शहरं
Join us  
Trending Stories
1
"इराण तुम्हाला दोन मिनिटात उद्ध्वस्त करेल", अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प इटलीच्या पंतप्रधान मेलोनींवर भडकले 
2
IPL 2026 : चुकांवर चुका! तरीही CSK नं मारली बाजी; KKR च्या विजयाची पाटी अजूनही कोरीच
3
१८ अश्लील व्हिडीओ, ३९ फोटो आणि ८ तरुणींची पटली ओळख; अमरावतीत अयान अहमदसह साथीदाराने कळस गाठला
4
होर्मुझवरुन इराणसोबत तणाव वाढला! पंतप्रधान मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात ४० मिनिटे चर्चा
5
नूरचं अनोख सेलिब्रेशन! अजिंक्य रहाणे पाठोपाठ IPL मधील महागड्या खेळाडूला स्वस्तात तंबूत धाडले; अन्....
6
'राज्य सरकारचा निर्णय एकतर्फी, लोकशाहीविरोधी', बाजार समिती संचालक मंडळ बरखास्तीवर जयंत पाटील संतापले
7
सरसंघचालक भागवत यांनी घेतली माजी सरन्यायाधीश शरद बोबडे यांची सदिच्छा भेट
8
युद्धाचा मोठा फटका! इराणचं २७० अब्ज डॉलर्सचं नुकसान; या ५ आखाती देशांकडे मागितली भरपाई
9
लोकसभेतील खासदारांची संख्या ८५० पर्यंत वाढणार, महाराष्ट्रातून किती निवडून जाणार? केंद्राने तयार केला मसुदा
10
षटकार खाल्ला, मग Kartik Tyagi नं १४८.१ kmph वेगासह त्रिफळा उडवत घेतला Sanju Samson चा बदला
11
डीआरआयचे 'सिमोल्लंघन'; कोकेन प्रकरणात दिल्ली, बेंगळुरू आणि हैदराबादवर नजर, तस्करांविरुद्ध जोरदार आघाडी
12
मध्य पूर्वेतील तणाव : इटलीचा इस्रायलला मोठा दणका! पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी सर्व संरक्षण करार रोखले
13
शेतकऱ्याने मृत्युला कवटाळले, पोस्टमार्टमसाठी नातेवाईक दोन तास ताटकळले; बीड जिल्ह्यातील घटना
14
CSK साठी डोकेदुखी ठरतोय Ruturaj Gaikwad चा खराब फॉर्म; कमबॅक करण्यासाठी आता एकच मार्ग उरला
15
7 वर्षांपासून बेपत्ता! 10 हजार डॉलर्सचे बक्षीस, 'या' भारतीय विद्यार्थिनीला FBI का शोधतेय? जाणून घ्या...
16
पेट्रोल १८ तर डिझेल ३५ रुपयांनी महागणार?; ५ राज्यांच्या निवडणुकीनंतर दर वाढण्याची शक्यता
17
"मी आंबेडकरांची फॅन आहे", चिन्मयी सुमीतनं स्पष्टच सांगितलेलं 'जय भीम' म्हणण्यामागचं कारण
18
छत्तीसगडमधील वेदांता पॉवर प्लांटमध्ये बॉयलर स्फोटात १० जण ठार, अनेक जण जखमी
19
IPL 2026 : आधी एका रात्रीत दोन 'क्षेपणास्त्र' लॉन्च केली; आता काव्या मारनच्या SRH नं खेळला नवा डाव
20
आरजेडी-जेडीयूमध्ये पंख विस्तारले, भाजपामध्ये येऊन बनले मुख्यमंत्री; कोण आहेत सम्राट चौधरी?
Daily Top 2Weekly Top 5

टी-२० त सर्वोच्च धावसंख्येची नोंद चौथ्यांदा!

By admin | Updated: September 8, 2016 04:23 IST

ग्लेन मॅक्सवेल पल्लीकल येथे एका डावात सर्वोच्च खेळी करण्याच्या विक्रमापासून थोड्या फरकाने दूर राहिला, पण आॅस्ट्रेलियाने श्रीलंकेविरुद्ध २६३ धावा ठोकून तिसऱ्यांदा सर्वोच्च धावांची नोंद केली.

