शहरं
Join us  
Trending Stories
1
"इराण तुम्हाला दोन मिनिटात उद्ध्वस्त करेल", अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प इटलीच्या पंतप्रधान मेलोनींवर भडकले 
2
IPL 2026 : चुकांवर चुका! तरीही CSK नं मारली बाजी; KKR च्या विजयाची पाटी अजूनही कोरीच
3
१८ अश्लील व्हिडीओ, ३९ फोटो आणि ८ तरुणींची पटली ओळख; अमरावतीत अयान अहमदसह साथीदाराने कळस गाठला
4
होर्मुझवरुन इराणसोबत तणाव वाढला! पंतप्रधान मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात ४० मिनिटे चर्चा
5
नूरचं अनोख सेलिब्रेशन! अजिंक्य रहाणे पाठोपाठ IPL मधील महागड्या खेळाडूला स्वस्तात तंबूत धाडले; अन्....
6
'राज्य सरकारचा निर्णय एकतर्फी, लोकशाहीविरोधी', बाजार समिती संचालक मंडळ बरखास्तीवर जयंत पाटील संतापले
7
सरसंघचालक भागवत यांनी घेतली माजी सरन्यायाधीश शरद बोबडे यांची सदिच्छा भेट
8
युद्धाचा मोठा फटका! इराणचं २७० अब्ज डॉलर्सचं नुकसान; या ५ आखाती देशांकडे मागितली भरपाई
9
लोकसभेतील खासदारांची संख्या ८५० पर्यंत वाढणार, महाराष्ट्रातून किती निवडून जाणार? केंद्राने तयार केला मसुदा
10
षटकार खाल्ला, मग Kartik Tyagi नं १४८.१ kmph वेगासह त्रिफळा उडवत घेतला Sanju Samson चा बदला
11
डीआरआयचे 'सिमोल्लंघन'; कोकेन प्रकरणात दिल्ली, बेंगळुरू आणि हैदराबादवर नजर, तस्करांविरुद्ध जोरदार आघाडी
12
मध्य पूर्वेतील तणाव : इटलीचा इस्रायलला मोठा दणका! पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी सर्व संरक्षण करार रोखले
13
शेतकऱ्याने मृत्युला कवटाळले, पोस्टमार्टमसाठी नातेवाईक दोन तास ताटकळले; बीड जिल्ह्यातील घटना
14
CSK साठी डोकेदुखी ठरतोय Ruturaj Gaikwad चा खराब फॉर्म; कमबॅक करण्यासाठी आता एकच मार्ग उरला
15
7 वर्षांपासून बेपत्ता! 10 हजार डॉलर्सचे बक्षीस, 'या' भारतीय विद्यार्थिनीला FBI का शोधतेय? जाणून घ्या...
16
पेट्रोल १८ तर डिझेल ३५ रुपयांनी महागणार?; ५ राज्यांच्या निवडणुकीनंतर दर वाढण्याची शक्यता
17
"मी आंबेडकरांची फॅन आहे", चिन्मयी सुमीतनं स्पष्टच सांगितलेलं 'जय भीम' म्हणण्यामागचं कारण
18
छत्तीसगडमधील वेदांता पॉवर प्लांटमध्ये बॉयलर स्फोटात १० जण ठार, अनेक जण जखमी
19
IPL 2026 : आधी एका रात्रीत दोन 'क्षेपणास्त्र' लॉन्च केली; आता काव्या मारनच्या SRH नं खेळला नवा डाव
20
आरजेडी-जेडीयूमध्ये पंख विस्तारले, भाजपामध्ये येऊन बनले मुख्यमंत्री; कोण आहेत सम्राट चौधरी?
Daily Top 2Weekly Top 5

भारताचे दुसरे ‘सुवर्ण यश’

By admin | Updated: September 15, 2016 01:01 IST

झाझरियाने भालाफेकीमध्ये एफ ४६ प्रकारांत जागतिक विक्रमासाह सुवर्णपदक पटकावताना देशाला या स्पर्धेत दुसरे सुवर्ण मिळवून दिले.

