शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठा खुलासा! मध्यपूर्वेत इराणनं अमेरिकेची कंबर मोडली; ८ देशांतील लष्करी तळ उद्ध्वस्त, रडारपासून विमानांपर्यंत सर्वकाही नष्ट!
2
West Bengal Election : पश्चिम बंगालमध्ये १५ बूथवर पुन्हा मतदान; निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय
3
रिझर्व्ह बँकेने लंडनमधून परत मागवले तब्बल १ लाख किलो सोनं, कारण काय?
4
भुसावळातील भीषण आग; सहा घरे जळून खाक; चार बकऱ्यांचा होरपळून मृत्यू
5
समुद्रात अडकले ४१ टँकर, अमेरिकेने केली इराणची नाकेबंदी, पण तिकडे चीनची झाली कोंडी 
6
“अजितदादांचा पक्ष मविआत येऊ शकतो अन् २०२९ला बारामतीचा आमदार…”; युगेंद्र पवारांचा मोठा दावा
7
महाराष्ट्र दिनी राज ठाकरेंची हुतात्मा स्मारकाबाबत पोस्ट; मराठी माणसाला आवाहन, सरकारवर टीका
8
‘मिसिंग लिंक’ नाही, मग आता काय म्हणायचे?; विशेष मार्गिकेला CM फडणवीसांनी दिले नवीन नाव
9
Travel : ना मोबाईल नेटवर्क, ना विजेचा झगमगाट! तरीही पर्यटकांची धाव; तुम्हाला माहितीये का 'हे' अनटोल्ड डेस्टिनेशन?
10
महाराष्ट्रदिनी PM मोदी यांचे CM फडणवीस यांना खास पत्र, नेमकं काय म्हटलंय? वाचा
11
नवमपंचम विपरीत राजयोग २०२६: ९ राशींना लक्षणीय लाभ, नवीन नोकरीची संधी; कष्टाचे चांगले फळ!
12
जुना एसी दुरुस्त करावा की नवा विकत घ्यावा? 'हे' पॉईंट्स वाचून निर्णय घ्या, वाचतील हजारो रुपये!
13
३ देशांतून तातडीने बाहेर पडा! UAEची नागरिकांना सूचना; सावधगिरीची इशारा की युद्धात उडी?
14
“महाराष्ट्राचे राजकीय महत्त्व कमी करायचा प्रयत्न, सरकारने आत्मपरीक्षण करावे”: हर्षवर्धन सपकाळ
15
माणुसकीला काळिमा! १२ वर्ष सिगरेटचे चटके, मग घटस्फोट देऊन घराबाहेर काढलं; हैवान पतीचा क्रूर चेहरा समोर
16
“महाविकास आघाडीने विकासाची लिंक मिस केली, आम्ही ती वेगाने कनेक्ट केली”: DCM एकनाथ शिंदे
17
लग्नाचे विधी सुरू होणार तोच पथक दारात! परभणीत बालविवाह रोखला; अल्पवयीन मुलीची बाल कल्याण समितीकडे रवानगी
18
कृणाल पांड्याला गोलंदाजी का दिली नाही? भुवीने सांगितलं अजब कारण; पाहा तुम्हाला तरी पटतंय का?
19
मी माफी मागतो...! एक्स्प्रेस वेवरील वाहतूक कोंडीबद्दल मुख्यमंत्र्यांची दिलगिरी; सुप्रिया सुळेंना दिला खास संदेश
20
सुट्ट्यांचा आनंद महामार्गावरच 'जाम'! खेड शिवापूर ते साताऱ्यापर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा; प्रवासी हतबल
Daily Top 2Weekly Top 5

भारतीय फ्रँचायसी पुन्हा व्यावसायिक बॉक्सिंगमध्ये

By admin | Updated: March 2, 2017 00:17 IST

प्रशासकीय व्यवस्थेत गोंधळ निर्माण झाल्यानंतर २०१२मध्ये व्यावसायिक बॉक्सिंगमधील फ्रँचायसीचे अधिकार भारताने गमावले होते.

नवी दिल्ली : प्रशासकीय व्यवस्थेत गोंधळ निर्माण झाल्यानंतर २०१२मध्ये व्यावसायिक बॉक्सिंगमधील फ्रँचायसीचे अधिकार भारताने गमावले होते. ते पुन्हा बहाल करण्यात येतील, अशी घोषणा आंतरराष्ट्रीय बॉक्सिंग संघटनेचे (आयबा) अध्यक्ष डॉ. चिंग कुओ यांनी बुधवारी येथे केली.भारतात पहिल्यांदा आयबा आयोगाची दोन दिवसांची बैठक आज संपली. त्यानंतर कुओ म्हणाले, की भारताला विश्व संस्थेत चांगले प्रतिनिधित्व दिले जाईल. भारताकडे २०११-१२ या कालावधीत मुंबई फायटर्स या फ्रँचायसीचे अधिकार होते; पण राष्ट्रीय महासंघाकडून पाठिंबा मिळत नसल्याचे कारण देऊन फ्रँचायसी मालक ट्रान्सटेडियाने माघार घेतली. मिळालेल्या माहितीनुसार, ही कंपनी पुन्हा फ्रँचायसी खरेदी करण्यास इच्छुक आहे. त्यामुळे भारत यंदा डब्ल्यूएसबीच्या कक्षेत दाखल होईल.भारतीय बॉक्सिंग संघटनेचे अध्यक्ष अजयसिंग चौटाला यांनी या निर्णयाचे स्वागत केले. ते म्हणाले, ‘‘या निर्णयानंतर भारताचे आणखी बॉक्सर व्यावसायिक रिंगणात उतरणार आहेत.’’ याआधी २००६मध्ये विश्व महिला बॉक्सिंग चॅम्पियनशिपच्या वेळी डॉ. कुओ भारत दौऱ्यावर आले होते. ते पुढे म्हणाले, ‘‘भारत पुन्हा व्यावसायिक रिंगणात आल्यानंतर डब्ल्यूएसबी भक्कम होईल.’’ व्यावसायिक बॉक्सरना आॅलिम्पिकमध्ये पाठविण्यासंदर्भात विचारताच ते म्हणाले, ‘‘व्यावसायिक बॉक्सरना आॅलिम्पिकमध्ये पाठविण्याचे अधिकार आयबाने सर्वच राष्ट्रीय महासंघांना दिले आहेत.’’भारत नोव्हेंबर महिन्यात विश्व युवा बॉक्सिंग स्पर्धेचे आयोजन करण्यास इच्छुक आहे. भारताला विविध समित्यांमध्ये योग्य प्रतिनिधित्व देण्याचे काम आयबा करणार आहे.