हॉकीत भारताकडून सिंगापूरचा धुव्वा

By ऑनलाइन लोकमत | Published: September 27, 2023 05:30 AM2023-09-27T05:30:38+5:302023-09-27T05:31:07+5:30

आशियाई क्रीडा स्पर्धेत मंगळवारी सिंगापूरचा १६-१ ने धुव्वा उडविला. 

India beat Singapore in hockey | हॉकीत भारताकडून सिंगापूरचा धुव्वा

हॉकीत भारताकडून सिंगापूरचा धुव्वा

googlenewsNext

हांगझाऊ : कर्णधार हरमनप्रीतसिंग आणि मनदीपसिंग यांच्या हॅट्ट्रिकमुळे जेतेपदाचा प्रबळ दावेदार असलेल्या भारतीय पुरुष हॉकी संघाने आशियाई क्रीडा स्पर्धेत मंगळवारी सिंगापूरचा १६-१ ने धुव्वा उडविला. 

भारताने याआधी उझबेकिस्तानचा १६-० ने पराभव केला होता. टोकियो ऑलिम्पिकचा कांस्य विजेता आणि जागतिक क्रमवारीत तिसऱ्या स्थानावर असलेल्या भारताला ४९ स्थानावरील सिंगापूरकडून  आव्हान नव्हतेच.आता ‘अ’ गटाच्या पुढील सामन्यात गुरुवारी भारताचा सामना गत विजेत्या जपानविरुद्ध होईल. 

१६-१ ने मात : हरमनप्रीत, मनदीपची हॅट्ट्रिक

Web Title: India beat Singapore in hockey

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.