शहरं
Join us  
Trending Stories
1
Mamata Banerjee : राजकारण तापलं! "भाजपा ५००-७०० मतांनी पुढे असेल तर..."; ममता बॅनर्जींचा कार्यकर्त्यांना आदेश
2
Delhi Vivek Vihar Fire : Video - भीषण अग्नितांडव! "...तर लोकांचा जीव वाचला असता"; प्रत्यक्षदर्शीने सांगितला थरार
3
"या नराधमाचा हा तिसरा गुन्हा, आधी दोनदा जामीन कसा मिळाला?"; सुप्रिया सुळेंचा यंत्रणेला सवाल
4
समोरासमोर आले नागा चैतन्य अन् समंथा? रिसेप्शन पार्टीला आपापल्या पार्टनरसोबत लावली हजेरी
5
Delhi Fire: दिल्लीत अग्नितांडव! एसीचा स्फोट होऊन भीषण आग, ९ जणांचा होरपळून मृत्यू
6
आजचे राशीभविष्य, ०३ मे २०२६: कुंभ, मकर राशीला भाग्याची साथ; जाणून घ्या तुमचा आजचा दिवस
7
इराणला 'टोल' दिला तर खैर नाही! अमेरिकेचा जगाला सज्जड दम, सर्व जहाज कंपन्यांवर बंदीची टांगती तलवार
8
Nasrapur Case: "अशा विकृत प्रवृत्तीच्या गुन्हेगारांवर..." नसरापूर घटनेवर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांची संतप्त प्रतिक्रिया
9
"दुनिया हिला देंगे हम!" संघर्षातही मुंबई इंडियन्सने रचला नवा इतिहास; टी-२० विश्वात असा अद्वितीय पराक्रम करणारा पहिला संघ
10
"त्या नराधमाचा एन्काऊन्टर झाला तरच मानू की हे सरकार...", नरसापूर घटनेनंतर प्रवीण तरडे संतापले, सरकाला दिला अल्टिमेटम
11
'बीएच' सिरीज नंबर घेतला, पण कर भरायला विसरले !मुंबईत वाहनधारकांना बसला लाखो रुपयांचा दंड
12
Raja Shivaji Box Office: 'राजा शिवाजी'चं बॉक्स ऑफिसवर वादळ! दुसऱ्या दिवशीही बक्कळ कमाई
13
रस्त्याच्या कामात भीषण अपघात! क्रेनचा प्लॅटफॉर्म तुटून २ कामगारांचा जागीच मृत्यू
14
भोंदू खरात बिल्डरच्या खर्चाने फिरून आला तब्बल २१ देश;नवव्या गुन्ह्यात आणखी ४ दिवसांची पोलिस कोठडी
15
होर्मुझला पर्याय काय? इराणच्या दहशतीखाली जगाची 'लाईफलाईन' अडकली
16
मोबाइलवर वाजला अचानक वॉर्निंग सायरन अन् पसरली घबराट; 'सेल ब्रॉडकास्ट अलर्ट' प्रणाली देशभरात लाँच
17
मतमोजणी कर्मचाऱ्यांच्या निवडीचा निवडणूक आयोगाला अधिकार; तृणमूल काँग्रेसच्या याचिकेवर निकाल
18
छत्तीसगड : भूसुरुंग निकामी करताना चार जवान शहीद;'माओवाद मुक्ती'च्या केंद्राच्या घोषणेला धक्का
19
भाईंदरमधील २२० एकर मिठागरांवरील केंद्राचा दावा उच्च न्यायालयाने फेटाळला; जमीन खासगी व्यक्तीची असल्याचे स्पष्टीकरण
Daily Top 2Weekly Top 5

भारतीय महिलांचे आव्हान संपुष्टात

By admin | Updated: March 28, 2016 03:30 IST

निराशाजनक प्रदर्शन कायम राहिल्याने भारताच्या महिला संघाला वेस्ट इंडीजविरुद्ध ३ धावांनी पराभव पत्करावा लागला. टी-२० विश्वचषक स्पर्धेतील हा अखेरचा साखळी सामना

मोहाली : निराशाजनक प्रदर्शन कायम राहिल्याने भारताच्या महिला संघाला वेस्ट इंडीजविरुद्ध ३ धावांनी पराभव पत्करावा लागला. टी-२० विश्वचषक स्पर्धेतील हा अखेरचा साखळी सामना गमावल्यानंतर, यजमान भारताचेही आव्हान संपुष्टात आले आहे. गोलंदाजांनी चमकदार कामगिरी केल्यानंतर, फलंदाजांनी नांगी टाकल्याने भारताला पराभवाचे तोंड पाहावे लागले.पंजाब क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात भारताने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारले. वेस्ट इंडीजच्या डिंड्रा डॉट्टीन हिने निर्णायक अष्टपैलू खेळ करताना भारताला गाशा गुंडाळण्यास भाग पाडले. प्रथम फलंदाजी करताना वेस्ट इंडीजचा डाव २० षटकांत ८ बाद ११४ असा मर्यादित धावसंख्येत रोखण्यात भारताला यश आले. हरमनप्रीत कौर (४/२३) आणि अनुजा पाटील (३/१६) यांनी टिच्चून मारा करताना विंडीजला रोखले. त्याचवेळी सलामीवीर व कर्णधार स्टेफनी टेलर (४५ चेंडूंत ४७) आणि डिंड्रा (४० चेंडंूत ४५) यांनी केलेल्या फटकेबाजीमुळे विंडीजला शतकी मजल मारता आली. या दोघींव्यतिरीक्त इतर कोणालाही दुहेरी धावसंख्या गाठण्यात यश आले नाही.यानंतर छोट्या धावसंख्येचा पाठलाग करताना भारताचा डाव ९ बाद १११ धावांमध्ये रोखून विंडीजने रोमांचक बाजी मारली. डिंड्राने (३/१६) गोलंदाजीतही चमक दाखवताना तिघींना बाद करून भारताला जखडवून ठेवले. अ‍ॅफी फ्लेचरनेही (२/१५) चांगला मारा केला. भारताची कर्णधार मिताली राज डावातील पहिल्याच चेंडूवर झेलबाद झाली. त्या धक्क्यातून भारतीय अखेरपर्यंत सावरलेच नाही. स्मृती मानधना (२२), अनुजा पाटील (२६) आणि झूलन गोस्वामी (२५) यांनी चांगला प्रतिकार केला. वेदा कृष्णमूर्तीनेही १८ धावांची छोटेखानी आक्रमक खेळी केली. मात्र, इतर फलंदाजांकडून योग्य साथ न मिळाल्याने त्यांची लढत अपयशी ठरली. (वृत्तसंस्था)संक्षिप्त धावफलक :वेस्ट इंडीज : २० षटकांत ८ बाद ११४ धावा (स्टेफनी टेलर ४७, डिंड्रा डॉट्टीन ४५; हरमनप्रीत कौर ४/२३, अनुजा पाटील ३/१६) वि.वि. भारत : २० षटकांत ९ बाद १११ धावा (अनुजा पाटील २६, झूलन गोस्वामी २५, स्मृती मानधना २२; डिंड्रा डॉट्टीन ३/१६, अ‍ॅफी फ्लेचर २/१५)