वडिलांनी 6 लाखांचं काढलं कर्ज अन् मुलीने मारला गोल्डन 'पंच', जाणून घ्या नीतूची 'यशस्वी कहाणी'

By ऑनलाइन लोकमत | Published: March 26, 2023 07:48 PM2023-03-26T19:48:50+5:302023-03-26T19:49:26+5:30

WBC 2023 : सध्या भारतात जागतिक महिला बॉक्सिंग चॅम्पियनशिपचा थरार रंगला आहे. 

 Haryana's Nitu Ghanghas won gold medal in Women's World Boxing Championship   | वडिलांनी 6 लाखांचं काढलं कर्ज अन् मुलीने मारला गोल्डन 'पंच', जाणून घ्या नीतूची 'यशस्वी कहाणी'

वडिलांनी 6 लाखांचं काढलं कर्ज अन् मुलीने मारला गोल्डन 'पंच', जाणून घ्या नीतूची 'यशस्वी कहाणी'

googlenewsNext

nitu ghanghas father । नवी दिल्ली : सध्या भारतात जागतिक महिला बॉक्सिंग चॅम्पियनशिपचा (Women's World Boxing Championship) थरार रंगला आहे. या स्पर्धेत भारताच्या नीतू घनघासने कारकिर्दीतील पहिले सुवर्णपदक मिळवले. नीतूने 48 किलो वजनी गटात मंगोलियाच्या लुत्सायखान अल्तानसेतसेगचा 5-0 असा दारूण पराभव केला आणि जागतिक स्पर्धेत सुवर्णपदक जिंकणारी भारताची 6वी महिला बॉक्सर ठरली. खरं तर नीतूची आदर्श ही भारताची मेरी कोम आहे, जिने 6 वेळा वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये पदके जिंकली आहेत. विजयानंतर नीतूने आपले पदक देशाला समर्पित केले. त्याचबरोबर वडिलांनी केलेल्या संघर्षाच्या आठवणींना देखील उजाळा दिला.

वडिलांनी नोकरीवरून सुट्टी घेतली
नीतूचा बॉक्सिंग चॅम्पियनशिपमध्ये सुवर्णपदक जिंकण्यापर्यंतचा प्रवास सोपा नव्हता. यासाठी हरयाणातील भिवानी जिल्ह्यातील धनना गावात 19 ऑक्टोबर 2000 रोजी जन्मलेल्या नीतूच्या कुटुंबीयांनी तिला खूप पाठिंबा दिला. ज्यामध्ये नीतूचे वडील जय भगवान यांनी आपल्या मुलीला बॉक्सर बनवण्यासाठी चंदीगडमध्ये हरयाणा राज्यसभेतून सुट्टी घेतली होती. यावेळी त्यांना सुट्ट्यांचे पैसे मिळणे बंद झाले होते.

बसचे भाडे भरायला पैसे नव्हते
नीतूला देखील आर्थिक संघर्षाला सामोरे जावे लागले. स्पोर्ट्स तकशी बोलताना नीतूने म्हटले, "माझ्या आयुष्यात खूप आर्थिक समस्या आल्या. कधी कधी असे व्हायचे की गावापासून भिवानीपर्यंत बसने प्रवास करायला पैसे नसायचे. तरीही या अडचणींनीच मला इतके मजबूत केले की मी हे स्थान प्राप्त करू शकले." 

वडिलांनी काढलं कर्ज
नीतूच्या प्रशिक्षणासाठी तिच्या वडिलांनी केवळ नोकरीतून सुट्टी घेतली नाही तर शेतीही सुरू केली आणि खर्च भागवण्यासाठी सुमारे सहा लाख रुपयांचे कर्जही घेतले. जेणेकरून ते नीतूच्या जेवणावर आणि तिच्या प्रशिक्षणावर पैसे खर्च करू शकतील. यामुळेच पदक जिंकल्यानंतर नीतू म्हणाली, "पदक जिंकेपर्यंत अनेक अडचणी आल्या. माझ्या वडिलांनी मला खूप साथ दिली आणि नोकरी सोडून मला या खेळात साथ दिली. सुवर्णपदक जिंकण्याच्या प्रवासापर्यंत मला साथ दिल्याबद्दल माझ्या वडिलांचे आणि संपूर्ण कुटुंबाचे आभार मानू इच्छिते."

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम" 

Web Title:  Haryana's Nitu Ghanghas won gold medal in Women's World Boxing Championship  

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.