शहरं
Join us  
Trending Stories
1
"इराण तुम्हाला दोन मिनिटात उद्ध्वस्त करेल", अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प इटलीच्या पंतप्रधान मेलोनींवर भडकले 
2
IPL 2026 : चुकांवर चुका! तरीही CSK नं मारली बाजी; KKR च्या विजयाची पाटी अजूनही कोरीच
3
१८ अश्लील व्हिडीओ, ३९ फोटो आणि ८ तरुणींची पटली ओळख; अमरावतीत अयान अहमदसह साथीदाराने कळस गाठला
4
होर्मुझवरुन इराणसोबत तणाव वाढला! पंतप्रधान मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात ४० मिनिटे चर्चा
5
नूरचं अनोख सेलिब्रेशन! अजिंक्य रहाणे पाठोपाठ IPL मधील महागड्या खेळाडूला स्वस्तात तंबूत धाडले; अन्....
6
'राज्य सरकारचा निर्णय एकतर्फी, लोकशाहीविरोधी', बाजार समिती संचालक मंडळ बरखास्तीवर जयंत पाटील संतापले
7
सरसंघचालक भागवत यांनी घेतली माजी सरन्यायाधीश शरद बोबडे यांची सदिच्छा भेट
8
युद्धाचा मोठा फटका! इराणचं २७० अब्ज डॉलर्सचं नुकसान; या ५ आखाती देशांकडे मागितली भरपाई
9
लोकसभेतील खासदारांची संख्या ८५० पर्यंत वाढणार, महाराष्ट्रातून किती निवडून जाणार? केंद्राने तयार केला मसुदा
10
षटकार खाल्ला, मग Kartik Tyagi नं १४८.१ kmph वेगासह त्रिफळा उडवत घेतला Sanju Samson चा बदला
11
डीआरआयचे 'सिमोल्लंघन'; कोकेन प्रकरणात दिल्ली, बेंगळुरू आणि हैदराबादवर नजर, तस्करांविरुद्ध जोरदार आघाडी
12
मध्य पूर्वेतील तणाव : इटलीचा इस्रायलला मोठा दणका! पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी सर्व संरक्षण करार रोखले
13
शेतकऱ्याने मृत्युला कवटाळले, पोस्टमार्टमसाठी नातेवाईक दोन तास ताटकळले; बीड जिल्ह्यातील घटना
14
CSK साठी डोकेदुखी ठरतोय Ruturaj Gaikwad चा खराब फॉर्म; कमबॅक करण्यासाठी आता एकच मार्ग उरला
15
7 वर्षांपासून बेपत्ता! 10 हजार डॉलर्सचे बक्षीस, 'या' भारतीय विद्यार्थिनीला FBI का शोधतेय? जाणून घ्या...
16
पेट्रोल १८ तर डिझेल ३५ रुपयांनी महागणार?; ५ राज्यांच्या निवडणुकीनंतर दर वाढण्याची शक्यता
17
"मी आंबेडकरांची फॅन आहे", चिन्मयी सुमीतनं स्पष्टच सांगितलेलं 'जय भीम' म्हणण्यामागचं कारण
18
छत्तीसगडमधील वेदांता पॉवर प्लांटमध्ये बॉयलर स्फोटात १० जण ठार, अनेक जण जखमी
19
IPL 2026 : आधी एका रात्रीत दोन 'क्षेपणास्त्र' लॉन्च केली; आता काव्या मारनच्या SRH नं खेळला नवा डाव
20
आरजेडी-जेडीयूमध्ये पंख विस्तारले, भाजपामध्ये येऊन बनले मुख्यमंत्री; कोण आहेत सम्राट चौधरी?
Daily Top 2Weekly Top 5

फ्रेंच ओपन : मरे तिसऱ्या फेरीत

By admin | Updated: June 2, 2017 00:54 IST

गतवर्षीचा उपविजेता ब्रिटनचा अँडी मरे फ्रेंच ओपन टेनिस स्पर्धेच्या तिसऱ्या फेरीत पोहचला आहे. आज येथे झालेल्या सामन्यात

