शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
3
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
4
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
5
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
6
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
7
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
8
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
9
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
10
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
11
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
12
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
13
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
14
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
15
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
16
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
17
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
18
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
19
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
20
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
Daily Top 2Weekly Top 5

Haryana Election Result : विनेश फोगाटने राजकारणातील 'कुस्ती' जिंकली; आमदार होताच आनंद गगनात मावेना

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 8, 2024 13:48 IST

Vinesh Phogat Haryana Election 2024 : हरयाणा विधानसभेच्या निवडणुकीत विनेश फोगाटचा विजय झाला.

vinesh phogat election result live : माजी कुस्तीपटू विनेश फोगाटने काँग्रेसच्या तिकिटावर विजय मिळवत आमदार होण्याचा मान पटकावला. माजी भारतीय महिला कुस्तीपटू विनेश फोगाटने राजकारणात प्रवेश करताच आपल्या प्रतिस्पर्ध्यांचा पराभव केला. हरयाणा विधानसभा निवडणूक २०२४ मध्ये काँग्रेसने विनेश फोगाटला जिंद जिल्ह्यातील जुलाना मतदारसंघातून उमेदवारी दिली होती. विनेशचा सहकारी कुस्तीपटू बजरंग पुनिया याने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवरून विनेशच्या विजयाची माहिती दिली. विजयी होताच विनेशसह तिच्या सहकाऱ्यांनी एकच जल्लोष केला. 

बजरंग पुनियाने सोशल मीडियाच्या माध्यमातून म्हटले की, देशाची मुलगी विनेश फोगाट विजयी झाल्याबद्दल तिचे खूप खूप अभिनंदन. ही लढत फक्त एका जुलाना जागेसाठी नव्हती किंवा इतर ३-४ उमेदवारांविरोधात नव्हती. ही फक्त पक्षाची लढाई नसून, ही लढत देशातील सर्वात मजबूत अत्याचारी शक्तींविरुद्ध होती आणि यात विनेश विजयी झाली. विनेश फोगाटला एकूण ६५,०८० मते मिळाली, तर भाजप उमेदवार योगेश कुमार यांना ५९,०६५ मतदान झाले. इंडियन नॅशनल लोक दलाचे सुरेंदर लाथेर १०,१५८ मतांसह तिसऱ्या क्रमांकावर राहिले. विशेष बाब म्हणजे विनेशने आपल्या पहिल्याच निवडणुकीत ६,०१५ मतांनी विजय साकारला. 

दरम्यान, २०२४ च्या पॅरिस ऑलिम्पिकमध्ये विनेश फोगाटला मोठा धक्का बसला होता. कुस्तीपटू विनेशने ऑलिम्पिकमध्ये महिलांच्या ५० किलो वजनी गटात भाग घेतला होता. तिने चमकदार कामगिरी करत अंतिम फेरीत स्थान निश्चित केले, परंतु अंतिम सामना सुरू होण्यापूर्वी विनेशचे वजन १०० ग्रॅमने वाढले अन् तिला अपात्र घोषित करण्यात आले.

टॅग्स :Vinesh Phogatविनेश फोगटcongressकाँग्रेसharyana assembly election 2024हरियाणा विधानसभा निवडणूक २०२४BJPभाजपा