शहरं
Join us  
Trending Stories
1
तुम्हाला राजकारणात मुलं होत नाही, त्यात आमचा दोष काय?; उद्धव ठाकरेंचा घणाघात
2
रिकामे झाले, दुसरीकडे काम, भाजपचा फॉर्म्युला; अनेक नेत्यांना दुसऱ्या मतदारसंघात पाठवले
3
आरक्षणाची मर्यादा ७३ टक्के करणार, शेतकऱ्यांना कर्जमाफी देऊ; राहुल गांधी यांची पुण्यातील सभेत घोषणा
4
एकनाथ खडसेंच्या प्रवेशाला विरोध कशाला असेल ? वार्तालापात विनाेद तावडे यांनी मांडली भूमिका
5
पहिल्या भाषणानंतर बाळासाहेबांनी दिलेला 'तो' सल्ला राज ठाकरेंनी कायम लक्षात ठेवला
6
उद्धव यांच्या आजारपणात मोदी करायचे विचारपूस ; पंतप्रधानांच्या विधानावर राजकीय टोलेबाजी सुरू
7
Wipro चे संस्थापक अझीम प्रेमजी बँकिंग क्षेत्रात उतरणार; 'या' बँकेतील हिस्सा खरेदी करण्याच्या तयारीत
8
सरकारने सर्वसामान्यांचे जगणे मुश्कील केले; आदित्य ठाकरेंचा हल्लाबोल
9
आजचे राशीभविष्य - ४ मे २०२४; आज आपणास खूप मोठा आर्थिक लाभ होईल
10
रावसाहेब दानवे षटकार मारणार ? जालन्यात चुरशीची लढाई, भाजपचा वरचष्मा; मविआ कमकुवत!
11
तिकीट तर कापले, आता पुनर्वसनाचा प्रश्न, महायुतीने १२ विद्यमान खासदारांना बसवले घरी
12
शेतकरी संकटात असताना केंद्राकडून सत्तेचा गैरवापर सुरू ; शरद पवार यांची टीका
13
जादूटोण्याच्या संशयातून दोघांना जिवंत जाळले; घरात मृत्युसत्र, १५ जणांना अटक
14
मुंबईत मराठी टक्का कोणाच्या फायद्याचा? मराठी मते आपल्याच झोळीत पाडून घेण्यासाठी घमासान रंगणार
15
भाजपने १२ केंद्रीय मंत्र्यांना तिकीट नाकारले; निकालावर ११ केंद्रीय मंत्र्यांचे भवितव्य ठरणार
16
ॲड. उज्ज्वल निकम २८ कोटींचे मालक; एक कार, अंधेरी, जळगाव आणि दहिसर येथे घरे
17
आता ‘त्या’ महिलेच्या अपहरणाचाही गुन्हा दाखल; पाच दिवसांपासून बेपत्ता असल्याची तक्रार दाखल
18
रवींद्र वायकर यांच्या मालमत्तेत ६ कोटींनी वाढ; २०१९ मध्ये १० कोटी १९ लाखांची संपत्ती
19
या निवडणुकीतला पहिला हेलिकॉप्टर अपघात; महाड येथील दुर्घटना, पायलट किरकोळ जखमी
20
नरेश म्हस्के यांच्याकडे २६ कोटींची संपत्ती; तीन कार, ३ कोटी ६२ लाखांचे कर्ज

दक्षिण आशियाई खो-खो स्पर्धेत भारताला दुहेरी सुवर्णपदक

By ऑनलाइन लोकमत | Published: December 04, 2019 5:46 PM

आज झालेल्या अंतिम सामन्यांमध्ये भारताच्या पुरुष व महिला संघांनी आपआपले सामने रुबाबात जिंकत सलग दुसरे सुवर्ण पदक दक्षिण आशियाई खो-खो स्पर्धेत पटकावली. भारतीय खो-खो संघांनी मिळवलेल्या दुहेरी सुवर्ण पदकामुळे सर्वच थरातून खो-खो खेळाडूंवर कौतुकाचा वर्षाव केला जात आहे.

