शहरं
Join us  
Trending Stories
1
१३६३५७ घन मीटर क्षमता, गायब होते LNG टँकर जहाज; अचानक भारताजवळ दिसले, महिनाभर कुठे होते?
2
इंडियन एअरलाईन बंद पडण्याची शक्यता! इंधनाच्या दरवाढीमुळे सरकारकडे मदतीची याचना; संघटनेकडे साकडे
3
Sonam Raghuvanshi : “आज पैशाच्या ताकदीपुढे आमचा पराभव”; सोनम रघुवंशीला जामीन मिळताच राजाच्या भावाचा संताप
4
Top Marathi News LIVE Updates: वरूड-मोर्शी महामार्गावर भीषण अपघात, एकाच कुटुंबातील ३ जण ठार, एक जखमी
5
सोनम रघुवंशी जामिनावर सुटली, पण मेघालयातच अडकली; शिलॉन्ग न्यायालयाचा मोठा निर्णय
6
रशिया, चीनची जर क्षेपणास्त्रे आली तर अमेरिका बचाव करू शकणार नाही; पेंटागनची धक्कादायक कबुली 
7
"बोलने तो दो यार..." किंग कोहलीची शाळेतील विद्यार्थ्यांसमोरील 'बोलंदाजी' चर्चेत (VIDEO)
8
"हिंदू असल्याचे सांगताच त्याने हात पकडला अन्..."; मीरा रोड हल्ल्याचा धक्कादायक घटनाक्रम समोर
9
मनू भाकरला विचारला वैभव सूर्यवंशीबद्दलचा 'तो' प्रश्न; सोशल मीडियावर संतापले चाहते, काय घडलं?
10
IAS Narayan Konwar : इच्छा तिथे मार्ग! वडील गमावल्याचं दु:ख, बारावीत नापास; मेहनतीने भाजी विकणारा झाला IAS
11
“इथे व्यवसाय करायचा असेल तर मराठी येणे आवश्यकच”; मंत्री प्रताप सरनाईकांनी स्पष्टच सांगितले
12
Facebook Instagram Rules : तुमच्या मृत्यूनंतर फेसबुक-इंस्टाग्राम कोण चालवणार? मेटाचा नवा नियम; 'डिजिटल मृत्युपत्र' लिहिता येणार
13
सहा वर्षांनी...! भारत-चीन हवाई कनेक्टिव्हिटी पुन्हा सुरू! इंडिगोचे विमान ग्वांगझूमध्ये उतरले; एअर चायनाचीही दिल्ली-बीजिंग सेवा सुरू
14
पेट्रोल-डिझेल गाड्या इतिहासजमा होणार; नितीन गडकरींचा वाहन उत्पादकांना इशारा...
15
IPL 2026: अजब गजब आरोप! वैभव सूर्यवंशीच्या बॅटबद्दल बोलताना PAK एक्सपर्टने तोडले अकलेचे तारे
16
कोकणवासींना गुड न्यूज! १ मेपासून विशेष ट्रेन, वीकेंडला स्पेशल ३६ सेवा; कधीपर्यंत सुरू असेल?
17
रितेश देशमुखच्या 'राजा शिवाजी'ची क्रेझ! प्रदर्शनाआधीच हजारो तिकिटांची विक्री; वाचा रिपोर्ट
18
कंपन्या AI साठी कर्मचाऱ्यांना काढतायत नंतर पस्तावतायत! पगारापेक्षा जास्तच होतोय खर्च, काय म्हणतायत कंपन्यांचे सीईओ... 
19
तिसऱ्यांदा बोनस शेअर देणार 'ही' बँक; पाहा किती Shares मिळणार? डिविडंडचीही घोषणा
20
‘शिवाजी कोण होता?’ वाचनावरून तणाव; पोलिसांनी आंदोलन चिरडल्याचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

भारताने उपांत्य फेरीत पाकिस्तानला लोळवले

By admin | Updated: May 26, 2016 03:52 IST

अनुभवी पंकज अडवाणीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने दिमाखदार कामगिरी करताना पारंपारिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानचा ३-० असा फडशा पाडून आशियाई स्नूकर

मुंबई : अनुभवी पंकज अडवाणीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने दिमाखदार कामगिरी करताना पारंपारिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानचा ३-० असा फडशा पाडून आशियाई स्नूकर अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक मारली. स्पर्धेत सुवर्ण पदकावर कब्जा करण्यासाठी भारताचा पुढील सामना बलाढ्य इराणविरुद्ध होईल.अबुधाबी येथे सुरु असलेल्या या स्पर्धेत पंकज अडवाणीच्या नेतृत्त्वाखाली खेळताना भारतीय संघाने चमकदार खेळाचे प्रदर्शन केले. पहिल्या एकेरी लढतीत आदित्य मेहताना पाकिस्तानच्या मोहम्मद आसिफचा ७३-१६ असा धुव्वा उडवून भारताला १-० असे आघाडीवर नेले. यानंतर आशियाई सिक्स रेड स्नूकर चॅम्पियन पंकजने आपला हिसका दाखवताना असजद इक्बालला ८३-२५ असे लोळवले.सलग दोंन विजयानंतर २-० अशी भक्कम आघाडी घेतलेल्या भारतीयांनी दुहेरीतही वर्चस्व राखले. पंकज - आदित्य यांनी आपला धडाका कायम राखताना आसिफ - असजद यांना ९२-८ असे लोळवून भारताला दिमाखात अंतिम फेरी गाठून देताना ३-० असा एकतर्फी विजय मिळवला. तत्पूर्वी, भारताने संयुक्त अरब अमिरातला (यूएई) एकतर्फी सामन्यात ३-० असे लोळवून उपांत्य फेरी गाठली होती. आदित्यने पहिल्या एकेरीत अपेक्षित विजयी सुरुवात करताना यूएईच्या मोहम्मद शेहाबचा ८८-१५ असा फडशा पाडून भारताला १-० असे आघाडीवर नेले. पंकजने मोहम्मद अल जोकरचा ६७-१९ असा फडशा पाडून भारताला २-० अशी भक्कम आघाडी मिळवून दिली. यानंतर दुहेरीत आदित्य - पंकज यांनी मोहम्मद शेहाब- मोहम्मल अल जोकर यांचा ५२-२१ असा पाडाव करुन भारताला उपांत्य फेरीत जागा मिळवून दिली. (वृत्तसंस्था)पहिल्या एकेरी लढतीत आदित्य मेहताना पाकिस्तानच्या मोहम्मद आसिफचा ७३-१६ असा धुव्वा उडवून भारताला १-० असे आघाडीवर नेले. यानंतर आशियाई सिक्स रेड स्नूकर चॅम्पियन पंकजने आपला हिसका दाखवताना असजद इक्बालला ८३-२५ असे लोळवले.