शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला 'टोल' दिला तर खैर नाही! अमेरिकेचा जगाला सज्जड दम, सर्व जहाज कंपन्यांवर बंदीची टांगती तलवार
2
Nasrapur Case: "अशा विकृत प्रवृत्तीच्या गुन्हेगारांवर..." नसरापूर घटनेवर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांची संतप्त प्रतिक्रिया
3
आजचे राशीभविष्य, ०३ मे २०२६: कुंभ, मकर राशीला भाग्याची साथ; जाणून घ्या तुमचा आजचा दिवस
4
"दुनिया हिला देंगे हम!" संघर्षातही मुंबई इंडियन्सने रचला नवा इतिहास; टी-२० विश्वात असा अद्वितीय पराक्रम करणारा पहिला संघ
5
राज्यात कोकणचाच डंका; लातूर पुन्हा तळाशी! बारावीचा निकाल घटला
6
रस्त्याच्या कामात भीषण अपघात! क्रेनचा प्लॅटफॉर्म तुटून २ कामगारांचा जागीच मृत्यू
7
भोंदू खरात बिल्डरच्या खर्चाने फिरून आला तब्बल २१ देश;नवव्या गुन्ह्यात आणखी ४ दिवसांची पोलिस कोठडी
8
होर्मुझला पर्याय काय? इराणच्या दहशतीखाली जगाची 'लाईफलाईन' अडकली
9
मोबाइलवर वाजला अचानक वॉर्निंग सायरन अन् पसरली घबराट; 'सेल ब्रॉडकास्ट अलर्ट' प्रणाली देशभरात लाँच
10
मतमोजणी कर्मचाऱ्यांच्या निवडीचा निवडणूक आयोगाला अधिकार; तृणमूल काँग्रेसच्या याचिकेवर निकाल
11
छत्तीसगड : भूसुरुंग निकामी करताना चार जवान शहीद;'माओवाद मुक्ती'च्या केंद्राच्या घोषणेला धक्का
12
भाईंदरमधील २२० एकर मिठागरांवरील केंद्राचा दावा उच्च न्यायालयाने फेटाळला; जमीन खासगी व्यक्तीची असल्याचे स्पष्टीकरण
13
जबलपूर क्रुझ दुर्घटनेतील दोन बालकांचे मृतदेह सापडले; मृतांची संख्या ११ वर
14
नसरापूर प्रकरण: ...अखेर पोलिसांनी बळाचा वापर करून आंदोलकांना महामार्गावरून हटवले, पीडीतेचे पार्थिव वैकुंठ स्मशानभूमीत दाखल
15
पश्चिम बंगाल: फाल्टा मतदारसंघात पुन्हा मतदान, निकालाची तारीखही बदलली! निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय
16
नसरापूर प्रकरण: राष्ट्रीय महिला आयोगाने घेतली दखल, व्यक्त केला तीव्र संताप; तपासावर राहणार थेट लक्ष
17
नसरापूर प्रकरण : "पीडित चिमुकलीचे आई-वडील मुख्यमंत्र्यांच्या भूमिकेशी सहमत, मात्र काही लोक..."; काय म्हणाले अमितेश कुमार?
18
धामणगाव येथे अग्नितांडव, ‘वणव्या’ने राख केले ५० कुटुंबांचे स्वप्न; जनावरांचा कोळसा अन् ग्रामस्थांचा टाहो
19
दुनिया हिला देंगे हम! MI नं 'बेबी ओव्हर'सह GT चा खेळ खल्लास करत मिळवलं क्वालिफायर २ चं तिकीट
Daily Top 2Weekly Top 5

प्रत्येक खेळात भारताचा डंका वाजायला हवा : पंतप्रधान

By admin | Updated: March 28, 2016 03:29 IST

सन २0१७मध्ये भारतात होणाऱ्या फिफा अंडर-१७ वर्ल्डकपसाठी आतापासूनच वातावरण फुटबॉलमय होण्याची आवश्यकता असून, क्रिकेटप्रमाणेच प्रत्येक खेळात भारताचा डंका

नवी दिल्ली : सन २0१७मध्ये भारतात होणाऱ्या फिफा अंडर-१७ वर्ल्डकपसाठी आतापासूनच वातावरण फुटबॉलमय होण्याची आवश्यकता असून, क्रिकेटप्रमाणेच प्रत्येक खेळात भारताचा डंका वाजावा यासाठी युवकांनी प्रयत्न करावेत, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे.रविवारी रात्री आॅल इंडिया रेडीओवर ‘मन की बात’ कार्यक्रमात युवा वर्गाला संबोधित करताना पंतप्रधान म्हणाले, की क्रिकेटप्रमाणेच इतर खेळांतही भारताचा डंका सगळ्या जगात वाजला पाहिजे. कबड्डी, फुटबॉल, हॉकी, टेनिससुद्धा भारताच्या कानाकोपऱ्यात लोकप्रिय झाले पाहिजे. ते म्हणाले, नुकतेच आपल्या क्रिकेट संघाने पाकिस्तान आणि बांगलादेशविरुद्धचे सामने जिंकले. देशातील ६५ टक्के लोकसंख्या तरुण असल्याने खेळात क्रांती घडवून आणण्याची हीच योग्य वेळ आहे. सन २0१७च्या युवा फुटबॉल विश्वचषकाबाबत बोलताना मोदी म्हणाले, पुढील वर्षी आपण एका मोठ्या स्पर्धेचे आयोजन करणार आहोत. फुटबॉल विश्वातील आघाडीचे २४ देश भारतात खेळण्यासाठी येत आहेत. फुटबॉलमध्ये १९५१ आणि १९६२ मध्ये आशियाई स्पर्धेचे विजेतेपद जिंकले आहे, शिवाय १९५६च्या आॅलिम्पिकमध्ये भारत चौथ्या स्थानावर होता. (वृत्तसंस्था)