शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

युद्धामुळे मोडलं भारताचं वर्ल्डकपचं स्वप्न; अमेरिका-इराण तणावामुळे खेळाडूंना फटका, काय घडलं?

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 8, 2026 11:33 IST

अचानक वाढलेल्या तणावामुळे आणि मध्य पूर्वेतील युद्ध परिस्थितीमुळे पासपोर्ट वेळेवर भारतात पाठवता आले नाहीत.

नवी दिल्ली - एकीकडे सूर्यकुमार यादव याच्या नेतृत्वात भारतीय क्रिकेट टीम टी-२० वर्ल्डकप ट्रॉफीपासून एक पाऊल दूर आहे तर दुसरीकडे भारताच्या बॉक्सिंग टीमचं वर्ल्डकप जिंकण्याचं स्वप्न मोडले आहे. भारतीय ज्युनिअर बॉक्सिंग टीमला मजबुरीने वर्ल्डकपपासून दूर व्हावे लागत आहे. पश्चिम आशियात सुरू असलेल्या युद्धाच्या परिस्थितीमुळे लॉजिस्टिकचा सामना करावा लागत असल्याने ही वेळ आली आहे.

रिपोर्टनुसार, १० सदस्य असणारी भारतीय ज्युनिअर बॉक्सिंग टीम मॉन्टेनेग्रोच्या बुडवा शहरात ३ ते ११ मार्चपर्यंत होणाऱ्या वर्ल्ड बॉक्सिंगमध्ये सहभागी होणार होती. परंतु आवश्यक कागदपत्रे वेळेवर न मिळाल्याने टीम टूर्नामेंटमध्ये पोहचू शकली नाही. मॉन्टेनेग्रोचे भारतात दूतावास नाही. त्यामुळे बॉक्सिंग फेडरेशन ऑफ इंडिया (BFI) ने UAE मधील मॉन्टेनेग्रो दूतावासाद्वारे खेळाडूंच्या व्हिसासाठी अर्ज केला होता. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार व्हिसा स्टॅम्पिंगसाठी फिजिकल पासपोर्ट जमा करणे आवश्यक होते. त्यामुळे पाच मुले आणि पाच मुलींसह सर्व खेळाडूंचे पासपोर्ट UAE ला पाठवण्यात आले. सामान्यतः व्हिसा स्टॅम्पिंगनंतर दोन ते तीन दिवसांत पासपोर्ट परत केले जातात.

युद्धामुळे पासपोर्ट वेळेवर पोहोचले नाहीत

मात्र युद्धामुळे यावेळची परिस्थिती वेगळी होती. अचानक वाढलेल्या तणावामुळे आणि मध्य पूर्वेतील युद्ध परिस्थितीमुळे पासपोर्ट वेळेवर भारतात पाठवता आले नाहीत. ईमेलद्वारे व्हिसा आधीच निश्चित करण्यात आला होता, परंतु प्रत्यक्ष पासपोर्ट भारतात पोहोचले नाहीत. परिणामी भारतीय संघ मॉन्टेनेग्रोला जाऊ शकला नाही आणि त्यांना स्पर्धेतून माघार घ्यावी लागली.

२० फेब्रुवारी रोजी पासपोर्ट जमा केले होते

२० फेब्रुवारी रोजी व्हिसा स्टॅम्पिंगसाठी खेळाडूंचे पासपोर्ट सादर करण्यात आले आणि संघाचे विमान तिकिटे स्टँडबायवर ठेवण्यात आले. या संपूर्ण प्रकरणात बीएफआय मॉन्टेनेग्रिन अधिकाऱ्यांशी आणि भारतीय परराष्ट्र मंत्रालयाशी (एमईए) सतत संपर्कात राहिला, परंतु पासपोर्ट वेळेवर परत मिळू शकले नाहीत. अशा प्रकारे भारताच्या १० सदस्यीय युवा बॉक्सिंग संघाचे विश्वचषकात सहभागी होण्याचे स्वप्न अपूर्ण राहिले.

English
हिंदी सारांश
Web Title : War dashes India's boxing World Cup dream due to US-Iran tension.

Web Summary : India's junior boxing team missed the World Cup in Montenegro due to Middle East tensions delaying passport returns from UAE. Visas were approved, but physical passports were stuck, halting their participation despite BFI's efforts with Montenegrin officials and India's MEA.
टॅग्स :boxingबॉक्सिंगIranइराणUnited Arab Emiratesसंयुक्त अरब अमिराती