पॅरीस : गतवर्षीचा उपविजेता ब्रिटनचा अँडी मरे फ्रेंच ओपन टेनिस स्पर्धेच्या तिसऱ्या फेरीत पोहचला आहे. आज येथे झालेल्या सामन्यात मरेने स्लोव्हाकियाच्या मार्टिन क्लिझानवर ६-७ (३-७), ६-२, ६-२, ७-६ (७-३) असा विजय मिळवला. दुसरीकडे पाच वर्षांनंतर पॅरीसमध्ये खेळणारा जुआन मार्टिन डेल पेट्रो याला निकोलस अलमार्गो याच्या दुखापतीनंतर शेवटच्या ३२ खेळाडूंमध्ये स्थान मिळाले. तिसऱ्या फेरीत अँडी मरे आणि डेल पेट्रो यांच्यात शनिवारी होणारी लढत रोमहर्षक असेल असा अंदाज आत्तापासुनच व्यकत होत आहे.पन्नासावे मानांकित क्लिझानने ५७ विनर्स लगावले परंतु अग्रमानांकित मरे याने आपला अनुभव पणाला लावत क्लिझानचे प्रयत्न व्यर्थ ठरवले. स्पेनचा ३१ वर्षीय टेनिसपटू निकोलस अरमार्गो याला डाव्या गुडघ्याला झालेल्या दुखापतीमुळे त्याने सामन्यातून माघार घेतली, त्यामुळे डेल पेट्रो याला तिसऱ्या फेरीत स्थान मिळाले. सामन्यातील तिसरा सेट त्यावेळी सुरु होता. तत्पूर्वीच्या दोन सेटमध्ये १-१ अशी बरोबरी होती. दुखापत असह्य झालेला अरमार्गो मैदानात कोसळला तेव्हा डेल पेट्रोने त्याच्याकडे धाव घेतली. त्याला पाणी देवून धीर दिला. पेट्रोच्या या खिलाडूवृत्तीने प्रेक्षक भारावून गेले.अन्य एका सामन्यात तृतीय मानांकित स्टॅनिलास वॉवरिंकाने युक्रेनच्या अ‍ॅलेक्झांडर डोलगोपोलोव याला हरवून तिसरी फेरी गाठली. वॉवरिंकाने या सामन्यात ६-४, ७-६ (७/५), ७-५ असा विजय मिळवला. जपानच्या केई निशिकोरी यानेही अंतिम ३२ खेळाडूंत स्थान मिळवले.महिला गटात चाहत्यांमध्ये लोकप्रिय असलेल्या एग्वाईन बुचार्डचा संघर्ष लॅटिव्हियाच्या अ‍ॅना सेवास्टोवा हिने ६-३, ६-0 असा संपुष्टात आणला. (वृत्तसंस्था)बोपन्ना-डाब्रोवस्की दुसऱ्या फेरीतभारताचा रोहन बोपन्ना आणि कॅनडाची गॅब्रीयला डाब्रोवस्की या जोडीने मिश्र दुहेरीत दुसरी फेरी गाठली. या जोडीने आॅस्ट्रेलियाच्या जेसिका मुरे आणि मॅट रिड यांना पहिल्या फेरीच्या सामन्यात ६-0, ६-१ असे सहज हरवले. त्यांचा पुढील सामना आता न्यूझीलंडच्या अर्टेम सिताक आणि युक्रेनच्या एलिना स्वितोलिना यांच्याशी होईल.हा सामना चुरशीचा होईल अशी मला अपेक्षा होती. क्लिझानने त्याचा नैसर्गिक खेळ केला. त्याचा फोरहँड जबरदस्त असून तो मैदानात कोठेही विनर्स मारु शकतो. जुआन मार्टिन हा अपेक्षेहून चांगला खेळ करीत आहे. त्याच्याकडून मला कठीण आव्हान मिळेल असे समजण्यास हरकत नाही.-अँडी मरे