शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
2
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
3
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
4
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
5
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
6
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
7
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
8
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
9
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
10
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
11
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
12
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
13
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
14
एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण
15
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
16
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
17
दमदार इंजिनसह BMW ने भारतात लॉन्च केली सर्वात स्वस्त बाईक, जाणून घ्या किंमत अन् फीचर्स...
18
इन्स्टाग्राम युजर्सना मोठा धक्का! रंगीत फोटो झाले काळे-पांढरे; मिनिटांत करा दुरुस्त, फॉलो करा या सोप्या स्टेप्स
19
"मी त्याच्याशीच लग्न करणार...", बिग बॉस विजेती तन्वी कोलतेने केला खुलासा; प्रेमाबद्दल म्हणाली...
20
राजकारणात येण्यापूर्वी काय करायचे राघव चड्ढा; आपने ग्लॅमरस मोहरा गमावला... 
Daily Top 2Weekly Top 5

भारत-आॅस्ट्रेलिया सामना वॉश आऊट

By admin | Updated: January 28, 2015 02:09 IST

तिरंगी मालिकेतील आव्हान कायम राखण्यासाठी मैदानात उतरलेल्या भारताला सोमवारच्या लढतीत पावसाच्या व्यत्ययामुळे २ गुणांवर समाधान मानावे लागले

सिडनी : तिरंगी मालिकेतील आव्हान कायम राखण्यासाठी मैदानात उतरलेल्या भारताला सोमवारच्या लढतीत पावसाच्या व्यत्ययामुळे २ गुणांवर समाधान मानावे लागले. आॅस्ट्रेलियाविरुद्धच्या या सामन्यात पावसाच्या खेळीने ही लढत १६ षटकांनंतर थांबविण्यात आली आणि दोन्ही संघांनी २-२ गुण बहाल करण्यात आले.नाणेफेक जिंकून आॅस्ट्रेलियाने भारताला प्रथम फलंदाजीचे आमंत्रण दिले. काही षटके खेळून काढल्यानंतर पावसाने एंट्री केली. मात्र, थोड्याच वेळात सामना पुन्हा सुरू झाला. ही लढत ४४ षटकांची करण्याचा निर्णय घेण्यात आला. पुन्हा फलंदाजीला आलेल्या भारताला सातव्याच षटकात झटका बसला. सलामीवीर शिखर धवन अवघ्या ८ धावांवर मिचल स्टार्कच्या गोलंदाजीवर बाद झाला. त्यानंतर अंबाती रायुडू आणि अजिंक्य रहाणे यांनी डाव सावरण्याचा प्रयत्न केला; परंतु १३व्या षटकात मिचल मार्श याने रायुडूला बाद केले. १६व्या षटकात पुन्हा पावसाने एंट्री घेतली आणि तो थांबलाच नाही. त्यामुळे ही लढत रद्द करण्याचा निर्णय पंचांनी घेतला.(वृत्तसंस्था)