Happy Birthday Narendra Modi : मराठमोळ्या शितल महाजनची 13 हजार फुटावरून उडी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 17, 2018 13:35 IST2018-09-17T13:29:01+5:302018-09-17T13:35:35+5:30
Happy Birthday Narendra Modi: मराठमोळी स्कायडाव्हर आणि पद्मश्री शितल महाजन यांनी पुन्हा एकदा १३ हजार फुट उंचीवरुन थरारक उडी घेत लक्ष वेधले आहे. यावेळी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ६८व्या वाढदिवसाचे औचित्य साधून त्यांना अनोख्या पद्धतीने शुभेच्छा देण्यासाठी १७ सप्टेंबरला शिकागो येथे १३ हजार फुट उंचावरुन यशस्वी उडी घेतली.

Happy Birthday Narendra Modi : मराठमोळ्या शितल महाजनची 13 हजार फुटावरून उडी
रोहित नाईक
मुंबई : मराठमोळी स्कायडाव्हर आणि पद्मश्री शितल महाजन यांनी पुन्हा एकदा १३ हजार फुट उंचीवरुन थरारक उडी घेत लक्ष वेधले आहे. यावेळी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ६८व्या वाढदिवसाचे औचित्य साधून त्यांना अनोख्या पद्धतीने शुभेच्छा देण्यासाठी १७ सप्टेंबरला शिकागो येथे १३ हजार फुट उंचावरुन यशस्वी उडी घेतली.
तिंरगी सूट परिधान केलेल्या शितल यांनी विमानातून उडी घेतल्यानंतर हातात मोदी यांना वाढदिवसाचे शुभेच्छापत्र धरले होते. आतापर्यंत सहा विश्वविक्रम आणि १७ राष्ट्रीय विक्रम नोंदवलेल्या शितल यांना अद्याप मोदी यांच्याशी भेट घेता आलेली नाही. गेल्या चार वर्षांपासून मोदी यांना भेटण्यासाठी शितल यांचे प्रयत्न सुरु आहेत. परतु, पंतप्रधान कार्यालयातून कोणतेही उत्तर शितल यांना मिळत नव्हते. त्यामुळेच मोदी यांच्या वाढदिवसांचे औचित्य साधून शितल यांनी १३ फुट उंचावरुन उडी घेतली. या प्रयत्नानंतर आपली इच्छा पूर्ण होईल, अशी अशाही शितल यांनी ‘लोकमत’कडे व्यक्त केली.
दरम्यान, शितल सध्या अमेरिकेच्या राष्ट्रीय स्कायडायव्हिंग अजिंक्यपद स्पर्धेत सहभागी होण्यासाठी तेथे गेल्या आहेत. यावेळी शितल यांनी भारतीय संघातील अन्य पॅराजम्पर सुदीप कोडावती (कॅमेरामन) यांच्यासह यशस्वी उडी घेत मोदींना वाढदिवसच्या शुभेच्छा दिल्या. सुदीप गेल्या ८ वर्षांपासून शिकागो येथे वास्तव्यास असून आंतरराष्ट्रीय पॅराजम्पिंग आणि स्कायडायव्हिंग खेळात ते भारताचे प्रतिनिधित्त्व करत आहेत.
काही महिन्यांपूर्वीच शितल यांनी मराठमोठ्या संस्कृतीचे दर्शन करुन देताना चक्क नऊवारी साडी नेसून स्कायडायव्हींग केली होती. त्यावेळी त्यांचा व्हिडिओ सोशल मिडियावर चांगलाच व्हायरल झाला होता.