भारतीय संघात महाराष्ट्राचा ङोंडा
By Admin | Updated: August 24, 2014 01:04 IST2014-08-24T01:04:41+5:302014-08-24T01:04:41+5:30
चीनमध्ये 5 ते 11 सप्टेंबरदरम्यान रंगणा:या विश्वचषक वूडबॉल स्पर्धेत भारताच्या संघाची घोषणा झाली

भारतीय संघात महाराष्ट्राचा ङोंडा
रोहित नाईक - मुंबई
चीनमध्ये 5 ते 11 सप्टेंबरदरम्यान रंगणा:या विश्वचषक वूडबॉल स्पर्धेत भारताच्या संघाची घोषणा झाली असून, जालनाच्या विकास इंगळेने राष्ट्रीय संघात स्थान मिळवत महाराष्ट्राचा ङोंडा फडकावला आहे. विशेष म्हणजे विकासव्यतिरिक्त सुदीप आणि ¬तुजा मानवटकर भाऊ-बहीण जोडीने देखील भारताच्या संघात स्थान मिळवले आहे.
आंतरराष्ट्रीय वूडबॉल महासंघ आणि वूडबॉल असोसिएशन ऑफ चीन यांच्या संयुक्त विद्यमाने या स्पध्रेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेत एकूण 21 देशांच्या संघांचा समावेश आहे. अजय सोनटक्के, सुधीर कहाते आणि प्रवीण मानवटकर यांच्या मार्गदर्शनाखाली घडलेल्या विकास, ¬तुजा व सुदीप या तिन्ही खेळाडूंनी या खेळामध्ये आपली छाप पाडली आहे. मूळचा जालनाचा असलेला विकास शिक्षणासाठी मुंबईत वास्तव्यास असून, सध्या अंधेरी येथील राजीव गांधी महाविद्यालयात अभियांत्रिकेचे शिक्षण घेत आहे. तर नागपूरच्या मानवटकर भावंडांपैकी ¬तुजा सध्या चर्चगेट येथील सिडनहॅम कॉलेजमध्ये बीएमएसच्या पहिल्या वर्षाला असून सुदीप नागपूर येथे अभियांत्रिकीचे शिक्षण घेत आहे.
या स्पर्धेसाठी येणारा खर्चाचा भार राज्य संघटना उभारणार असून, आगामी राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय स्पर्धेत पुरस्कर्ते मिळवण्यासाठी विकासची धडपड सुरू आहे. योग्य पुरस्कर्ते लाभल्यास राज्यासाठी तसेच देशासाठी अभिमानास्पद कामगिरी करण्याचा विश्वास विकासने व्यक्त केला आहे.
विकास आणि ¬तुजा मानवटकर यांनी याचवर्षी जानेवारीत जयपूर येथे झालेल्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेत मिश्र गटाचे कांस्यपदक पटकावले होते. 2क्13 मध्ये झालेल्या वरिष्ठ राज्यस्तरीय स्पर्धेत विकासने मिश्र गटातून व सांघिक गटातून सुवर्णपदक पटकावण्याची कामगिरी केली. तसेच वरिष्ठ गटाच्या राष्ट्रीय स्पर्धेत दुहेरी गटामध्ये विकासने चौथे स्थान पटकावत आपली चमक दाखवली. ¬तुजाने 2क्1क् साली इंडोनेशिया व मलेशिया येथील दोन आंतरराष्ट्रीय स्पर्धात सहभाग घेतला होता, तर 2क्12 साली चीनमध्येच झालेल्या स्पर्धेत खेळण्याचा दांडगा अनुभव ¬तुजाकडे आहे.