शहरं
Join us  
Trending Stories
1
“आमच्यावरील सगळे आरोप खोटे, दोन दिवसांत सगळं बाहेर काढणार”; सहर शेखच्या वडिलांचा इशारा
2
भोंदू अशोक खरातचा निकटवर्तीय जितेंद्र शेळके यांचं अपघाती निधन; घातपाताचा संशय, काय घडलं?
3
अमेरिकेच्या निर्बंधांना भारताचा 'खो'! रशियाकडून तेल खरेदी सुरूच राहणार; मोदी सरकारचा कडक पवित्रा
4
Top Marathi News LIVE Updates: "TCS प्रकरण हा एका मोठ्या कटाचा भाग"; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक खुलासा
5
...तर देश कायमचा दुभंगेल, भाजपा आगीशी खेळतंय; डिलिमिटेशन विधेयकावरून राज ठाकरेंचा घणाघात
6
Iran US: दोन युद्ध भूमी, दोनदा शस्त्रसंधी तरीही युद्धाची तयारी; अमेरिका-इराणच्या मनात काय?
7
“उद्धव ठाकरे उमेदवार असतील तर विधान परिषद निवडणूक बिनविरोध होऊ शकेल”; संजय राऊत थेट बोलले
8
"तू बाहेर बस अन् रोहितला MIचा कॅप्टन कर..."; Hardik Pandya ला माजी क्रिकेटरने सुनावलं
9
T20 World Cup 2026: टी२० वर्ल्डकप २०२६ मध्ये मॅच फिक्सिंग? आयसीसीच्या अँटी करप्शन ब्युरोनं सुरू केली चौकशी
10
‘८५० जागांमागचं लॉजिक काय? त्यावरून संसदेत होतोय गदारोळ, आता अमित शाहांनी सांगितलं गणित   
11
धक्कादायक! मोबाइल खरेदीतून वाद; दारूच्या नशेत मित्रानेच घातला मित्राच्या डोक्यात दगड
12
गुजरातमध्ये निवडणुकीपूर्वीच भाजपानं बनवला 'बिनविरोध पॅटर्न'चा नवा रेकॉर्ड; काँग्रेस-AAP ला झटका
13
सावधान! कारचा AC वारंवार बंद करताय? मायलेज वाढवण्याच्या नादात होऊ शकतं मोठं नुकसान; कसं? जाणून घ्या
14
"धर्म बदल, तुझे वडील बरे होतील!"; नाशिक TCS प्रकरणात पीडित तरुणाने तौसीफ आणि दानिशच्या क्रूरतेचा पाढाच वाचला
15
Helicopter Crash In Indonesia : आकाशातून अचानक गायब झालेलं हेलिकॉप्टर अखेर सापडलं! पण... इंडोनेशियातून आली सर्वात वाईट बातमी
16
संसदेत लोकशाहीवरून जुंपली! "कुणी इंदिरा गांधींप्रमाणे पंतप्रधान मोदींची खुर्ची...!"; प्रियंकांच्या 'त्या' विधानावर कंगना रणौत यांचा पलटवार
17
क्रूरतेचा कळस! पत्नीचा पाय कुऱ्हाडीने छाटला, मग तोच पाय घेऊन नराधम पती पोलीस ठाण्यात पोहोचला
18
Wipro चं ₹१५,००० कोटींचं बायबॅक, प्रमोटर ग्रुपही सहभागी होणार; किरकोळ गुंतवणूकदारांसाठी याचा काय अर्थ?
19
TCS प्रकरणातील मास्टरमाइंड HR निदा खान महाराष्ट्रातून पसार?; 'या' ३ राज्यांत पोलीस पथके रवाना
20
Akshaya Tritiya 2026: दोष निवारण्यापेक्षा दोष टाळलेला बरा! नवीन घर घेताना 'या' गोष्टींकडे दुर्लक्ष करू नका!
Daily Top 2Weekly Top 5

ICC Champions Trophy: कुंबळेसोबतच्या वादाबाबत कोहलीचं स्पष्टीकरण

By admin | Updated: June 4, 2017 07:56 IST

गेल्या काही दिवसांपासून टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली आणि प्रशिक्षक अनिल कुंबळे यांच्यात मतभेद असल्याच्या बातम्या येत होत्या, त्यावर कोहलीने स्पष्टीकरण दिलं आहे.