रिओ : रिओ पॅरालिम्पिक स्पर्धेत भारतीय खेळाडू सलग चमकदार कामगिरी करीत असताना देवेंद्न झाझरियाने भालाफेकीमध्ये एफ ४६ प्रकारांत जागतिक विक्रमासाह सुवर्णपदक पटकावताना देशाला या स्पर्धेत दुसरे सुवर्ण मिळवून दिले. विशेष म्हणजे याआधी २००४ अथेन्स पॅरालिम्पिकमध्येही देवेंद्रने सुवर्ण कमाई केली होती. तसेच, पॅरालिम्पिकमध्ये दोन वैयक्तिक सुवर्ण पटकावणारा एकमेव भारतीय खेळाडू असा मानही देवेंद्रने मिळवला आहे.दखल घेण्याची बाब म्हणजे, देवेंद्रने आपलाच जागतिक विक्रम मागे टाकून नवीन इतिहास रचला. अथेन्स पॅरालिम्पिकमध्ये त्याने ६२.१५ मीटरची फेक करून पहिले सुवर्ण पटकावले होते. तर, आता रिओ स्पर्धेत देवेंद्रने ६३.९७ मीटरची लक्षवेधी फेक करून नवा विश्वविक्रम नोंदवला. त्याच वेळी या स्पर्धेतील अन्य भारतीय खेळाडू रिंकू हुड्डा यानेही सर्वोत्तम वैयक्तिक कामगिरी करताना ५४.३९ मीटरची फेक केली. परंतु, त्याला पाचव्या स्थानावर समाधान मानावे लागले. विविध आंतरराष्ट्रीय स्पर्धांत भारतासाठी अभिमानास्पद कामगिरी केलेल्या देवेंद्रने पॅराअ‍ॅथलिट म्हणून देशात मानाचे स्थान मिळवले आहे. देवेंद्रचा २००४ साली अर्जुन पुरस्कार, तर २०१२ साली पद्मश्री पुरस्काराने भारत सरकारने गौरव केला आहे. विशेष म्हणजे असा सन्मान मिळवणारा देवेंद्र पहिला पॅराअ‍ॅथलिट आहे. तसेच, २०१३ साली लियोन येथे आंतरराष्ट्रीय पॅरालिम्पिक समितीच्या वतीने झालेल्या जागतिक अ‍ॅथलेटिक्स अजिंक्यपद स्पर्धेतही देवेंद्रने भारताला ‘सुवर्ण’ यश मिळवून दिले होते. दुसरीकडे, देवेंद्रच्या झंझावातापुढे जागतिक क्रमवारीत अव्वल असलेला चिनी खेळाडू गुओ चुनलियांगचा काहीच निभाव लागला नाही. त्याला ५९.९३ मीटरच्या फेकीसह रौप्यपदकावर समाधान मानावे लागले. तर, श्रीलंकेच्या हेराथ मुदियानसेलागे याने ५८.२३ मीटरची चमकदार फेक करताना कांस्यपदकावर नाव कोरले.त्याचप्रमाणे, देवेंद्रव्यतिरिक्त या स्पर्धेत रिंकू हुड्डा आणि सुंदर सिंग यांच्यावरही भारताची मदार होती. रिंकूने आपल्या सहा संधींमध्ये वैयक्तिक सर्वोत्तम कामगिरी करताना ५४.३९ मीटरची फेक केली. परंतु त्याची कामगिरी पाचव्या क्रमांकावर राहिली. त्याच वेळी स्पर्धेत ऐन वेळी वेळेवर न पोहोचल्याने सुंदर स्पर्धेसाठी अवैध ठरला. (वृत्तसंस्था)देवेंद्रचे अभिनंदन. त्याने आपलाच विक्रम मागे टाकून सुवर्ण कामगिरी केली. - सचिन पायलट, अध्यक्ष, राजस्थान प्रदेशदेवेंद्र झझारियाचे सुवर्ण व नव्या विश्वविक्रमासाठी अभिनंदन. हे यश खूप प्रेरणादायी आहे. आशा आहे, की २००४ च्या यशाच्या तुलनेत या वेळी जास्त प्रसिद्धी मिळेल. - मोहम्मद कैफ, क्रिकेटपटूदेवेंद्र झझारियाला खूप खूप शुभेच्छा. तू आम्हा सर्वांना प्रेरित करतोस.- अभिनव बिंद्रा, माजी नेमबाजपॅरालिम्पिक आता ‘प्यारालिम्पिक’ झाले आहे. सुवर्ण आणि नव्या विश्वविक्रमासाठी देवेंद्रला सलाम. त्याने २००४ सालीदेखील सुवर्ण जिंकले होते.- वीरेंद्र सेहवाग, माजी क्रिकेटपटूअभिनंदन, देवेंद्र झझारिया. पॅरालिम्पिक अनेकांना प्रेरणा देत आहे. तुझ्या प्रयत्नांना सलाम.- राज्यवर्धनसिंग राठोड, निशानेबाजस्वत:चाच विश्वविक्रम मोडण्यासाठी आणि देशाला गौरवान्वित करण्यासाठी देवेंद्र झझारियाला शुभेच्छा.- रोहन बोपन्ना, टेनिसपटू जागतिक क्रमवारीत तिसऱ्या स्थानी असलेल्या देवेंद्रच्या सुवर्ण कामगिरीनंतर भारत रिओ पॅरालिम्पिक पदक तालिकेत चौथ्या स्थानी पोहोचला आहे. भारताच्या खात्यामध्ये आता दोन सुवर्ण आणि प्रत्येकी एक रौप्य व कांस्य अशी एकूण ४ पदकांची नोंद आहे.राजस्थानचे क्रीडामंत्री गजेंद्रसिंग खिवसर यांनी देवेंद्रला ७५ लाख रोख रुपये, जयपूरमध्ये २२० मीटरचा प्लॉट आणि इंदिरा गांधी निहर योजना क्षेत्रात २५ बिघा जमीन देण्याची घोषणा केली.