मंदारची दमदार हॅट्ट्रिक
By Admin | Updated: June 17, 2015 01:45 IST2015-06-17T01:45:03+5:302015-06-17T01:45:03+5:30
नुकताच झालेल्या मुंबई जिल्हा मानांकन टेबल टेनिस स्पर्धेमध्ये मंदार हर्डीकरने तुफानी खेळाच्या जोरावर तिहेरी विजेतेपद पटकावण्याची

मंदारची दमदार हॅट्ट्रिक
मुंबई : नुकताच झालेल्या मुंबई जिल्हा मानांकन टेबल टेनिस स्पर्धेमध्ये मंदार हर्डीकरने तुफानी खेळाच्या जोरावर तिहेरी विजेतेपद पटकावण्याची कामगिरी केली आहे. तर दुसरीकडे आश्लेषा त्रेहाननेदेखील दोन गटांत वर्चस्व राखताना दुहेरी विजेतेपदाला गवसणी घातली.
मुंबई शहर जिल्हा टेबल टेनिस संघटनेच्यावतीने झालेल्या या स्पर्धेत मंदारने आपली विजयी घोडदौड कायम राखताना ज्युनियर गटात अनुभवी मुदीत दाणी याचा ११-०७, १२-१०, ०४-११, १२-१०, ११-०९ असा पाडाव केला. यानंतर युवा गटात देखील मंदारने पुन्हा एकदा मुदीतचा मुदिरचा ११-०९, ०८-११, ११-०९, ११-०८, ११-०७ असा धुव्वा उडवून विजेतेपदाला गवसणी घातली. त्याचवेळी हाच धडाका त्याने पुरुष गटाच्या अंतिम सामन्यात देखील कायम राखताना परेश मुरेकरचा १३-११, ११-०८, ११-०६, ११-०९ असा फडशा पाडून स्पर्धेत ‘ट्रिपल धमाका’ केला.
मुलींमध्ये आश्लेषा त्रिहानने ज्युनियर व युवा गटातबाजी मारताना विजेतेपदांचा ‘डबल स्मॅश’ मारला. ज्युनियर गटाच्या अंतिम सामन्यात तीने कसलेल्या मानसी चिपळुणकरचे आव्हान ११-०७, ११-०३, २१-१९, ११-०अ९ असे परतावून शानदार विजेतेपद पटकावले. यानंतर युवा गटात देखील पुन्हा मानसीला १३-११, ११-०५, ११-०४, ०५-११, ०८-१, ११-०७ असा धक्का देत दुसरे विजेतेपद जिंकले.