नवी दिल्ली : ग्लेन मॅक्सवेल पल्लीकल येथे एका डावात सर्वोच्च खेळी करण्याच्या विक्रमापासून थोड्या फरकाने दूर राहिला, पण आॅस्ट्रेलियाने श्रीलंकेविरुद्ध २६३ धावा ठोकून तिसऱ्यांदा सर्वोच्च धावांची नोंद केली. २००५ मध्ये टी-२० ला सुरुवात झाल्यापासून सर्वोच्च धावांची नोंद होण्याची ही केवळ चौथी वेळ ठरली. विशेष असे, की हा विक्रम केवळ दोन संघांच्या नावावर आहे. ते संघ आहेत, आॅस्ट्रेलिया आणि श्रीलंका!१७ फेब्रुवारी २००५ ला पहिला टी-२० सामना आॅस्ट्रेलिया-न्यूझीलंड यांच्यात झाला. आॅस्ट्रेलियाने पाच बाद २१४ धावा उभारल्याने सलामीच्या सामन्यात २०० चा आकडा गाठला गेला. तत्कालीन कर्णधार रिकी पाँटिंगने नाबाद ९८ धावांचे योगदान दिले होते. ९ जानेवारी २००७ मध्ये आॅस्ट्रेलियाने इंग्लंडविरुद्ध पाच बाद २२१ धावा करीत मागच्या विक्रमात सुधारणा केली होती. त्याचवर्षी सप्टेंबरमध्ये झालेल्या आयसीसी टी-२० विश्व चॅम्पियनशिपमध्ये ख्रिस गेल याने द. आफ्रिकेविरुद्ध नाबाद ११७ धावा ठोकून टी-२० तील पहिल्या शतकाची नोंद केली. आॅस्ट्रेलियाच्या नावावर एका डावात सर्वोच्च धावांचा विक्रम फार काळ टिकला नाही. द. आफ्रिकेत झालेल्या पहिल्या आयसीसी टी-२० विश्व चॅम्पियनशिपदरम्यान श्रीलंकेने १४ सप्टेंबर २००७ मध्ये केनियाविरुद्ध जोहान्सबर्ग येथे ६ बाद २६० धावा करीत विक्रम स्वत:च्या नावे केला. तेव्हापासून पुढील नऊ वर्षांत एकही संघ २५० चा आकडा गाठू शकला नव्हता. आॅस्ट्रेलियाने ६ सप्टेंबर २०१६ ला २५० धावांचाच नव्हे, तर श्रीलंकेचा २६० धावांचा विक्रमही मागे टाकला. आतापर्यंत ५६५ टी-२० आंतरराष्ट्रीय सामने खेळले गेले. त्यात ५१ वेळा संघांनी २०० च्यावर धावांची नोंद केली. याशिवाय केवळ सहा वेळा २४० च्यावर धावा नोंदल्या गेल्या. त्यातील तीन प्रसंग गेल्या दोन आठवड्यात घडले हे विशेष. वेस्ट इंडिजने २७ आॅगस्ट २०१६ ला भारताविरुद्ध अमेरिकेत ६ बाद २४५ धावा केल्या होत्या. भारताने पाठलाग करताना ४ बाद २४४ पर्यंत मजल गाठली, पण एका धावेने पराभव पत्करला. आॅस्ट्रेलियाचा त्याआधी सर्वोच्च विक्रम ६ बाद २४८ धावांचा होता. त्यांनी ही खेळी २९ आॅगस्ट २०१३ ला इंग्लंडविरुद्ध केली होती. द. आफ्रिकेने ६ बाद २४१ धावा इंग्लंडविरुद्ध सेंच्युरियन येथे २००९ मध्ये ठोकल्या होत्या. सर्वाधिक दहा वेळा २०० वर धावा करण्याचा मान द. आफ्रिका संघाला जातो. त्यानंतर आॅस्ट्रेलियाने नऊ वेळा, इंग्लंड आणि वेस्ट इंडिज यांनी प्रत्येकी सहा वेळा, भारत आणि श्रीलंका यांनी प्रत्येकी पाच वेळा, न्यूझीलंडने चार वेळा, पाकिस्तान आणि अफगाणिस्तान यांनी प्रत्येकी दोन वेळा, तसेच झिम्बाब्वे आणि आयर्लंड संघांनी प्रत्येकी एकदा २०० वर धावांची नोंद केली आहे. (वृत्तसंस्था)टी-२०त सर्वोच्च १५६ धावांच्या खेळीचा विक्रम आॅस्ट्रेलियाच्या अ‍ॅरॉन फिंचच्या नावावर आहे. मॅक्सवेलला काल हा विक्रम मागे टाकण्याची संधी होती. पण तो १४५ धावा काढून नाबाद राहिला. फिंचने २०१३ मध्ये साऊदम्पटन येथे इंग्लंडविरुद्ध खेळी करताना न्यूझीलंडचा ब्रँडन मॅक्युलमचा १२३ (बांगलादेशविरुद्ध पल्लीकल येथे) धावांचा विक्रम मागे टाकला. मॅक्युलमआधी ख्रिस गेल आणि द. आफ्रिकेचा ख्रिस लेव्ही यांनी प्रत्येकी ११७ धावा करीत वैयक्तिक धावसंख्या नोंदविण्यात दोघेही संयुक्तपणे अव्वल स्थानावर होते.