शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक TCS प्रकरण: निदा खान मुंब्र्यातील हॉस्पिटलमध्ये दोनदा आलेली; डॉक्टरांचा मोठा खुलासा, अटकपूर्व जामिनासाठी धडपड
2
WWE नाही मनमाडच्या स्थानकावरील Video! अंगावर शहारे येतील, रेल्वेच्या ओव्हरहेड इलेक्ट्रिक खांबावर चढला माथेफिरू 
3
होर्मुझच्या सामुद्रधुनीत जहाजांवर गोळीबार! इराणचा आक्रमक पवित्रा; पुन्हा युद्धाची ठिणगी?
4
जितेश शर्माला आपल्या क्रिजमध्ये पाहून क्रुणाल पांड्या गोंधळला; Run Out झाल्यावर रागही काढला (VIDEO)
5
आता क्युबाकडे मोर्चा वळला? अमेरिकेच्या सर्वात महागड्या ड्रोनने ६ तास घिरट्या घातल्याने खळबळ; काय आहे अमेरिकेचा गेमप्लॅन?
6
बँक ऑफ महाराष्ट्रावर दरोडा, १५ कोटी लुटीचं बिहार कनेक्शन; ५ सशस्त्र गुन्हेगारांनी २० मिनिटांत डाव साधला
7
लहानपणी वडिलांना गमावलं, आईनं शाळेत झाडू मारून शिकवलं; आज मुलगा शिक्षण मंत्रालयात बनला अधिकारी
8
JNPT बंदरात भीषण स्फोट! केमिकल प्लांटमध्ये ब्लास्ट; धुराचे लोट लांबपर्यंत
9
लोकसभेतील ५४३ जागांसाठी का लागू होऊ शकत नाही महिला आरक्षण, सरकार अन् विरोधकांचे दावे काय?
10
"जितेंद्र शेळके यांचा मृत्यू अपघात की घातपात?" अंजली दमानिया यांनी उपस्थित केले खळबळजनक प्रश्न
11
छत्तीसगढप्रकरणी अनिल अग्रवालांवर FIR, समर्थनार्थ उतरले नवीन जिंदल; म्हणाले, "ही दु:खद..."
12
तुम्हालाही रात्री २-३ वाजता अचानक खूप भूक लागते, रोजची सवय की शरीर देतंय धोक्याचा इशारा?
13
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला शेगडी पूजनाची हमी, अन्नपूर्णेच्या आशीर्वादाने धन-धान्य पडणार नाही कमी!
14
IPL Record : विक्रमी सेंच्युरीसह RCB नं रचला इतिहास; MI आणि CSK ला नाही जमलं ते त्यांनी करून दाखवलं
15
PM नरेंद्र मोदी आज रात्री ८.३० वाजता देशाला संबोधित करणार; महिला आरक्षणावर बोलण्याची शक्यता
16
परशुराम जयंती २०२६: महेंद्रगिरीवरील भगवान परशुराम मंदिराचा थक्क करणारा इतिहास माहितीय का?
17
हिरव्या जर्सीत कसा आहे RCB चा रेकॉर्ड? विराटसह एकाही भारतीयाला मिळाला नाही 'मॅन ऑफ द मॅच' पुरस्कार
18
UPI द्वारे सतत पैसे भरल्यानं तुमचा Credit Score कमी होतो का; काय आहे यामागचं सत्य?
19
अक्षय्य तृतीया २०२६: अक्षय्य तृतीयेला 'या' मुहूर्तावर करा शास्त्रोक्त पूजा; धन, धान्य संपत्तीत होईल वाढ!
20
Strait of Hormuz Closed : जगाची चिंता वाढणार! इराणने होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा केली बंद; तेलाचा पुरवठा विस्कळीत; महागाईचा भडका उडणार?
Daily Top 2Weekly Top 5

प्रतिकूल परिस्थितीत यशस्वी ठरल्याने आत्मविश्वास वाढला

By admin | Updated: February 22, 2016 01:12 IST

नुकत्याच झालेल्या दक्षिण आशियाई क्रीडा स्पर्धेत (सॅग) भारतीय संघात समावेश असल्याने कर्णधार अनुप कुमार, विशाल माने, मोहित चिल्लर आणि सुरेंद्र नाडा या अव्वल चार खेळाडूंना

- रोहित नाईक,  जयपूरनुकत्याच झालेल्या दक्षिण आशियाई क्रीडा स्पर्धेत (सॅग) भारतीय संघात समावेश असल्याने कर्णधार अनुप कुमार, विशाल माने, मोहित चिल्लर आणि सुरेंद्र नाडा या अव्वल चार खेळाडूंना काही वेळ प्रो कबड्डीपासून दूर राहावे लागले होते. यामुळे गतविजेता यू मुंबा संघ एकाकी दुबळा वाटू लागला. या संधीचा फायदा घेण्यासाठी प्रतिस्पर्धी संघ आसुसलेले होते. मात्र झाले भलतेच. यू मुंबाच्या खेळाडूंनी कोणतेही दडपण न घेता सलग तीन सामने जिंकताना आपली मजबूत राखीव फळी सिद्ध केली. विशेष म्हणजे यू मुंबाचा आघाडीचा खेळाडू रिशांक देवाडिगाने या तिन्ही सामन्यांत महत्त्वपूर्ण भूमिका बजावताना संघासाठी निर्णायक कामगिरी केली. यानिमित्ताने त्याने ‘लोकमत’शी बातचीत करताना यामुळे सध्या वेगळाच आत्मविश्वास मिळाल्याची प्रतिक्रिया दिली आहे.चार प्रमुख खेळाडूंच्या अनुपस्थितीचे दडपण होतेच. मात्र नवोदितांवर विश्वासही होता. त्यांना कुठे आणि कसे खेळवायचे याची रणनीती सुरू असताना आपण स्वत:हून जबाबदारी घ्यावी अशी जाणीव झाली. मी संघासाठी स्वत:ला झोकून दिले. यामध्ये यशस्वी झाल्याचा खूप आनंद आहे आणि आता चारही स्टार खेळाडूंचे पुनरागमन झाल्याने संघ जबरदस्त मजबूत झाला आहे. शिवाय संघाची जबाबदारी स्वत:हून घ्यायची असल्याने केवळ माझा नैसर्गिक खेळ केला आणि यामुळे जी लय मिळाली तीच लय आता पुढे कायम ठेवायची आहे, असे रिशांकने या वेळी सांगितले. बोनसचा बादशाह अनुप कुमारच्या अनुपस्थितीत रिशांकने यू मुंबासाठी बोनस गुणांची कमाई केली. स्पर्धेच्या सुरुवातीला पटनाविरुद्ध पराभव झालेला असल्याने या वेळी त्या चुका टाळण्याचे लक्ष्य होते आणि तेच आम्ही केले. पटनाच्या आक्रमकांना तिसऱ्या रेडमध्ये पकडण्याची आमची रणनीती होती आणि ते त्यामध्ये सहज अडकले. यापुढेही प्रत्येक संघाविरुद्धची रणनीती तयार असून, मुंबईकरांनी असाच पाठिंबा आम्हाला कायम द्यावा आणि त्या जोरावर आम्ही नक्कीच यशस्वी होऊ- रिशांक देवाडिगा, यू मुंबा