जर्मनीने घानाला रोखले

By Admin | Updated: June 22, 2014 11:32 IST2014-06-22T03:20:22+5:302014-06-22T11:32:44+5:30

फिफा वर्ल्डकपमध्ये घानाने बलाढ्य जर्मनीला रोखण्यात यश मिळवले असून हा सामना अनिर्णित अवस्थेत संपला.

Germany blocked Ghana | जर्मनीने घानाला रोखले

जर्मनीने घानाला रोखले

>ऑनलाइन टीम 
सांता आन्द्रे, दि. २२ - फिफा वर्ल्डकपमध्ये घानाने बलाढ्य जर्मनीला रोखण्यात यश मिळवले असून हा सामना २-२ अशा अनिर्णित अवस्थेत संपला.
 
 
फिफा विश्वचषकामध्ये आता रंगत पाहायला मिळत आहे. फ्रान्सविरूध्द स्वित्झर्लंड यांच्यात झालेल्या कालच्या लढतीत  दोन्ही संघाने केलेल्या एकूण ७ गोलचा थरार संपूर्ण जगाने अनुभवला असतानाच आज त्याचा प्रत्यय जर्मनीविरूध्द घाना यांच्यात झालेल्या सामन्यावेळी अनुभवयाला मिळाला. ६३ व्या मिनिटात घाणाने आघाडी घेतली असतानाच जर्मनीने ७१व्या मिनिटाला गोल करीत घाणाला विजयापासून रोखले आणि हा सामना अनिर्णित अवस्थेत संपला. 
सामना सुरू झाल्यानंतर ५१व्या मिनिटाला जर्मनीच्या गॉटझने गोल करीत संघाला आघाडी मिळवून दिली. त्यानंतर ५३व्या मिनिटाला घानाच्या ए.यॉ याने ५४ व्या मिनिटाला गोल करीत जर्मनीविरूध्द खेळताना संघाला १-१ अशी बरोबरी साधून दिली. ६३ व्या मिनिटाला घानाच्या ए.जीयानने ६३ व्या मिनिटाला गोल करीत संघाला २-१ अशी आघाडी मिळवून दिली. त्यानंतर जर्मनीच्या क्लोसने ७१ व्या मिनिटाला गोल केला करीत २-२ अशी बरोबरी साधून घानाला विजयापासून रोखले. 

Web Title: Germany blocked Ghana