शहरं
Join us  
Trending Stories
1
“आमच्यावरील सगळे आरोप खोटे, दोन दिवसांत सगळं बाहेर काढणार”; सहर शेखच्या वडिलांचा इशारा
2
भोंदू अशोक खरातचा निकटवर्तीय जितेंद्र शेळके यांचं अपघाती निधन; घातपाताचा संशय, काय घडलं?
3
अमेरिकेच्या निर्बंधांना भारताचा 'खो'! रशियाकडून तेल खरेदी सुरूच राहणार; मोदी सरकारचा कडक पवित्रा
4
Top Marathi News LIVE Updates: "TCS प्रकरण हा एका मोठ्या कटाचा भाग"; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक खुलासा
5
...तर देश कायमचा दुभंगेल, भाजपा आगीशी खेळतंय; डिलिमिटेशन विधेयकावरून राज ठाकरेंचा घणाघात
6
Iran US: दोन युद्ध भूमी, दोनदा शस्त्रसंधी तरीही युद्धाची तयारी; अमेरिका-इराणच्या मनात काय?
7
“उद्धव ठाकरे उमेदवार असतील तर विधान परिषद निवडणूक बिनविरोध होऊ शकेल”; संजय राऊत थेट बोलले
8
"तू बाहेर बस अन् रोहितला MIचा कॅप्टन कर..."; Hardik Pandya ला माजी क्रिकेटरने सुनावलं
9
T20 World Cup 2026: टी२० वर्ल्डकप २०२६ मध्ये मॅच फिक्सिंग? आयसीसीच्या अँटी करप्शन ब्युरोनं सुरू केली चौकशी
10
‘८५० जागांमागचं लॉजिक काय? त्यावरून संसदेत होतोय गदारोळ, आता अमित शाहांनी सांगितलं गणित   
11
धक्कादायक! मोबाइल खरेदीतून वाद; दारूच्या नशेत मित्रानेच घातला मित्राच्या डोक्यात दगड
12
गुजरातमध्ये निवडणुकीपूर्वीच भाजपानं बनवला 'बिनविरोध पॅटर्न'चा नवा रेकॉर्ड; काँग्रेस-AAP ला झटका
13
सावधान! कारचा AC वारंवार बंद करताय? मायलेज वाढवण्याच्या नादात होऊ शकतं मोठं नुकसान; कसं? जाणून घ्या
14
"धर्म बदल, तुझे वडील बरे होतील!"; नाशिक TCS प्रकरणात पीडित तरुणाने तौसीफ आणि दानिशच्या क्रूरतेचा पाढाच वाचला
15
Helicopter Crash In Indonesia : आकाशातून अचानक गायब झालेलं हेलिकॉप्टर अखेर सापडलं! पण... इंडोनेशियातून आली सर्वात वाईट बातमी
16
संसदेत लोकशाहीवरून जुंपली! "कुणी इंदिरा गांधींप्रमाणे पंतप्रधान मोदींची खुर्ची...!"; प्रियंकांच्या 'त्या' विधानावर कंगना रणौत यांचा पलटवार
17
क्रूरतेचा कळस! पत्नीचा पाय कुऱ्हाडीने छाटला, मग तोच पाय घेऊन नराधम पती पोलीस ठाण्यात पोहोचला
18
Wipro चं ₹१५,००० कोटींचं बायबॅक, प्रमोटर ग्रुपही सहभागी होणार; किरकोळ गुंतवणूकदारांसाठी याचा काय अर्थ?
19
TCS प्रकरणातील मास्टरमाइंड HR निदा खान महाराष्ट्रातून पसार?; 'या' ३ राज्यांत पोलीस पथके रवाना
20
Akshaya Tritiya 2026: दोष निवारण्यापेक्षा दोष टाळलेला बरा! नवीन घर घेताना 'या' गोष्टींकडे दुर्लक्ष करू नका!
Daily Top 2Weekly Top 5

कठोर मेहनतीमुळे मी यशस्वी

By admin | Updated: July 7, 2017 01:20 IST

‘वयाच्या १२व्या वर्षापासून क्रीडाक्षेत्रात घेतलेल्या मेहनतीमुळे यश मिळवणे शक्य झालं. माझ्याकडे कोणतीही क्रीडा गुणवत्ता नव्हती, पण

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : ‘वयाच्या १२व्या वर्षापासून क्रीडाक्षेत्रात घेतलेल्या मेहनतीमुळे यश मिळवणे शक्य झालं. माझ्याकडे कोणतीही क्रीडा गुणवत्ता नव्हती, पण एक गुणवत्ता नक्की होती ती म्हणजे कठोर मेहनत घेण्याची तयारी. त्यामुळेच मी क्रीडाक्षेत्रात यशस्वी ठरलो,’ असे भारताचा आॅलिम्पिकमधील एकमेव वैयक्तिक सुवर्णपदक विजेता अभिनव बिंद्राने म्हटले. एका नामांकित क्रीडा मासिकाच्या वतीने आयोजित क्रीडा पुरस्कार सोहळ्यामध्ये बिंद्राला जीवन गौरव पुरस्काराने गौरविण्यात आले. या वेळी, रिओ आॅलिम्पिक रौप्य पदक विजेती शटलर पी. व्ही. सिंधूला वर्षातील सर्वोत्तम खेळाडू पुरस्काराने गौरविण्यात आले. गुरुवारी रात्री मुंबईत झालेल्या एका दिमाखदार सोहळ्यामध्ये बिंद्राचा गौरव करण्यात आला. ‘वयाच्या ३४व्या वर्षी जीवनगौरव पुरस्कार स्वीकारताना खूप अवघडल्यासारखं वाटंत आहे,’ असेही बिंद्राने या वेळी मिश्किलपणे म्हटले. या सोहळ्यात सर्वोत्तम प्रशिक्षक पुरस्काराने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. राष्ट्रीय बॅडमिंटन प्रशिक्षक पुलेल्ला गोपिचंद यांना हा पुरस्कार त्यांचीच शिष्या आणि स्टार शटलर सिंधूच्या हस्ते प्रदान करण्यात आला. दरम्यान, या वेळी भारताचा युवा पुरुष हॉकी संघ, पॅरालिम्पियन सुवर्ण विजेता देवेंद्र झंझारिया, पॅरालिम्पियन सुवर्णविजेता मरियप्पन थंगवेलु, पॅरालिम्पियन कांस्यविजेता वरुण भाटी, हॉकीमध्ये भरीव योगदान दिलेले के. अरुमुघम, रेसर गौरव गिल, क्रिकेटपटू लोकेश राहुल, लुग रेसर शिवा केशवन, दीर्घ पल्ल्याचा धावपटू मिलिंद सोमन, पॅरालिम्पिक्समध्ये पदक जिंकणारी पहिली भारतीय महिला दीपा मलिक यांनाही गौरविण्यात आले. दिग्गज धावपटू मिल्खा सिंग यांना या वेळी ‘लिविंग लिजेंड’ या विशेष पुरस्काराने गौरविण्यात आले.