ऑनलाइन लोकमत

बर्मिंगहॅम, दि. 4 - गेल्या काही दिवसांपासून टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली आणि  प्रशिक्षक अनिल कुंबळे यांच्यात मतभेद असल्याच्या बातम्या येत होत्या, त्यावर कोहलीने स्पष्टीकरण दिलं आहे. चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये भारत वि. पाकिस्तान सामन्याला फक्त काही तास उरले आहेत. त्याआधी झालेल्या पत्रकार परिषदेत टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीनं प्रशिक्षक अनिल कुंबळेशी कोणतेही मतभेद नसल्याचं स्पष्ट केलं आहे. गेल्या काही दिवसांत समोर आलेल्या मतभेदांच्या बातम्या म्हणजे फक्त अफवा आहेत असं कोहली म्हणाला. आमच्यात कोणतेही मतभेद नाहीत. ज्या बातम्या येत आहेत त्या पूर्णपणे चुकीच्या आहेत. कोणतीही ठोस माहिती हाती नसताना अशी चर्चा करणं योग्य नाही. मुख्य प्रशिक्षकासोबत मला कुठलीच समस्या नव्हती आणि ही पूर्ण घटना केवळ अफवा आहे, असे कोहली म्हणाला.

 
चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेत रविवारी परंपरागत प्रतिस्पर्धी पाकिस्तानविरुद्ध खेळल्या जाणाऱ्या सलामी लढतीपूर्वी पत्रकारांसोबत बोलताना कोहली म्हणाला, ‘बरीच चर्चा रंगविण्यात आली. जे लोक चेंज रुमचे सदस्य नव्हते त्यांनी बरेच काही लिहिले. ही आश्चर्यचकित करणारी बाब आहे. असे काहीच घडले नाही.’
 
कुंबळेसोबत गेल्या मोसमातील प्रवास शानदार असल्याचे सांगताना कोहली म्हणाला, ‘कुठल्याही प्रकरणावर टिपणी करताना अचूक माहिती असणे आवश्यक आहे.’
 
कोहलीने मीडियावर भाष्य करताना म्हटले की, ‘ज्या बाबी मला माहीत नाहीत त्यावर मी भाष्य करणार नाही. माझ्या मते सध्या धैर्याची उणीव असून कुणीच आपली चूक कबूल करण्यास तयार नाही. जर मीडियाने काही बाबी लिहिल्या आणि त्या चुकीच्या ठरल्या तर मीडिया चूक कबूल न करता समस्येचे निवारण झाल्याचे वृत्त देईल. किमान आपली चूक झाली हे तर स्वीकारायला हवे.’
 
कोहलीने आमचा संघ एका कुटुंबाप्रमाणे असल्याचे सांगत यात एकमेकांच्या विचारावर असहमती असू शकते, असे सांगितले. 
प्रशिक्षक निवडीसाठी एक प्रक्रिया असल्याचे सांगताना विराटने त्यावर अधिक भाष्य करण्याचे टाळले. महत्त्वाची स्पर्धा सुरू असताना काही लोक अफवा पसरवत आहेत. आम्ही खेळावर लक्ष केंद्रित करण्यासाठी प्रयत्नशील आहोत. मैदानावर दडपण येणार नाही, यासाठी प्रयत्नशील असतो. पाकविरुद्धची लढत अन्य संघांसोबतच्या लढतीप्रमाणेच असते. कुठल्याही संघासोबत खेळताना सर्वोत्तम कामगिरीसाठी प्रयत्नशील असतो.’
गोलंदाजीत पर्याय असणे चांगले : कोहली
- चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेत पाकिस्तानविरुद्धच्या लढतीपूर्वी ‘परफेक्ट’ गोलंदाजी संयोजनाची निवड करणे ‘चांगली डोकेदुखी’ असल्याचे मत भारतीय कर्णधार विराट कोहलीने व्यक्त केले.
- विराट म्हणाला,‘गेल्या पाच-सहा दिवसांपासून माझ्या मनात हा विचार घोळत आहे. सराव सामन्यांत सर्वच गोलंदाजांनी चांगली कामगिरी केली. भारताची गोलंदाजीची बाजू संतुलित भासत आहे. एका अष्टपैलू खेळाडूव्यतिरिक्त संघात कुणाची निवड करायची हा चांगला प्रश्न आहे. कारण केवळ चारच गोलंदाजांना संधी देता येईल.
- संघाचा समतोल साधण्यासाठी सर्वच पर्याय खुले आहेत. त्यात दोन फिरकीपटू-दोन वेगवान गोलंदाज, तीन वेगवान गोलंदाज हार्दिक आणि एक फिरकीपटू. खेळपट्टीचे स्वरूप कसे राहील आणि प्रतिस्पर्धी संघाविरुद्ध काय योग्य असेल, याचा विचार केल्यानंतरच संघाची निवड करण्यात येईल.’