शहरं
Join us  
Trending Stories
1
पुणे पोलिसांची मोठी कारवाई! ससूनच्या डॉक्टरांनी बिल्डर बाळाचे रक्ताचे नमुने बदलले; दोघांना अटक
2
"तुला मिळणार नाही, मोठ्याला घेऊन ये"; पुण्यात अचानक दारु विक्रीचे 'नियम' लागू झाले
3
भीषण! इस्रायलने राफामध्ये केला एअर स्ट्राईक; 35 जणांचा मृत्यू, अनेक जण जखमी
4
४ जूनला मतमोजणी, १ जूनला इंडिया आघाडीची मोठी बैठक; केजरीवाल, स्टॅलिन यांना निमंत्रण
5
मालेगावच्या माजी महापौरांवर मध्यरात्री गोळीबार; हॉटेलमध्ये तीन गोळ्या झाडल्या, अब्दुल मलिक जखमी
6
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीची तेजीसह सुरुवात, Adani Portsच्या शेअरमध्ये तेजी, Wipro घसरला
7
"भारतात आजही सावरकरांचे विचार लागू..."; रणदीप हूडाने मनातली भावना स्पष्टच सांगितली
8
डावखरेंचा पत्ता कापला? भाजपला पाठिंबा देणाऱ्या राज ठाकरेंनी विधान परिषदेसाठी उमेदवार उतरवला
9
गुरु रंधावा-शहनाज गीलच्या डेटिंगचं सत्य आलं समोर; गायकाने केला खुलासा, म्हणाला, 'मी डेट करायला सुरुवात...'
10
आजचे राशीभविष्य: भागीदारीत लाभ, प्रतिस्पर्ध्यांवर मात; हातून सत्कार्य घडेल, भाग्याचा दिवस
11
जान्हवी कपूरने शेअर केला हिंदी मालिकेचा प्रोमो, ऋतुजा बागवेची आहे मुख्य भूमिका
12
मुंबई दक्षिण मध्य लोकसभा मतदारसंघ: घटलेल्या मतदानाचा नेमका फटका कोणाला बसणार?
13
JioCinema चा आणखी एक धमाका! अवाक् करणाऱ्या किंमतीत मिळणार प्रीमिअम ॲन्युअल प्लॅन, पाहा डिटेल्स
14
मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघ: अंधेरी पश्चिममधील मतदान महत्त्वाचे ठरणार!
15
६ ग्रहांचे गोचर: ६ राशींना जून ठरेल शानदार, नवीन ओळख फायदेशीर; सुवर्ण संधी, सुखाचा काळ!
16
मुंबई उत्तर लोकसभा मतदारसंघ: कमी मतदानामुळे संभ्रमाची स्थिती, नक्की काय होणार?
17
ठाण्यात सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर, बाहेर पडण्यासाठी मार्ग अपुरा; गेमिंग झोनमध्ये तुटपुंजी अग्निरोधक यंत्रणा
18
घाटकोपर होर्डिंग दुर्घटना प्रकरण: आरोपी भावेश भिंडेच्या कोठडीत चार दिवसांची वाढ
19
सायन हॉस्पिटल अपघात प्रकरण: चौकशीनंतर दोषींवर होणार कठोर कारवाई- अतिरिक्त आयुक्त
20
विशेष लेख: असह्य उन्हाळ्याचा आता मेंदूवरही परिणाम! दाहाचे संकट केवळ ‘गार वाटण्या’ने सुटणारे नाही

बॉडी वर्कशॉपचा हेमंत भंडारी ठरला ज्यूनियर मुंबई श्री

By ऑनलाइन लोकमत | Published: January 06, 2019 6:15 PM

मास्टर्समध्ये ठोंबरे, शेख, लांडगे अव्वल; दिव्यांगाच्या गटात प्रथमेश भोसले विजेता

मुंबई - ज्या मैदानात ’ मुंबईच्या राजाचा विजय असो “असा आवाज घुमतो. त्याच मैदानात  ज्यूनियर मुंबई श्रीचा आवाज घुमला. गणेश गललच्या मैदानात पार पडलेल्या पीळदार ज्यूनियर मुंबई श्री स्पर्धेत बॉडी वर्कशॉपच्या हेमंत भंडारीने सर्वानाच धक्का देत बाजी मारली. 60 किलो वजनी गटात खेळत असलेल्या हेमंतने आपल्यापेक्षा वजनदार असलेल्या सर्व खेळाडूंना मागे टाकत परीक्षकांना आपल्या पीळदार शरीरयष्टीच्या प्रेमात पाडले आणि ज्यूनियर्स शरीरसौष्ठवपटूंसाठी ऑस्कर असलेल्या स्पर्धेवर आपले नाव कोरले. दिव्यांगाच्या मुंबई श्रीमध्ये माँसाहेब जिमचा प्रथमेश भोसले अव्वल आला तर मास्टर्स गटात संतोष ठोंबरे, मोहम्मद शेख आणि मुपुंद लांडगे आपापल्या गटात अव्वल ठरले.

