शहरं
Join us  
Trending Stories
1
विराट, सिराज, संजू T20 World Cup मधील भारताच्या एकमेव सराव सामन्याला मुकणार
2
होय, मी २००४ सालापासून भाजपशी युती व्हावी असा आग्रह पवारांकडे धरला होता, पण...; पटेलांचा मोठा खुलासा
3
मतदानापूर्वी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचा वाहतुकीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय
4
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
5
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
6
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
7
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
8
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
9
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
10
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
11
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
12
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
13
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
14
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
15
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
16
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
17
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?
18
राहुल गांधी आणि अखिलेश यादव यांच्या सभेत गोंधळ; बॅरिकेड्स तोडल्यामुळे चेंगराचेंगरी
19
पंजाब किंग्सची जोरदार फटकेबाजी, सनरायझर्स हैदराबादसमोर दोनशेपार लक्ष्य
20
Video:'भारतीय लहेजाची लाज वाटते?'; Cannes च्या रेड कार्पेटवर इंग्रजी बोलण्याने कियारा ट्रोल

भारताला डायमंड लीग आयोजनाची संधी, 'सॅबेस्टियन को' यांचे संकेत

By ऑनलाइन लोकमत | Published: August 26, 2018 8:03 AM

भारताला अ‍ॅथलेटिक्स डायमंड लीग आयोजनाची संधी मिळू शकते. आंतरराष्ट्रीय अ‍ॅथलेटिक्स महासंघाचे अध्यक्ष सॅबेस्टियन को यांनी ही माहिती देताना अनेक आंतरराष्ट्रीय स्टार्सचा समावेश

जकार्ता : भारताला अ‍ॅथलेटिक्स डायमंड लीग आयोजनाची संधी मिळू शकते. आंतरराष्ट्रीय अ‍ॅथलेटिक्स महासंघाचे अध्यक्ष सॅबेस्टियन को यांनी ही माहिती देताना अनेक आंतरराष्ट्रीय स्टार्सचा समावेश असलेली ही स्पर्धा जगभरातील प्रमुख शहरात आयोजित करण्यावर भर दिला आहे. येथे सुरू असलेल्या १८ व्या आशियाई स्पर्धेला भेट देण्यासाठी आलेले को यांनी वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीदरम्यान भारतात डायमंड लीगच्या अयोजनाच्या शक्यतेबाबत चर्चा केली.

को म्हणाले,‘ डायमंड लीग किंवा विश्व दर्जाच्या अनेक स्पर्धा युरोपपर्यंत मर्यादित राहिल्या. आमच्याकडे सुविधा उपलब्ध असल्या तरी दिल्ली, टोकियो, बीजिंग या आशियाई शहरात आयोजन व्हावे याची काळजी घेत आहोत. ’दोनदा आॅलिम्पिक चॅम्पियन राहिलेले को यांनी मोठी लोकसंख्या असलेल्या देशात आयोजनावर भर देत असल्याचे सांगून डायमंड लीग आयोजनाचा करार सध्या एक वर्षे शिल्लक असून जगभरातील शहरात ही स्पर्धा भरविण्यासाठी प्रयत्न केले जात असल्याची माहिती दिली. ते पुढे म्हणाले,‘ पुढच्या वर्षी दोहा येथे आशियाई अ‍ॅथलेटिक्स चॅम्पियनशिपचे आयोजन , २०२० मध्ये टोकियो शहरात आॅलिम्पिकचे आयोजन आणि चीनच्या नानजिंग शहरात विश्व इन्डोअर अ‍ॅथलेटिक्सचे आयोजन होणार आहे. अ‍ॅथलेटिक्सच्या दृष्टीने पुढील चार- पाच वर्षे आशियावर केंद्रित राहतील. चीन आणि कतार हे देश डायमंड लीगचे यजमानपद भूषवित आहेत.’

१९८० आणि १९८४ च्या आॅलिम्पिकमधील १५०० मीटर दौडमध्ये सुवर्ण असलेले को हे हिमा दास आणि नीरज चोप्रा यांच्या कामगिरीवर चांगलेच प्रभावी झाले आहेत. हिमाने विश्व ज्युनियर स्पर्धेत सुवर्ण तर चोप्राने २०१६ च्या अंडर २० चॅम्पियनशिपमध्ये भालाफेकीत सुवर्ण जिंकले आहे. को म्हणाले, ‘हिमाच्या कामगिरीने मला फार प्रभावित केले. मी त्यावेळी स्टेडियममध्ये होतो. भारतासाठी हे शुभसंकेत आहेत. अ‍ॅथलेटिक्स भारतीय लोकसंख्येवर प्रभाव टाकताना दिसत आहे.’

२०१० च्या नवी दिल्ली राष्ट्रकुलच्या यशस्वी स्मृतींना उजाळा देत को यांनी दरदिवशी स्टेडियमवर उसळणाऱ्या गर्दीची प्रशंसा केली. खेळांना जगभर लोकप्रिय करण्याच्या दृष्टीने भारताचे योगदान मोलाचे ठरू शकते.प्रायोजक आणि प्रसारक भारतीय उपखंडात अधिक असल्याने अ‍ॅथलेटिक्सला संपन्न बनविण्यासाठी आशियात मोठ्या स्पर्धेच्या आयोजनास आयएएएफ प्राधान्य देत असल्याचे को यांनी सांगितले.काय आहे डायमंड लीग...डायमंड लीगचे आयोजन एकूण १४ टप्प्यात करण्यात येते. सहभागी होणारे आघाडीचे खेळाडू मोठ्या रकमेचे पुरस्कार विजेते ठरतात, शिवाय त्यांना रँकिंग गुण मिळतात. स्पर्धेची सुरुवात २०१० मध्ये झाली. या आयोजनाचा हेतू गोल्डन लीगचे स्थान घेणे तसेच आयोजन युरोप बाहेर नेणे हा होता. या प्रायोजकांसोबतच्या कराराचे नूतनीकरण होण्याआधी नव्या शहरात आयोजनाच्या चर्चेला वेग आला आहे.

टॅग्स :Sportsक्रीडाTeam Indiaभारतीय क्रिकेट संघAsian Games 2018आशियाई स्पर्धा