काठमांडू : दक्षिण आशियाई स्पर्धा काठमांडू व पोखरा, नेपाळ येथे सुरू असून सदर स्पर्धेत खो-खो सामने काठमांडू येथे संपन्न झाले. आज झालेल्या अंतिम सामन्यांमध्ये भारताच्या पुरुष व महिला संघांनी आपआपले सामने रुबाबात जिंकत सलग दुसरे सुवर्ण पदक दक्षिण आशियाई खो-खो स्पर्धेत पटकावली. भारतीय खो-खो संघांनी मिळवलेल्या दुहेरी सुवर्ण पदकामुळे सर्वच थरातून खो-खो खेळाडूंवर कौतुकाचा वर्षाव केला जात आहे.

दक्षिण आशियाई खो-खो स्पर्धेत अंतिम सामन्यात पुरुषांच्या सामन्यात भारताने बांगलादेशचा 16-09 असा एक डाव सात गुणांनी पराभव करत सलग दुसरे सुवर्णपदक पटकावले. या सामन्यात दीपक माधवने दोन मिनिटे दहा सेकंद संरक्षण केले व आक्रमणात पाच खेळाडू बाद करून विजयात सिंहाचा वाटा उचलला. बी. राजुने दोन मिनिटे पन्नास सेकंद संरक्षण केले व दोन खेळाडू बाद केले, अक्षय गणपुलेने दोन मिनिटे पन्नास सेकंद संरक्षण केले, सागर पोतदारने दोन मिनिटे वीस सेकंद संरक्षण केले तर आक्रमणात सुदर्शन व अभिनंदन पाटील यांनी प्रत्येकी तीन-तीन खेळाडू बाद केले. बांगलादेशच्या ईदीलने एक मिनिट वीस सेकंद संरक्षण केलं व गंठीने व मारमाने प्रत्येकी दोन-दोन खेळाडू बाद केले परंतु हे सर्व खेळाडू आपल्या संघाला  मोठ्या परवापासून वाचवू शकले नाहीत.

महिलांच्या अंतिम सामन्यात भारताने यजमान नेपाळवर 17-05 असा एकडाव बारा गुणांनी विजय संपादन करत सुवर्णपदकाला गवसणी घातली. सामन्याच्या पहिल्या डावात भारताच्या ऐश्वर्या सावंतने तीन मिनिटे चाळीस सेकंद संरक्षण केले, प्रियंका भोपीने दोन मिनिटे पन्नास  सेकंद संरक्षण केले, कृष्णा यादवने दोन मिनिटे तीस सेकंद संरक्षण केले, आक्रमणात कर्णधार नसरीन व काजल भोरने प्रत्येकी पाच- पाच खेळाडूंना बाद केले व विजय सोपा केला. दुसऱ्या डावात सस्मिता शर्माने दोन मिनिटे तीस सेकंद संरक्षण केले, मुकेशने तीन मिनिटे संरक्षण केले, तर कलाईवनीने दोन मिनिटे संरक्षण केले व मोठा विजय साजरा केला. तर नेपाळच्या पुनम थारूने एक मिनिट दहा सेकंद संरक्षण केले व अंजली थापाने एक मिनिट संरक्षण करून जोरदार लढा देण्याचा प्रयत्न केला मात्र त्या आपल्या संघाला मोठ्या पराभवापासून वाचवू शकल्या नाहीत.

पुरुषांच्या तृतीय क्रमांकाच्या सामन्यात यजमान नेपाळने बांगलादेशचा 13-07 असा एक डाव राखून 6 गुणांनी विजय मिळवला. तर महिलांच्या तृतीय क्रमांकाच्या सामन्यात बांगलादेशने श्रीलंकेचा 10-07 असा एक डाव राखून तीन गुणांनी दणदणीत विजय मिळवला.  

टॅग्स :Kho-Khoखो-खोIndiaभारतBangladeshबांगलादेशNepalनेपाळ