शहरं
Join us  
Trending Stories
1
“उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांसोबत केले, तेच आदित्य करताहेत”; शिंदेंच्या नेत्यांनी इतिहास काढला
2
LPG Gas Cylinder Booking Rules : गॅस सिलिंडर बुकिंगशी संबंधित २ नवीन अपडेट्स, एलपीजी पुरवठ्याबाबत सरकारने काय सांगितले? जाणून घ्या
3
Latest Marathi News LIVE Updates: भीषण अपघात! पंजाबमध्ये भाविकांनी भरलेली बस उलटली
4
Heatwave Alert: सावधान...! उष्णतेच्या लाटेसारखी स्थिती; विदर्भात ४२, मराठवाडा, मध्य महाराष्ट्रात ३८-४० तर कोकणात ३४-३६ अंश सेल्सिअसची नोंद
5
Savita Pradhan : "नवरा छळायचा, बादलीत लघवी करुन अंगावर फेकली", IAS सविता प्रधान सांगतात असह्य छळ
6
"तर महाराष्ट्राला मोठी किंमत चुकवावी लागेल"; विजय वडेट्टीवार यांचा महायुतीला सूचक इशारा
7
'या' दिग्गज टेक कंपनीकडून भारतीय कर्मचाऱ्यांना मोठं गिफ्ट: ५ लाखांपासून १ कोटीपर्यंत मिळणार बोनस
8
आता प्रवासावेळी टायर फाटलं तरी टेन्शन नाही...! या नव्या SUV ची जोरदार चर्चा; फीचर्सही भन्नाट
9
Home Decoration: मातीची गरज नाही, फक्त हवी काचेची बरणी आणि रोपटं! 'वॉटर गार्डनिंग'ने बदला घराचा लूक
10
छ. संभाजीनगर, वाठार, पेठवडगाव, जयसिंगपूर ४ बस स्थानकांचे उद्घाटन; प्रताप सरनाईकांचा दौरा
11
पाकिस्तान कोणता खेळ खेळतंय? इराण युद्ध काळात तुर्की, सौदी अन् कतारला चाललेत PM शहबाज शरीफ
12
'देखणी नवरी मिळेल' सांगितलं अन् ७ हजार जणांना लुटलं; लोकांना फसवणाऱ्या मॅट्रिमोनियल साईटचा असा झाला गेम!
13
अमरावतीत 'योगी स्टाईल' कारवाई! अश्लील व्हिडीओ प्रकरणातील आरोपी अयानला दणका, घरावर बुलडोझर
14
होर्मुझनंतर आता 'मलक्का'वर अमेरिकेची नजर; ट्रम्प यांची नवी खेळी! भारतासाठी ठरणार गेमचेंजर?
15
“सुनेत्रा काकींना ९९% मतदान होईल, अजितदादांना स्मरून मतदान करा”; रोहित पवार प्रचाराला लागले
16
आदित्य ठाकरे आता उद्धवसेनेचे कार्याध्यक्ष होणार?; संजय राऊतांचे सूचक विधान, चर्चांना उधाण
17
कोविड लसींच्या सक्तीमुळे शेन वॉर्नचा मृत्यू, मुलाचा खळबळजनक दावा
18
Vastu Tips: घरात ठेवलेली रोपं केवळ शोभेची वस्तू नाहीत, ती निर्माण करतात 'लाईव्ह एनर्जी'; वाचा वास्तू रहस्य
19
चीनला इराणकडून तेल खरेदी करू देणार नाही; ट्रम्प यांच्या निकटवर्तीयाने दिली मोठी धमकी
20
मोबाईल दुकानदार होता टार्गेट, बळी गेला व्यापाऱ्याचा; कोल्हापुरात खंडणीसाठी बॅटरीचा शॉक देऊन हत्या
Daily Top 2Weekly Top 5

हरभजनसिंग अडचणीत!

By admin | Updated: February 19, 2016 02:56 IST

आपल्या आईच्या नावे भज्जी स्पोर्ट्स ही कंपनी चालविणारा टीम इंडियाचा अनुभवी फिरकी गोलंदाज हरभजनसिंग दुटप्पी भूमिकेप्रकरणी (कॉन्फ्लिक्ट आॅफ इंटरेस्ट) अडचणीत येऊ शकतो

अनवी दिल्ली : आपल्या आईच्या नावे भज्जी स्पोर्ट्स ही कंपनी चालविणारा टीम इंडियाचा अनुभवी फिरकी गोलंदाज हरभजनसिंग दुटप्पी भूमिकेप्रकरणी (कॉन्फ्लिक्ट आॅफ इंटरेस्ट) अडचणीत येऊ शकतो. माहिती अधिकार कार्यकर्ते नीरज गुंडे यांनी उपस्थित केलेल्या मुद्द्यांची चौकशी बीसीसीआयचे लोकपाल सेवानिवृत्त न्या. ए. पी. शाह करीत आहेत. शाह यांच्या चौकशीमुळे वादाच्या भोवऱ्यात अडकण्याआधी भज्जीने कायदेशीर सल्ला घेण्याचे धोरण अवलंबिले आहे. नीरजने लोकपाल कार्यालयात दाखल केलेल्या तक्रारीत, स्थानिक संघांना पोशाख पुरविणाऱ्या भज्जी स्पोर्ट्सची मालकी हरभजनची आई अवतार कौर यांच्याकडे आहे. हरभजनला लोकपालांनी मेल पाठविला. यावर भज्जी म्हणतो, ‘‘मी कायदेशीर सल्ला घेत आहे. सल्ल्यानुसार काम करीन.’’बीसीसीआयच्या वरिष्ठ अधिकाऱ्याकडे याबाबत विचारणा करताच हा अधिकारी म्हणाला, ‘‘भज्जी मालक नसेल तर मग कुणीही कंपनी चालवू शकतो. भज्जीचे नाव कुठे नसेल, तर दुटप्पी भूमिकेचा प्रश्नच उद्भवत नाही.’’दुसरीकडे, माजी कर्णधार सौरभ गांगुली याला लोकपालाकडून दिलासा मिळाला. गांगुली हा अ‍ॅटलिटिको डी कोलकाता फुटबॉल संघाचा मालक आहे. पुणे आयपीएल संघ खरेदी करणाऱ्या मालकांसोबत सौरभ जुळला असल्याचे प्रकाशित झाले. गांगुलीचा रायझिंग पुणे सुपरजायंट्सशी व्यावसायिक संबंध नसल्याने लोकपालांनी हे प्रकरण दुटप्पी नसल्याचे स्पष्ट केले. गांगुलीविरुद्ध दुटप्पी भूमिकेचे प्रकरण ठरत नसल्याने निकाली काढण्यात येत असल्याचे शाह यांनी स्पष्ट केले. (वृत्तसंस्था)