 🙏 @HockeyIndiaLeag@TheHockeyIndiapic.twitter.com/OcryhKsYxQ
निवृत्तीची घोषणा करताना ललित उपाध्याय याने एक्सवर पोस्ट केली, ज्यात त्याने म्हटले की, "आज, मी आंतरराष्ट्रीय हॉकीमधून निवृत्ती जाहीर करतो. हा एक कठीण क्षण आहे. परंतु, प्रत्येक खेळाडूला एके दिवशी या कठीण क्षणाचा सामना करावाच लागतो. आपल्या देशाचे प्रतिनिधित्व करणे हा माझ्या आयुष्यातील सर्वात मोठा सन्मान आणि अभिमान होता. सर्व गोष्टींसाठी धन्यवाद"
दरम्यान २०२० च्या टोकियो ऑलिंपिकमध्ये देशासाठी कांस्यपदक जिंकणाऱ्या भारतीय हॉकी संघात ललितने फॉरवर्ड खेळाडूची भूमिका बजावली. कांस्यपदक जिंकल्यानंतर सरकारने त्याला क्रीडा क्षेत्रातील सर्वोच्च सन्मान अर्जुन पुरस्कारानेही सन्मानित केले. ललित हा वाराणसीच्या शिवपूर गावातील भगतपूरचा रहिवासी आहे आणि त्याने शेकडो आंतरराष्ट्रीय सामने खेळले. त्याला २०१७ मध्ये लक्ष्मण पुरस्कार आणि २०२१ मध्ये अर्जुन पुरस्कार मिळाला आहे. २०२० नंतर, २०२४ च्या ऑलिंपिकमध्येही ललित भारतीय हॉकी संघाचा भाग होता. या ऑलिंपिकमध्येही भारतीय हॉकी संघाला कांस्यपदक मिळाले.
ऑलिंपिक पदक विजेता ललित उपाध्याय याने आंतरराष्ट्रीय हॉकीमध्ये आपला ठसा उमटवला. त्याची उत्तर प्रदेशात पोलीस उपअधीक्षक म्हणूनही नियुक्ती झाली. २०२० च्या ऑलिंपिकमध्ये कांस्यपदक विजेत्या भारतीय हॉकी संघाचा भाग असलेल्या ललित याला २०२२ मध्ये मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी नियुक्ती पत्र देऊन डीएसपी बनवले. याआधी त्याने ओएसडीची ऑफर नाकारली आणि दुसऱ्यांदा त्यांना पोलीस उपअधीक्षक म्हणून नियुक्त करण्यात आले. ज्यावेळी त्याने ओएसडी पद नाकारले, तेव्हा त्यांनी सांगितले होते की, मी बीपीसीएलमध्ये व्यवस्थापक म्हणून काम करत आहे, म्हणून त्यांनी ओएसडी पद नाकारले. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी त्याच्यावर डीएसपी पदाची जबाबदारी सोपवली.