शहरं
Join us  
Trending Stories
1
Mamata Banerjee : राजकारण तापलं! "भाजपा ५००-७०० मतांनी पुढे असेल तर..."; ममता बॅनर्जींचा कार्यकर्त्यांना आदेश
2
Delhi Vivek Vihar Fire : Video - भीषण अग्नितांडव! "...तर लोकांचा जीव वाचला असता"; प्रत्यक्षदर्शीने सांगितला थरार
3
"या नराधमाचा हा तिसरा गुन्हा, आधी दोनदा जामीन कसा मिळाला?"; सुप्रिया सुळेंचा यंत्रणेला सवाल
4
समोरासमोर आले नागा चैतन्य अन् समंथा? रिसेप्शन पार्टीला आपापल्या पार्टनरसोबत लावली हजेरी
5
Delhi Fire: दिल्लीत अग्नितांडव! एसीचा स्फोट होऊन भीषण आग, ९ जणांचा होरपळून मृत्यू
6
आजचे राशीभविष्य, ०३ मे २०२६: कुंभ, मकर राशीला भाग्याची साथ; जाणून घ्या तुमचा आजचा दिवस
7
इराणला 'टोल' दिला तर खैर नाही! अमेरिकेचा जगाला सज्जड दम, सर्व जहाज कंपन्यांवर बंदीची टांगती तलवार
8
Nasrapur Case: "अशा विकृत प्रवृत्तीच्या गुन्हेगारांवर..." नसरापूर घटनेवर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांची संतप्त प्रतिक्रिया
9
"दुनिया हिला देंगे हम!" संघर्षातही मुंबई इंडियन्सने रचला नवा इतिहास; टी-२० विश्वात असा अद्वितीय पराक्रम करणारा पहिला संघ
10
"त्या नराधमाचा एन्काऊन्टर झाला तरच मानू की हे सरकार...", नरसापूर घटनेनंतर प्रवीण तरडे संतापले, सरकाला दिला अल्टिमेटम
11
'बीएच' सिरीज नंबर घेतला, पण कर भरायला विसरले !मुंबईत वाहनधारकांना बसला लाखो रुपयांचा दंड
12
Raja Shivaji Box Office: 'राजा शिवाजी'चं बॉक्स ऑफिसवर वादळ! दुसऱ्या दिवशीही बक्कळ कमाई
13
रस्त्याच्या कामात भीषण अपघात! क्रेनचा प्लॅटफॉर्म तुटून २ कामगारांचा जागीच मृत्यू
14
भोंदू खरात बिल्डरच्या खर्चाने फिरून आला तब्बल २१ देश;नवव्या गुन्ह्यात आणखी ४ दिवसांची पोलिस कोठडी
15
होर्मुझला पर्याय काय? इराणच्या दहशतीखाली जगाची 'लाईफलाईन' अडकली
16
मोबाइलवर वाजला अचानक वॉर्निंग सायरन अन् पसरली घबराट; 'सेल ब्रॉडकास्ट अलर्ट' प्रणाली देशभरात लाँच
17
मतमोजणी कर्मचाऱ्यांच्या निवडीचा निवडणूक आयोगाला अधिकार; तृणमूल काँग्रेसच्या याचिकेवर निकाल
18
छत्तीसगड : भूसुरुंग निकामी करताना चार जवान शहीद;'माओवाद मुक्ती'च्या केंद्राच्या घोषणेला धक्का
19
भाईंदरमधील २२० एकर मिठागरांवरील केंद्राचा दावा उच्च न्यायालयाने फेटाळला; जमीन खासगी व्यक्तीची असल्याचे स्पष्टीकरण
Daily Top 2Weekly Top 5

चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये पदक पटकावण्याचे लक्ष्य

By admin | Updated: June 1, 2016 03:31 IST

लंडनमध्ये आयोजित एफआयएच चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेत अव्वल तीनमध्ये स्थान मिळविण्याचे लक्ष्य असल्याचे भारतीय हॉकी संघाचे मुख्य प्रशिक्षक रोलँट ओल्टमेन्स यांनी सांगितले

बंगळुरू : लंडनमध्ये आयोजित एफआयएच चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेत अव्वल तीनमध्ये स्थान मिळविण्याचे लक्ष्य असल्याचे भारतीय हॉकी संघाचे मुख्य प्रशिक्षक रोलँट ओल्टमेन्स यांनी सांगितले. आम्ही लौकिकाला साजेशी कामगिरी केली, तर चॅम्पियन ट्रॉफी स्पर्धेत पदक पटकावण्याची चांगली संधी आहे, असेही ते म्हणाले. ओल्टमेन्स यांनी सांगितले, की आम्ही बाद फेरीत चांगले खेळतो, याची सर्वांना कल्पना आहे; पण चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धा या वेळी थोडी वेगळी आहे. अंतिम फेरीत खेळण्यासाठी अव्वल दोनमध्ये, तर कांस्यपदकासाठी खेळण्यासाठी अव्वल चारमध्ये स्थान मिळविणे आवश्यक आहे. आमचे खेळाडू आव्हानाला कसे सामोरे जातात, याची उत्सुकता आहे. आघाडीच्या ३ संघांमध्ये स्थान मिळविण्याची आम्हाला आशा आहे.भारतीय संघाला या स्पर्धेत १० जून रोजी सलामी लढतीत विद्यमान आॅलिम्पिक चॅम्पियन जर्मनीच्या आव्हानाला सामोरे जावे लागेल. ओल्टमेन्स म्हणाले, ‘‘संघाचे यश बचावफळीच्या कामगिरीवर अवलंबून आहे. अशी वेळ येते, की सामना जिंकण्यासाठी तुम्ही खूप गोल करू शकत नाही; पण प्रतिस्पर्धी संघाला गोल करण्यापासून रोखणे शक्य असते. जर्मन संघाचा बचाव चांगला आहे, तर आॅस्ट्रेलियाचा बचाव अन्य संघांच्या तुलनेत अपारंपरिक असतो. अर्जेंटिना संघ अनुकूल निकालासाठी बचावावर अवलंबून असतो. याच्या जोरावर त्यांनी विश्वकप स्पर्धेत कांस्यपदक पटकावले. आमच्या पूर्ण संघाला बचावावर मेहनत घेणे गरजेचे आहे. आमच्या आघाडीच्या फळीतील काही खेळाडूंचा बचावही चांगला आहे. (वृत्तसंस्था)