शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारच्या राजकारणात नवं समीकरण! भाजपाला पहिल्यांदाच मुख्यमंत्रिपद; सम्राट चौधरी घेणार शपथ, निशांत कुमार उपमुख्यमंत्री
2
दक्षिण चीन सागरात १७ हजार सैनिक का जमले?; चीनच्या वर्चस्वाला थेट आव्हान देण्याची ७ देशांची तयारी
3
तारीख ठरली...! सर्वात मोठी अट इराणला मान्य? 'पीस टॉक-२' संदर्भात अमेरिकेची मोठी घोषणा
4
होर्मुझच्या नाकेबंदीत अमेरिकेची झाली फजिती; मेथेनॉल घेऊन चीनचा टँकर सुरक्षित बाहेर पडला
5
पराभवांतून धडा घ्या किंवा एकटे पडून राहा! सलग तिसऱ्या पराभवानंतर कर्णधार हार्दिक संतापला
6
गेल्या ९ वर्षांपासून अक्षय्य तृतीयेला Gold देतंय जबरदस्त रिटर्न, यावेळीही इतिहासाची पुनरावृत्ती होणार का?
7
Video - १२ महिन्यांत फेडलं ८० लाखांचं कर्ज; अमेरिकेतील भारतीय तरुणीच्या कर्तृत्वाने जग अवाक
8
अमरावतीत अल्पवयीन मुलींचे अश्लील व्हिडिओ व्हायरल; १९ वर्षीय अयान अहमदला पोलिसांनी केली अटक
9
PNB मध्ये ६० महिन्यांच्या FD मध्ये ₹२,००,००० जमा केले तर किती मिळेल व्याज? पाहा कॅलक्युलेशन
10
स्मरण दिन अन् गुरुवार, सलग २ दिवस सेवा करायची सुवर्ण संधी; स्वामी महाराज शुभ तेच होईल!
11
स्वामी समर्थ पुण्यतिथी: 'स्वामी' म्हणजे नक्की कोण? 'या' शब्दाचा गर्भितार्थ तुम्हाला माहीत होता का?
12
"रस्ते आणि उड्डाणपूल म्हणजे विकास नाही"; राज ठाकरेंनी करुन दिली बाबासाहेबांच्या समग्र दृष्टीची आठवण
13
Video - नियतीचा खेळ! वैष्णोदेवीच्या दर्शनाला गेली बहीण, ५ वर्षांपूर्वी हरवलेला भाऊ 'भिकारी' म्हणून आला समोर
14
Noida Protest: हिंसक आंदोलनानंतर अखेर सरकारचा मोठा निर्णय; कामगारांना ३ हजारांची पगारवाढ
15
वैभवला शून्यावर बाद करण्याच्या १०० दिवस आधी, प्रफुल अन् पांड्या यांच्यात 'असं'च काही घडलं होतं
16
Mutual Fund मध्ये भरभरुन पैसे ओतताहेत लोक; ₹७० लाख कोटींच्या पार पोहोचलं AUM
17
Praful Hinge: प्रफुल हिंगेच्या यशाचं गुपित कळलं! वडील म्हणाले, "त्या दोन दिग्गज क्रिकेटपटूंनी माझ्या मुलाला घडवलं"
18
"शेवटचं बोलणंही होऊ शकलं नाही..."; जवळच्या मैत्रिणीच्या निधनानंतर गहिवरल्या मुमताज
19
३ व्रतांचा महासंयोग: प्रदोष-शिवरात्रि, स्वामी स्मरण दिन एकाच दिवशी; ३ उपाय करा, पुण्य मिळवा!
20
डोळ्यात मिरचीची पूड फेकली अन् ५ सेकंदात कोयत्याने केले सपासप वार; महिलेने युवकावर का केला हल्ला?
Daily Top 2Weekly Top 5

‘सॅग’वर भारताची मोहोर

By admin | Updated: February 17, 2016 02:44 IST

यजमान भारताने दक्षिण आशियाई विभागात खेळातील वर्चस्व कायम राखताना विक्रमी ३०८ पदकांसह मंगळवारी संपलेल्या १२ व्या दक्षिण आशियाई क्रीडा स्पर्धेत सर्वसाधारण विजेतेपदाचा मान मिळवला.

गुवाहाटी/शिलाँग : यजमान भारताने दक्षिण आशियाई विभागात खेळातील वर्चस्व कायम राखताना विक्रमी ३०८ पदकांसह मंगळवारी संपलेल्या १२ व्या दक्षिण आशियाई क्रीडा स्पर्धेत सर्वसाधारण विजेतेपदाचा मान मिळवला. महिला बॉक्सर्सनी तिन्ही सुवर्णपदके पटकावली, तर ज्यूदोपटूंनी अखेरच्या दिवशी दोन सुवर्ण व दोन रौप्यपदकांची कमाई केली. भारताने एकूण १८८ सुवर्ण, ९९ रौप्य व ३० कांस्यपदके पटकावली. भारताने पदकाचे त्रिशतक ओलांडले. यापूर्वी २०१० मध्ये झालेल्या स्पर्धेत भारताने ९० सुवर्णपदकांसह एकूण १७५ पदके पटकावली होती. श्रीलंका एकूण १८६ पदकांसह (२५ सुवर्ण, ६३ रौप्य, ९८ कांस्य) दुसऱ्या स्थानी राहिला. पाकिस्तानला १०६ पदकांसह (१२ सुवर्ण, ३७ रौप्य, ५७ कांस्य) तिसऱ्या स्थानावर समाधान मानावे लागले. अफगाणिस्तानने सात सुवर्णपदकांसह एकूण ३५ पदके पटकावताना चौथे स्थान मिळवले. बांगलादेशने चार सुवर्णपदकांसह एकूण ७५ पदके पटकावत पाचवे, तर नेपाळने तीन सुवर्णपदकांसह एकूण ६० पदकांची कमाई करताना सहावे स्थान पटकावले. मालदीव व भूतान यांना सुवर्णपदक पटकावता आले नाही. मालदीवने दोन रौप्यपदकांसह एकूण तीन पदके पटकावली. मालदीव सातव्या, तर एक रौप्य व १५ कांस्यपदके पटकावणारा भूतान एकूण १६ पदकांसह आठव्या स्थानी आहे. चॅम्पियनशिपच्या अखेरच्या दिवशी सर्व स्पर्धा शिलाँगमध्ये झाल्या. महिला बॉक्सर्स व ज्यूदोपटूंनी अंतिम लढती जिंकल्या. बॉक्सर्सनी सर्व १० सुवर्णपदके पटकावताना भारतासाठी ‘परफेक्ट १०’ची नोंद केली. यापूर्वी पुरुष बॉक्सर्सनी ७ सुवर्ण पदके जिंकण्याची कामगिरी केली होती, तर महिला बॉक्सर्सनी मंगळवारी क्लीन स्वीप केले. वैयक्तिक कामगिरीचा विचार करता श्रीलंके चा जलतरणपटू मॅथ्यू एबेसिंघेने चमकदार कामगिरी करीत सात सुवर्णपदके पटकावली. भारतीय नेमबाज चैन सिंगने शानदार कामगिरी केली आणि आॅलिम्पिक पदक विजेता नेमबाज गगन नारंगवर वर्चस्व गाजवले. चैनने या स्पर्धेत एकूण सहा सुवर्णपदकांवर नाव कोरले. (वृत्तसंस्था)