शहरं
Join us  
Trending Stories
1
“देशाचे संविधान, कायदा अन् सुरक्षेलाच प्राधान्य देणार”; उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया
2
इरफान पठाणने दाखवली MI ची मोठी चूक; हार्दिक पांड्या पराभवाचं भलतंच कारण सांगतोय... 
3
मत द्यायचे असेल तर कोणाला देऊ ? हा प्रश्न, कोणी कुठेही...; महेश मांजरेकरांचे राजकारणावर भाष्य
4
'मुंबईकरांचे योद्धे' संसदेत जाणार, उज्ज्वल निकमांचा विक्रमी मतांनी विजय होणार - शेलार
5
मुंबई इंडियन्स प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद? दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाने Point Table बदलले
6
साताऱ्यात वातावरण तापणार; शनिवार-रविवारची सुटी हेरून गुन्हा दाखल केल्याची एपीएमसीत चर्चा
7
“आईचे निधन पण मोदी तातडीने देशसेवेत, आईच्या पदराखाली राहून राजकारण करणारा नको”: CM शिंदे
8
७० वर्षांत काहीच झाले नाही, मग १० वर्षे तुम्ही काय केले; प्रियंका गांधींचा PM मोदींना सवाल
9
चार दिवसांपासून उत्तराखंडचे जंगल धुमसतेय; सैन्याच्या छावणीपर्यंत पोहोचला वणवा, हेलिकॉप्टर उडाली
10
ट्रोलिंग केल्यास, दोन महिने थेट तुरूंगात टाका! महेश मांजरेकरांचा सरकारला सल्ला
11
शरद पवारांचे साताऱ्याचे उमेदवार अडचणीत; शशिकांत शिंदेंवर आणखी एका घोटाळ्यात एफआयआर
12
शशिकांत शिंदेंना अटक झाली तर महाराष्ट्रात संघर्ष करू; शरद पवार यांचा इशारा
13
माझा 'भाव' विचारला, महिलांचा अपमान केला, मी श्वास घेते हेही काँग्रेसला त्रासदायक; कंगना भावूक
14
राहुल गांधी रामललाचे दर्शन घेणार? “लोकसभा निवडणुकांमुळे राम मंदिर आठवले”; भाजपाची टीका
15
“महाराष्ट्र काँग्रेस ठाकरे गटात विलीन झाल्यास आश्चर्य वाटायला नको”; संजय निरुपम यांची टीका
16
Ohh Shit! रोहित शर्माने धाव पूर्ण होताच रिषभ पंतला मारला जोरात धक्का अन्... 
17
रिषभ पंतवर मुंबईचा कर्णधार हार्दिक पांड्या खवळला, अम्पायरकडे तक्रार करताना दिसला
18
“PM मोदींनी शेतकऱ्यांसाठी मोठे निर्णय घेतले, काँग्रेसने फक्त चॉकलेट दाखवले”; फडणवीसांची टीका
19
"हमासच्या दहशतवाद्याने अंगठी देऊन मला प्रपोज केलं अन् म्हणाला..."; तरूणीने सांगितला भयानक किस्सा
20
शिरूरमध्ये अटीतटीची लढाई, वळसे पाटील लवकरच मैदानात; आढळरावांबद्दल म्हणाले...

स्वप्ना बर्मनची बक्षीस रक्कम वाढवा; बॉक्सर विजेंदरची ममता बॅनर्जी यांना विनंती 

By ऑनलाइन लोकमत | Published: September 05, 2018 9:38 AM

आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतीय खेळाडूंनी घवघवीत यश मिळवले. जकार्ता येथे पार पडलेल्या या स्पर्धेत भारताने एकूण ६९ पदकांची कमाई करून आशियाई स्पर्धेतील सर्वोत्तम कामगिरीची नोंद केली.

नवी दिल्ली: आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतीय खेळाडूंनी घवघवीत यश मिळवले. जकार्ता येथे पार पडलेल्या या स्पर्धेत भारताने एकूण ६९ पदकांची कमाई करून आशियाई स्पर्धेतील सर्वोत्तम कामगिरीची नोंद केली. या पदकांमध्ये १५ सुवर्णपदकांचा समावेश आहे. या स्पर्धेतील प्रत्येक पदकविजेत्या खेळाडूने भारतीयांची मने जिंकली. यातीलच एक नाव आहे ते स्वप्ना बर्मन... 

हेप्टाथ्लॉन या शारीरिक कसोटी पाहणाऱ्या खेळात स्वप्नाने भारताला ऐतिहासिक सुवर्णपदक जिंकून दिले. अत्यंत गरीब कुटूंबातील या खेळाडूने इतिहास घडवला. आशियाई स्पर्धेत हेप्टाथ्लॉनमध्ये सुवर्ण जिंकणारी ती पहिली भारतीय ठरली. पश्चिम बंगालमधील घोश्पारा येथे लहानाची मोठी झालेल्या स्वप्नाचे वडील रिक्षा वाहक होते आणि अर्धांगवायूचा झटका आल्याने ते अंथरुणाला खिळून आहेत. तिची आई चहाच्या मळ्यात काम करते. 

मात्र या पदकानंतर स्वप्नाच्या आयुष्यात बदल घडत आहेत.  तिच्या घराशेजारी पक्का रस्ता बांधण्यात आला आहे आणि मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी तिला त्वरित १० लाखांचे बक्षीस जाहीर केले आहे. त्याशिवाय तिला सरकारी नोकरीही देण्याचे आश्वासन दिले आहे. मात्र तिला जाणाऱ्या बक्षीस रक्कम वाढवावी अशी विनंती ऑलिम्पिक बॉक्सर विजेंदर सिंग याने केली आहे. त्याने ट्विट केले की,' माननीय ममता बॅनर्जी स्वप्ना बर्मनला देण्यात यणाऱ्या बक्षीस रकमेत वाढ करावी ही विनंती. ' यावेळी त्याने अन्य राज्यांनी पदकविजेत्या खेळाडूंना जाहीर केलेल्या बक्षीस रकमेचा दाखला दिला. केंद्रीय मंत्री एस एस अहलुवालिया यांनी स्वप्नाच्या घरी भेट देत ३० लाखांचे बक्षीस जाहीर केले. 

टॅग्स :Asian Games 2018आशियाई क्रीडा स्पर्धाVijender Singhविजेंदर सिंगboxingबॉक्सिंग