भारताचे दिग्गज धावपटू मिल्खा सिंग यांना कोरोनाची लागण

By ऑनलाइन लोकमत | Published: May 20, 2021 03:55 PM2021-05-20T15:55:21+5:302021-05-20T15:55:54+5:30

भारताचे दिग्गज धावपटू मिल्खा सिंग यांना कोरोनाची लागण.

India legend Milkha Singh tests positive for COVID-19 | भारताचे दिग्गज धावपटू मिल्खा सिंग यांना कोरोनाची लागण

भारताचे दिग्गज धावपटू मिल्खा सिंग यांना कोरोनाची लागण

Next

भारताचे दिग्गज धावपटू मिल्खा सिंग यांना कोरोनाची लागण. ९१ वर्षीय मिल्खा सिंग हे चंदीगढ येथील घरात विलगीकरणात आहेत. त्यांची प्रकृती ठणठणीत आहे. फ्लाइंग शिख म्हणून प्रसिद्ध असलेल्या मिल्खा सिंग यांनी आपण लवकरच तंदुरूस्त होईन असा विश्वास व्यक्त केला आहे. ( Indian sprinter Milkha Singh has tested positive for COVID-19)  

९१ वर्षीय मिल्खा यांनी सांगितले की,''आमच्या घरातील काही कर्मचाऱ्यांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह सापडले आणि त्यानंतर आम्ही कुटुंबीयांतील सर्व सदस्यांनी कोरोना चाचणी केली आणि त्यात मी सोडून सर्वांचा रिपोर्ट निगेटिव्ह आला. माझा रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याचे मलाच आश्चर्य वाटतेय. मी पूर्णपणे बरा आहे आणि ताप किंवा सर्दी नाही. तीन-चार दिवसात मी बरा होईन, असे मला डॉक्टरांनी सांगितले आहे. मी कालच जॉगिंगला गेलो होतो.''

मिल्खा सिंग यांनी आशियाई स्पर्धेत पाच सुवर्णपदक जिंकली आहेत. १९६०च्या ऑलिम्पिक स्पर्धेत ४०० मीटर शर्यतीच्या फायनलमध्ये ते चौथ्या स्थानावर आले होते. मिल्खा सिंग यांचा मुलगा जीव मिल्खा हा प्रसिद्ध गोल्फपटू आहे.   
 

Web Title: India legend Milkha Singh tests positive for COVID-19

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.