एकंदर सहा गटात खेळल्या गेलेल्या या स्पर्धेत एकूण 90 ज्यूनियर्सनी आपल्या आखीवरेखीव शरीरयष्टीचे प्रदर्शन केले. महाविद्यालयीन शरीरसौष्ठवपटूंसाठी प्रतिष्ठेची स्पर्धा असलेल्या ज्यूनियर मुंबई श्री स्पर्धेतही मुंबईच्या शरीरसौष्ठवाची खरी ताकद दिसली. स्पर्धेच्या प्रत्येक गटात तगडे स्पर्धक आणि अटीतटीची लढत दिसली. सालमचा प्रशांत सडेकर 55 किलो वजनी गटात सरस आला. 60 किलो वजनी गटात बॉडी वर्कशॉप हेमंत भंडारी अव्वल आला. पुढच्या गटात त्याच जिमच्या गिरीश मुठेने बाजी मारली.

परब फिटनेसचा अक्षय खोत 70 किलोमध्ये सरस ठरला. अंतिम दोन गटांमध्ये योगेश मोहिते आणि नितांत कोळी गटविजेता ठरला. या सहा खेळाडूंमध्ये झालेल्या जेतेपदाच्या लढतीत शेवटच्या तीन गटातील विजेत्यांपैकी कुणी बाजी मारेल, असाच क्रीडाप्रेमींचा अंदाज होता. प्रेक्षकांमधूनही वरच्या वजनी गटातील खेळाडूंच्या नावाचा आवाज येत होता, पण जेव्हा विजेत्याचे नाव घोषित केले तेव्हा सारेच शांत झाले. या लढतीत वयाने विशी ओलांडलेल्या सहाही खेळाडूंमध्ये सर्वच अंगांनी सरस असलेल्या हेमंतची सरशी झाली. वजनाने कमी असला तरी त्याच्या सर्व अंगाची तयारी इतरांपेक्षा उठून दिसली आणि तोच विजेता ठरला.

या महाविद्यालयीन खेळाडूंसाठी स्फूर्तीदायक असलेल्या स्पर्धेचा पुरस्कार वितरण सोहळा आयोजक अनिल कोकीळ, शरीरसौष्ठव संघटनेचे अध्यक्ष अजय खानविलकर, सरचिटणीस राजेश सावंत आणि सुनिल शेगडे, कार्याध्यक्ष मदन कडू, संजय चव्हाण आणि शाखाप्रमुख किरण तावडे यांच्या उपस्थितीत पार पडला.

ज्यूनियर मुंबई श्री 2019 चा निकाल55 किलो वजनी गट : 1. प्रशांत सडेकर (सालम), 2. वृषभ राणे (तळवलकर्स), 3. नंदन नरे ( आरएम भट), 4. प्रविण श्रीवास्तव (गणेश गल्ली), 5. ओमकार साईम ( आरएम भट).60 किलो : 1. हेमंत भंडारी ( बॉडी वर्पशॉप), 2. अमेय नेवगे (फिटनेस इफेक्ट), 3. अमित यादव (बॉडी वर्कशॉप), 4. आकाश असवले (परब फिटनेस), 5. हर्षल मोहिते (रेड जिम).65 किलो : 1. गिरीश मुठे ( बॉडी वर्कशॉप), 2. प्रशांत गुजन (डी.एन. फिटनेस), 3. अक्षय काटकर (आर.एम.बी), 4. युगल सोलंकी (किट्टी जिम), 5. लालू सिंग ( वायएफसी जिम).70 किलो : 1. अक्षय खोत (परब फिटनेस), 2. कुशल सिंग ( पंपिंग आर्यन), 3. करण कोटियन ( वैयक्तिक), 4. सर्वेश लोखंडे (वाय स्पोर्टस्), 5. विशाल खडे ( राऊत जिम).75 किलो : 1. योगेश मोहिते (अमर जिम), 2. आकाश वाघमारे ( बॉडी वर्कशॉप), 3. अरनॉल्ड डिमेलो ( वैयक्तिक).75 किलोवरील 1. नितीन कोळी (रिगस जिम), 2. शेख मोहम्मद इब्राहिम ( एम.डी. फिटनेस), 3. निखील राणे (बालमित्र). 

दिव्यांग मुंबई श्री : 1. प्रथमेश भोसले (माँसाहेब), 2. मोहम्मद रियाझ (आर गोल्ड), 3. मेहबूब शेख (झेन जिम)नवोदित मुंबई फिटनेस फिजीक :1. कौस्तुभ पाटील (आर.के. एम), 2. यज्ञेश भुरे (आर.के.एम.), 3. भाग्येश पाटील (तळवलकर्स), 4. लवेश कोळी (गुरूदत्त जिम). 5. अविनाश जाधव ( बाल मित्र).

मास्टर्स मुंबई श्री :वय वर्षे 40 ते 50 (70 किलो वजनीगट) :1. संतोष ठोंबरे (न्यू राष्ट्रीय), 2. सुनिल सावंत (मारवा जिम ), 3. दत्ताराम कदम (जय भवानी),वय वर्षे 40 ते 50 (70 किलो वरील) :1. मोहम्मद शब्बीर शेख (परब फिटनेस), 2. वीरेश धोत्रे (आर. के. फिटनेस), 2. जीतेंद्र शर्मा (आई भवानी).वय वर्षे 50 वरील खुला गट : 1. मुपुंद लांडगे ( न्यू राष्ट्रीय), 2. दत्तात्रय भट (फॉर्च्युन जिम), 3. विष्णू देशमुख (परब फिटनेस).

टॅग्स :bodybuildingशरीरसौष्ठवMumbaiमुंबई