शहरं
Join us  
Trending Stories
1
सरकारने पहिल्याच दिवशी डाव टाकला; मनोज जरांगे बच्चू कडूंच्या शेतकरी लढ्याच्या आंदोलनात सहभागी
2
श्रेयस अय्यरची दुखापत ठरली टीम इंडियासाठी मोठा धक्का, इतके महिने तो राहणार क्रिकेटपासून दूर
3
भयावह! अण्वस्त्रांच्या चाचणी युद्धाला तोंड फुटले; रशियाचे पाहून ट्रम्पनी पेंटागॉनला आदेश दिले...
4
रॉबर्ट कियोसाकी यांनी सांगितला श्रीमंत बनण्याचा मार्ग; म्हणाले, "आपल्या भावनांवर नियंत्रण...."
5
"दाऊद इब्राहिम दहशतवादी नाही...", ममता कुलकर्णीचं अंडरवर्ल्ड डॉनवर वादग्रस्त विधान
6
सोन्याच्या वाढलेल्या दरांवर ग्रामपंचायतीने तोडगा काढला! महिलांना केवळ तीनच दागिन्यांची परवानगी, अन्यथा...
7
लाडकी बहीण योजना: २६ लाख अपात्र महिला, ४ हजार कोटींची खैरात; सरकारी तिजोरीवर मोठा आर्थिक भार
8
ऑनर किंलिंग प्रकरणात २० वर्षांची शिक्षा, तुरुंगातून सुटला, आता दोषी आरोपीचा अपघाती मृत्यू
9
स्वप्न साकार! नोकरी नाकारली अन् शेती केली; आता कमावते १ कोटी, ३० जणांना दिला रोजगार
10
तुमच्या पगारात किती महागडे घर खरेदी करावे? तज्ज्ञांनी सांगितले 'हे' ४ महत्त्वाचे नियम; EMI किती असावा?
11
२५ नोव्हेंबरला राम मंदिरात दर्शन बंद राहणार, PM मोदी अयोध्येला जाणार; ८ हजार निमंत्रणे गेली
12
पारंपरिक श्रद्धा, लोककला आणि आधुनिकतेचा संगम; ‘गोंधळ’च्या ट्रेलरने वाढवली उत्सुकता
13
तब्बल ६ वर्षांनंतर भेटले डोनाल्ड ट्रम्प अन् शी जिनपिंग; दक्षिण कोरियात चालली २ तासांची बैठक!
14
गंभीर दुखापतीनंतर श्रेयस अय्यरने पहिल्यांदाच केली सोशल मीडिया पोस्ट, दिली महत्त्वाची माहिती
15
५ दिवस अशुभाची सावली, पंचक सुरू होणार शुक्रवारी; नेमके काय करावे अन् करू नये? पाहा, ५ नियम
16
Video - बापरे! ट्रेनमध्ये पर्स चोरीला गेली, महिला संतापली; एसी कोचच्या खिडकीची काच फोडली
17
एक सेल्फी घेतला अन् विषाची बाटली तोंडाला लावली! ३ वर्षांच्या बाळाच्या आई-वडिलांनी का उचललं टोकाचं पाऊल?
18
करदात्यांना मोठा दिलासा! ITR फाईल करण्याची अंतिम मुदत वाढवली; 'ही' आहे नवीन तारीख
19
ट्रम्प यांना मोठा झटका; त्यांच्याच पक्षाचे चार सिनेटर फिरले, कॅनडावरील अतिरिक्त १०% शुल्क लावण्याचा अधिकार काढून घेतला
20
November Astro 2025: नोव्हेंबरची सुरुवात अत्यंत शुभ; आदित्य राजयोगात 'या' ८ राशींचा भाग्योदय

Asian Champions Trophy : चक दे इंडिया! भारताच्या 'नारी शक्ती'ने हॉकीत जिंकले सुवर्ण; PM मोदींकडून खास कौतुक

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 6, 2023 18:38 IST

भारताच्या महिला हॉकी संघाने आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफी हॉकी स्पर्धेचे विजेतेपद पटकावले.

नवी दिल्ली : भारताच्या महिला हॉकी संघाने आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफी हॉकी स्पर्धेचे विजेतेपद पटकावले. अंतिम सामन्यात जपानचा ४-० असा पराभव करत भारताच्या 'नारी शक्ती'ने सुवर्ण पदक जिंकले. भारताने दुसऱ्यांदा हे विजेतेपद पटकावले आहे. तत्पुर्वी, शनिवारी भारताच्या लेकींनी आशियाई क्रीडा स्पर्धेतील रौप्य पदक विजेत्या दक्षिण कोरियाचा २-० असा पराभव करत महिला आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफी हॉकी स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश केला. अंतिम फेरीत जपानचा धुव्वा उडवत भारतीय शिलेदारांनी सुवर्ण पदकाला गवसणी घातली. 

रविवारी रांचीच्या मरंग गोमके येथील जयपाल सिंग स्ट्रोटर्फ हॉकी स्टेडियमवर हा अंतिम सामना खेळवला गेला. या विजयानंतर हॉकी इंडियाने सोशल मीडियाच्या माध्यमातून सांगितले की, प्रत्येक खेळाडूला तीन लाख रुपये बक्षिस म्हणून दिले जातील. यासोबतच सपोर्ट स्टाफच्या प्रत्येक सदस्याला १.५ लाख रुपये बक्षिस म्हणून मिळणार आहेत.

भारताच्या विजयानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून सुवर्ण पदक विजेत्या 'नारी शक्ती'चे अभिनंदन केले.

भारताचा एकतर्फी विजयभारताकडून संगीता कुमारी (१७वा मिनिट), नेहा (४६वा मिनिट), लालरेमसियामी (५७वा मिनिट) आणि वंदना कटारिया (६०वा मिनिट) यांनी गोल केले. रोषणाईच्या कारणास्तव सामना ५० मिनिटे उशिरा सुरू झाला. सुरुवातीच्या क्वार्टरमध्ये भारताने चेंडूवर ताबा राखला अन् जपानी खेळाडूंना तरसावले. जपानही जोरदार प्रयत्न करत होता पण भारताची गोलरक्षक सविता पुनियाने जपानचे सर्व प्रयत्न हाणून पाडले. पहिल्या हाफच्या अखेरीस जपानला अनेदका पेनल्टी शूटआऊट मिळाले पण भारताची गोलरक्षक सवितासह सर्व संघाने पेनल्टी फेल करत गोल होण्यापासून संघाला वाचवले. भारताने तिसऱ्या क्वार्टरमध्ये दुसरा गोल केला. यानंतर लालरेमसियामी आणि वंदना कटारिया यांनी शेवटच्या क्षणी आणखी दोन गोल केले, ज्यामुळे भारताचा विजय निश्चित झाला अन् भारताने ४-० ने एकतर्फी विजय मिळवला. भारताने यापूर्वी २०१६ मध्ये सिंगापूर येथे पहिल्यांदा आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफीचा किताब जिंकला होता. तर २०१३ आणि २०२१ मध्ये हा किताब पटकावण्यात जपानला यश आले होते. 

टॅग्स :HockeyहॉकीIndiaभारतGold medalसुवर्ण पदकNarendra Modiनरेंद्र मोदी