भारतीय महिला सराव सामन्यात जपानकडून पराभूत
By Admin | Updated: June 16, 2015 02:00 IST2015-06-16T02:00:07+5:302015-06-16T02:00:07+5:30
विश्व लीग हॉकी उपांत्य फेरीच्या पूर्वी झालेल्या सराव सामन्यात भारतीय महिला संघाला जपानकडून ०-२ गोलने पराभव पत्कारावा लागला.

भारतीय महिला सराव सामन्यात जपानकडून पराभूत
एंटवर्प (बेल्झियम) : विश्व लीग हॉकी उपांत्य फेरीच्या पूर्वी झालेल्या सराव सामन्यात भारतीय महिला संघाला जपानकडून ०-२ गोलने पराभव पत्कारावा लागला.
सामन्याच्या सुरुवातीपासूनच जलद व नियोजनबद्ध खेळ करणाऱ्या जपान संघाच्या महिलांनी पहिल्या व दुसऱ्या क्वार्टरमध्ये प्रत्येकी १ गोल नोंदवून भारताविरुद्ध वर्चस्व राखले. भारताचा दुसरा सराव सामना इटलीविरुद्ध मंगळवारी होणार आहे.
संधीचा फायदा घेणे आवश्यक असून, विरुद्ध संघाच्या डी मध्ये गोल करण्याची संधी आमच्या महिलांनी गमवू नये. त्या संधीचा त्यांना पूर्ण फायदा घेण्याचे आवश्यक असल्याचे भारतीय महिला संघाचे मुख्य मार्गदर्शक मथायस एहरेंस यांनी वृत्तसंस्थेला सांगितले. आमची पहिली लढत बेल्झियमविरुद्ध आहे. ही लढत घरच्या मैदानावर असल्यामुळे बेल्झियमला मानसिक बळ नक्कीच मिळेल. या लढतीत भारतीय महिलांनी उत्कृष्ट कामगिरी करणे आवश्यक असून, त्याचा फायदा त्यांना पुढील सामन्यात होणार आहे.