सानिया आणि शमी लग्न करणार? टेनिसपटूच्या वडिलांनी सोडले मौन, म्हणाले, "ती त्याला..."

By ऑनलाइन लोकमत | Published: June 21, 2024 10:49 AM2024-06-21T10:49:03+5:302024-06-21T10:50:58+5:30

sania mirza father : सानिया मिर्झा आणि मोहम्मद शमी म्हणजे क्रीडा क्षेत्रातील दोन प्रसिद्ध चेहरे. 

 Imran Mirza has commented on the talk of Sania Mirza and Mohammed Shami getting married | सानिया आणि शमी लग्न करणार? टेनिसपटूच्या वडिलांनी सोडले मौन, म्हणाले, "ती त्याला..."

सानिया आणि शमी लग्न करणार? टेनिसपटूच्या वडिलांनी सोडले मौन, म्हणाले, "ती त्याला..."

sania mirza and mohammed shami : सानिया मिर्झा आणि मोहम्मद शमी म्हणजे क्रीडा क्षेत्रातील दोन प्रसिद्ध चेहरे. दोघांनीही भारताचे प्रतिनिधित्व करताना तिरंग्याची शान वाढवली. मोहम्मद शमीने क्रिकेटमध्ये तर सानिया मिर्झाने टेनिसमध्ये आपला ठसा उमटवला. खरे तर दोन्हीही स्टार खेळाडू त्यांच्या वैयक्तिक जीवनामुळे चर्चेत असतात. सानिया मिर्झा आणि पाकिस्तानी क्रिकेटर शोएब मलिक यांच्यात घटस्फोट झाला आहे, तर मोहम्मद शमी देखील त्याची पत्नी हसीन जहाँपासून विभक्त झाला आहे. त्यामुळे शमी आणि सानिया हे दोघे लग्न करणार असल्याची चर्चा मागील काही कालावधीपासून रंगली आहे. अशातच आता सानियाचे वडील इमरान मिर्झा यांनी याप्रकरणी मौन सोडले आहे.

सानियाच्या वडिलांनी सोडले मौन 
वन डे विश्वचषक २०२३ मध्ये मोहम्मद शमीने शानदार कामगिरी करताना सर्वाधिक बळी घेतले. सानिया मिर्झा मागील काही कालावधीपासून खूप चर्चेत आहे. तिचा माजी पती शोएब मलिकने पाकिस्तानातील आघाडीची अभिनेत्री सना जावेदशी विवाहगाठ बांधली. शोएबने तिसऱ्यांदा तर सनाने दुसऱ्यांदा लग्न केले. मात्र, सानिया मिर्झा आणि मोहम्मद शमी हे लग्न करणार असल्याची चर्चा रंगली असताना सानियाचे वडील इमरान मिर्झा यांनी ही चर्चा म्हणजे केवळ अफवा असल्याचे म्हटले. इमरान मिर्झा म्हणाले की, हे सर्वकाही खोटे आहे, सानिया शमीला कधी भेटली देखील नाही. सानियाचे वडील इमरान हे NDTV या वृत्तवाहिनीशी बोलत होते.

शोएब मलिकने पाकिस्तानी अभिनेत्री सना जावेदसोबत लग्न केले. त्याचे हे तिसरे लग्न आहे. २०१० मध्ये सानिया आणि शोएबचे लग्न झाले होते. या दोघांचे नाते सुमारे १४ वर्ष टिकले. शोएब आणि सानिया यांच्या नात्यात दोन वर्षांपासून हळूहळू दुरावा येण्यास सुरूवात झाल्याच्या चर्चा होत्या. एका मॉडेलसोबतचे स्विमिंग पूल मधील इंटिमेट फोटोशूट याला कारणीभूत ठरले होते. त्यानंतर सानिया-शोएब वेगळे होणार अशी सातत्याने चर्चा होती. त्या चर्चांना अखेर पूर्णविराम मिळाला.

दरम्यान, पाच महिने डेट केल्यानंतर शोएब आणि सानिया यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला होता. लग्नबंधनात अडकण्यापूर्वी दोघांनी त्यांच्या आधीच्या पार्टनरशी संबंध तोडले होते. शोएब त्याची पूर्वीश्रमीची पत्नी आयेशा सिद्दीकीपासून विभक्त झाला होता. तर, सानियाने सोहराब मिर्झासोबत साखरपुडा केल्यानंतर लग्न मोडले होते. १२ एप्रिल २०१० रोजी हैदराबादमध्ये ग्रँड पद्धतीने त्यांचे लग्न पार पडले होते. लग्नानंतर त्यांचे रिसेप्शन सियालकोटमध्ये झाले होते. लग्नाच्या ८ वर्षानंतर म्हणजेच २०१८ मध्ये या जोडप्याला एक मुलगा झाला ज्याचे नाव त्यांनी इझहान मिर्झा मलिक असे आहे.

Web Title:  Imran Mirza has commented on the talk of Sania Mirza and Mohammed Shami getting married

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.