Tokyo Olympics : श्रीहरी नटराजनं पटकावलं ऑलिम्पिक तिकीट, प्रथमच भारताचे दोन जलतरणपटू होणार सहभागी

By ऑनलाइन लोकमत | Published: June 30, 2021 12:49 PM2021-06-30T12:49:01+5:302021-06-30T12:51:54+5:30

भारताचा जलतरणपटू श्रीहरी नटराज यानं टोक्यो ऑलिम्पिक स्पर्धेचे तिकीट पटकावलं.

Indian Swimmer Srihari Nataraj Qualifies For Tokyo Olympics After FINA Approves Qualification Time | Tokyo Olympics : श्रीहरी नटराजनं पटकावलं ऑलिम्पिक तिकीट, प्रथमच भारताचे दोन जलतरणपटू होणार सहभागी

Tokyo Olympics : श्रीहरी नटराजनं पटकावलं ऑलिम्पिक तिकीट, प्रथमच भारताचे दोन जलतरणपटू होणार सहभागी

googlenewsNext

भारताचा जलतरणपटू श्रीहरी नटराज यानं टोक्यो ऑलिम्पिक स्पर्धेचे तिकीट पटकावलं. जागतिक जलतरण महासंघानं रोम येथे झालेल्या सेटे कॉली ट्रॉफी स्पर्धेतील 100 मीटर बॅकस्ट्रोक स्पर्धेतील त्याच्या वेळेला 'अ' पात्रता निकषाची मान्यता दिली. त्यामुळे नटराज याचे ऑलिम्पिक खेळण्याचे स्वप्न पूर्ण होणार आहे. भारतीय जलतरण महासंघानं ट्विटद्वारे ही माहिती दिली. नटराजनं रोम येथील स्पर्धेत ५३.७७ सेकंदाची वेळ नोंदवली होती.  


टोक्यो ऑलिम्पिक स्पर्धेत नटराज व साजन प्रकाश ( Sajan Prakash) असे भारताचे दोन जलतरणपटू अ पात्रता निकषानुसार खेळणार आहेत. नटराजनं राष्ट्रीय विक्रमांची नोंद करताना ऑलिम्पिक पात्रतेसाठीचा ५३.८५ सेकंदाच्या वेळेपेक्षा कमी कालावधी नोंदवला. साजन प्रकाश पुरुषांच्या २०० मीटर बटरफ्लाय प्रकारात सहभागी होणार आहे. 

द्युती चंदलाही मिळालं तिकीट 
भारताची स्टार धावपटू द्युती चंद हिला जागतिक क्रमवारीनुसार टोक्यो ऑलिम्पिक स्पर्धेत १०० व २०० मीटर शर्यतीचे तिकीट मिळाले. १०० मीटर शर्यतीसाठी २२ जागा, तर १०० मीटर शर्यतीसाठी १५ जागा उपलब्ध होत्या. 

Web Title: Indian Swimmer Srihari Nataraj Qualifies For Tokyo Olympics After FINA Approves Qualification Time

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.