शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतापाठोपाठ आता 'या' देशालाही रशियन तेलासाठी सूट! ट्रम्प अचानक उदार का झाले?
2
ऑटो कंपन्यांमध्ये खळबळ! २०२८ पासून फक्त इलेक्ट्रीक दुचाकी विकता येणार, दिल्लीत पेट्रोलच्या दुचाकी बॅन होणार
3
Top Marathi News Live: काळजी घ्या, उष्णतेची लाट होरपळून काढणार! IMD चा महाराष्ट्रातील 'या' भागांना सर्तकतेचा इशारा
4
"घराणेशाही वाटेल...", अमोल मिटकरींकडून विधान परिषदेसाठी 'या' नावाची शिफारस; ट्विट करुन केली मागणी
5
पाकिस्तान मध्यस्थ होण्याच्या लायक नाही! इराणने बुरखा फाडला; ट्रम्प म्हणाले, इराणच्या पाईपलाईन्स फुटणार... 
6
Mitali Bag : TMC खासदार मिताली बाग यांच्या कारवर हल्ला; भाजपावर गंभीर आरोप, रडत रडत म्हणाल्या...
7
Mind Soul: थकवा, ताण की राग? तुमच्या प्रत्येक मानसिक समस्येवर आहे आहे एक सोपा उपाय
8
IPL 2026: तर Super Over झालीच नसती..!! पंचाच्या चुकीमुळे LSGवर आली पराभवाची वेळ? काय घडलं
9
भारत-न्यूझीलंडदरम्यान ऐतिहासिक ट्रेड डीलवर शिक्कामोर्तब! ७०% भारतीय सामानांवर ड्युटी नाही, जाणून घ्या
10
टॅक्स बचतीसाठी पत्नीच्या नावे मालमत्ता खरेदी फायद्याची? 'ही' एक गोष्ट तुमच्यासाठी ठरू शकते डोकेदुखी
11
Jara Hatke: शहाळ्याची मलई की गोड पाणी? तुमची निवड कधीच चुकणार नाही; जाणून घ्या सिक्रेट!
12
IPL 2026: अंगक्रिश रघुवंशीने रागाच्या भरात ओलांडली सीमा, BCCIने दिला कठोर कारवाईचा दणका
13
पुढील ५ दिवस देशभरात पावसाचे सावट; ७२ तास तीव्र वादळी वारे वाहणार, हवामान विभागाचा अलर्ट
14
मुंबईत 'त्या' हॉटेलमध्ये भरायचा ‘व्हीआयपी’ दरबार; मनोहरमामाच्या भक्तांची यादी पोलिसांच्या रडारवर
15
'काकी आय लव्ह यू', म्हणणं टवाळखोरांना पडलं महागात, तरुणीने भररस्त्यात शिकवला धडा
16
तेहरानमध्ये भीषण संकट! इंधन टाक्यांच्या स्फोटात ८ कोटी लीटर तेल वाया; राज्यपालांचे नागरिकांना महत्त्वाचे आवाहन
17
आधी बिर्याणी, मग कलिंगड खाल्लं... मुंबईतील एकाच कुटुंबात चौघांचा मृत्यू, घटनेमुळे खळबळ
18
किंडरगार्टनमध्ये घुसत असलेल्या सापाशी भिडला 'काली', प्राण देऊन वाचवला ३० मुलांचा जीव
19
प्रेमासाठी काय पण! फिलिपिन्सच्या तरुणीचा बिहारच्या मुलावर जडला जीव; सातासमुद्रापार आली अन्...
20
अनिल अंबानींच्या 'या' कंपनीचा शेअर ४८% नं वधारला; ३० रुपयांच्या वर पोहोचला स्टॉक, तुमच्याकडे आहे का?
Daily Top 2Weekly Top 5

आयपीएल-८ वरही फिक्सिंगच सावट?

By admin | Updated: April 10, 2015 13:12 IST

आयपीएलच्या ८ व्या पर्वावरही स्पॉट फिक्सिंगचे सावट दिसत असून राजस्थान रॉयल्स संघाच्या खेळाडूला फिक्सिंगची ऑफर देण्यात आली होती.

ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. १०  - दोन वर्षांपूर्वी झालेल्या स्पॉट फिक्सिंगप्रकरणामुळे विवादात सापडलेल्या इंडियन प्रिमिअर लिगच्या ( आयपीएल) सध्या सुरू असलेल्या ८ व्या पर्वावरही स्पॉट फिक्सिंगचे सावट दिसत असल्याचे वृत्त आहे. एका इंग्रजी वृत्तपत्रानुसार राजस्थान रॉयल्स संघाच्या खेळाडूला रणजी ट्रॉफीतील संघ सहका-याने फिक्सिंगची ऑफर दिली होती. याप्रकरणी त्या खेळाडूने बीसीसीआयच्या अ‍ॅन्टी करप्शन विभागाकडे तक्रार केली होती. आता यावर बीसीसीआय काय पाऊल उचलते हे पहावे लागेल. 
आयपीएल ८ मध्ये आजच राजस्थान रॉयल्सचा पहिलाच सामना किंग्स इलेव्हन पंजाबविरोधात रंगणार असून, त्या पार्श्वभूमीवर आलेल्या या बातमीने खळबळ माजली आहे. राजस्थान रॉयल्स संघातील हा खेळाडू मुंबईस्थित असून त्याला रणजी ट्रॉफीतील संघ सहका-याने ही ऑफर दिली. मात्र त्या खेळाडूने ही ऑफर नाकारत एका वरिष्ठ अधिका-याला माहिती दिली आणि त्यांनी तडक अ‍ॅन्टी करप्शन अँड सिक्युरिटी विभागाकडे तक्रार नोंदवली.  
रणजी सामन्यादंरम्यान आपण त्या खेळाडूसोबत ड्रेसिंग शेअर करत होतो. त्याने जेव्हा आपल्याला प्रथम फिक्सिंगची ऑफर दिली , तेव्हा तो मजा करत असावा असे आपल्याला वाटले होते, असे त्या खेळाडूने चौकशी दरम्यान सांगितले. मात्र ठरवून खेळी केल्यास त्यातून मिळणा-या पैशाचा विषय निघताच ती ऑफर सीरिअस असल्याचे आपल्या लक्षात आले असे त्याने सांगितले. याप्रकरणाची माहिती बीसीसीआयच्या वरिष्ठ अधिका-यांनाही देण्यात आली होती, असे वृत्तात नमूद करण्यात आले आहे.