मी गंभीर आजारी नाही : पेलेंचा खुलासा

By Admin | Updated: November 29, 2014 01:08 IST2014-11-29T01:08:07+5:302014-11-29T01:08:07+5:30

फुटबॉलचे जगप्रसिद्ध ब्राङिालियन खेळाडू पेले (74) यांनी आपण गंभीर आजारी नसल्याचा खुलासा केला आह़े

I'm not a serious ill: reveal the pel | मी गंभीर आजारी नाही : पेलेंचा खुलासा

मी गंभीर आजारी नाही : पेलेंचा खुलासा

साओ पाऊलो : फुटबॉलचे जगप्रसिद्ध ब्राङिालियन खेळाडू पेले (74) यांनी आपण गंभीर आजारी नसल्याचा खुलासा केला आह़े त्यामुळे हा महान माजी खेळाडू खरंच गंभीर आजारी आहे किंवा नाही, या चर्चेला पूर्णविराम मिळाला आह़े 
पेले यांना मूत्रमार्गात संसर्ग झाल्यामुळे रुग्णालयात दाखल करण्यात आले आह़े त्यांची प्रकृती गंभीर असल्याचे वृत्त गुरुवारी प्रकाशित झाले होते; मात्र आज पेले यांनी आपल्या टि¦टर अकाऊंटवर प्रकृतीबद्दल खुलासा करून गंभीर आजारी असल्याच्या चर्चेला पूर्णविराम दिला आह़े  पेले पुढे म्हणाले की, मी आपल्याला सांगू इच्छितो की, मी पूर्णपणो बरा आह़े मला आज अतिदक्षता विभागातून सुटी देण्यात आली आह़े आता मी विशेष खोलीत उपचार घेत आह़े काळजी करण्यासारखे काहीच नाही़ 

 

Web Title: I'm not a serious ill: reveal the pel