शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
2
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
3
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
4
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
5
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
6
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
7
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
8
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
9
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
10
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
11
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
12
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
13
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
14
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
15
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
16
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
17
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
18
टी-२० इंटरनॅशनलमध्ये या विक्रमाची केवळ बरोबरीच होऊ शकते; मोडणं अशक्य! केवळ २ गोलंदाजांनाच जमलाय हा अद्भुत चमत्कार
19
हवाई प्रवास स्वस्त होणार? विमानाच्या इंधनात इथेनॉल मिश्रणास केंद्राची मंजुरी...
20
न्युड व्हिडिओ व्हायरल प्रकरण: "माझे करिअर खराब होईल, मला माफ करा", उजेरने १६ वर्षाच्या मुलीचा पुन्हा सुरू केला होता छळ
Daily Top 2Weekly Top 5

भारताने पाडला मालदीवचा १५-० ने फडशा

By admin | Updated: September 15, 2014 02:21 IST

सुश्मिता मलिक आणि कमला देवी (प्रत्येकी पाच गोल) यांच्या शानदार गोलच्या बळावर भारतीय महिला फुटबॉल संघाने आशियाई स्पर्धेत मालदीवचा १५-० असा धुव्वा उडवीत सलामी दिली़

इंचियोन : सुश्मिता मलिक आणि कमला देवी (प्रत्येकी पाच गोल) यांच्या शानदार गोलच्या बळावर भारतीय महिला फुटबॉल संघाने आशियाई स्पर्धेत मालदीवचा १५-० असा धुव्वा उडवीत सलामी दिली़ भारताकडून सुश्मिता आणि कमला देवी यांच्यासह स्ट्राईकर बाला देवी हिने दोन गोल नोंदविले, तर कर्णधार बेमबेम देवी, स्ट्राईकर परमेश्वरी देवी आणि डिफेंडर आशालता देवी यांनी प्रत्येकी एक गोल करून संघाच्या विजयात योगदान दिले़ आजच्या विजयासह भारतीय महिला संघ जवळपास स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत पोहोचला आहे़ आशियाई स्पर्धेच्या उद्घाटनाच्या एक आठवड्यापूर्वी फुटबॉल स्पर्धेस प्रारंभ झाला आहे़ भारतीय संघाने सामन्यात आक्रमक सुरुवात करताना पहिल्या हाफपर्यंत ९-० अशी आघाडी मिळविली होती़ त्यानंतर सामना संपेपर्यंत सामन्यावर पूर्णपणे भारतीय खेळाडूंचेच वर्चस्व राहिले. अखेर मालदीवला या लढतीत पराभवाचा सामना करावा लागला़ भारताने पाचव्याच मिनिटाला बेमबेमच्या पासवर सुश्मिताच्या गोलने खाते उघडले़ मिडफिल्डर कमलाने १२ व्या मिनिटाला गोल करीत २-० अशी आघाडी मिळवून दिली़ फॉर्ममध्ये असणाऱ्या बालाने पुढच्याच मिनिटाला गोल नोंदविला़ तीन मिनिटांनंतर सुश्मिताने आपला दुसरा गोल नोंदविला़ भारतीय खेळाडूंपुढे मालदीवच्या खेळाडूंचे काहीच चालले नाही़ कमलाने याचा पुरेपूर लाभ घेत २३ व्या मिनिटाला गोल केला़ त्यानंतर तिने २६ व्या मिनिटाला गोल नोंदवून हॅॅट्ट्रिक साजरी केली़ हाफटाईमपर्यंत बालाने दोन गोल केले होते, तर कमलाने आपला चौथा गोल करताना ९-० अशी आघाडी मिळवून दिली़ब्रेकनंतर मैदानावर उतरलेल्या भारतीय खेळाडूंनी आपला आक्रमक खेळ सुरूच ठेवला़ आशालता हिने बेमबेमच्या पासवर गोल नोंदविला़ त्यानंतर कमलाने ६६ व्या मिनिटाला आपला पाचवा गोल नोंदविला़ सुश्मिताने ८० व्या मिनिटाला फ्री किकवर गोल केला़ तिने सात मिनिटांनंतर आपला पाचवा गोल नोंदविला़ परमेश्वरी देवी हिने अतिरिक्त वेळेत आपला पहिला आणि टीमचा १५ वा गोल नोंदविला़ ही आघाडी प्रतिस्पर्धी संघाला मोडून काढता आली नाही़ (वृत्तसंस्था)