शहरं
Join us  
Trending Stories
1
"प्रेक्षकांचा आवडता संघ नेहमी जिंकेलच असं नाही पण लोकशाहीत...", सचिनचं मतदारांना आवाहन
2
Video: धोनी मॅच संपल्यावर RCBच्या खेळाडूंशी जे वागला, त्यावर विश्वासच बसेना! नेटकऱ्यांनीही केली टीका
3
तुमको मिरची लगी तो मैं क्या करू? ठाण्यासाठी ‘करो या मरो’च्या लढाईला सिद्ध व्हा - देवेंद्र फडणवीस 
4
नाशिकमध्ये निवडणुकीत कोणाला पाठिंबा देणार? मनोज जरांगे पाटलांनी स्पष्टच सांगितलं
5
नातू प्रज्वल रेवण्णावरील आरोपांवर माजी पंतप्रधान देवेगौडा यांनी मौन सोडले; म्हणाले, दोषी आढळला तर...
6
नॅचरल आईस्क्रीमचे संस्थापक रघुनंदन श्रीनिवास कामथ यांचे निधन; वयाच्या ७० व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास 
7
ते कुणालाच नको होते; एकनाथ शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदाबाबत संजय राऊत यांचा नवा दावा
8
MS Dhoniचा मैदानाबाहेर मारलेला षटकार ठरला CSKच्या पराभवाचे कारण? RCBला मॅच जिंकण्यासाठी झाली मदत
9
पुण्यात आलिशान पोर्शे कारने दोघांना चिरडले; तरुण-तरुणी जागीच ठार
10
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रतापराव भोसले यांचे निधन
11
४० कोटींची रोकड सापडली, मोजणी अजूनही पूर्ण नाही... बुटांच्या व्यापाऱ्यांची अफाट संपत्ती
12
राष्ट्रवादीकडे त्यावेळी मुख्यमंत्रीपदासाठी योग्य उमेदवार नव्हता; शरद पवारांनी सगळंच सांगितलं
13
भाजप आरएसएसला संपवायला निघालाय, उद्धव ठाकरे यांचा मुंबईत संयुक्त पत्रकार परिषदेत आरोप
14
मतदानाची टक्केवारी अचानक कशी वाढते? निवडणूक आयोगाने स्पष्ट केली बाजू
15
'छगन भुजबळांना मुख्यमंत्रिपद दिले असते तर पक्ष...'; शरद पवारांचा मोठा गौप्यस्फोट
16
पतंजलीची सोन पापडी गुणवत्ता चाचणीत फेल, सहाय्यक व्यवस्थापकासह तिघांवर कारवाई
17
आनंदवार्ता : यंदा धो-धो बरसणार; मान्सून आज अंदमानात तर ३१ मे रोजी केरळात धडकणार
18
गॅसच्या टँकरचा भीषण स्फोट, आगीत घरे व वाहने भक्ष्यस्थानी; शेलपिंपळगावातील घटना
19
काश्मीरमध्ये निवडणुकीपूर्वी दुहेरी हल्ला; भाजपच्या माजी सरपंचाची गोळ्या झाडून हत्या
20
दिल्लीत महाभ्रष्टाचाऱ्याला इंडी आघाडीने स्वीकारले; काँग्रेसला ४ जागाही लढवता आल्या नाहीत, मोदींचा हल्लाबोल 

Hockey World Cup: टीम इंडिया 48 वर्षांचा दुष्काळ संपवणार? हॉकी वर्ल्डकपमध्ये स्पेनविरूद्ध आज पहिली लढत

By ऑनलाइन लोकमत | Published: January 13, 2023 10:16 AM

Men's Hockey World Cup 2023: पुरुष हॉकी विश्वचषकात भारतीय संघ आपला सलामीचा सामना आज स्पेनविरूद्ध खेळणार आहे. 

राउरकेला : पुरुष हॉकी विश्वचषक 2023 ला आजपासून सुरूवात होत आहे. यजमान भारतीय संघाचा सलामीचा सामना स्पेनशी होणार आहे. हरमनप्रीतच्या नेतृत्वाखालील भारतीय संघ नव्या आव्हानासाठी सज्ज झाला आहे. खरं तर भारतीय संघ यावेळी विजेतेपदाचा प्रबळ दावेदार मानला जात आहे. मात्र, मेन इन ब्ल्यूने या स्पर्धेत मागील 48 वर्षांपासून एकही किताब जिंकला नाही. अशा स्थितीत भारतीय चाहत्यांना टीम इंडियाकडून किताब जिंकण्याची अपेक्षा आहे. भारत आणि स्पेन यांच्यातील सामना राउरकेला येथील बिरसा मुंडा स्टेडियमवर संध्याकाळी 7 वाजता सुरू होईल.

मागील वेळी उपांत्यपूर्व फेरीत झाला होता पराभव ऑलिम्पिकमध्ये 8 सुवर्ण पदक जिंकलेल्या भारतीय संघाने 1975 मध्ये अजितपाल सिंग यांच्या नेतृत्वाखाली एकमेव विश्वचषक जिंकला होता. त्यानंतर संघाला उपांत्यफेरी देखील गाठता आली नाही. याआधी 1971 मध्ये झालेल्या पहिल्या विश्वचषकात भारताने कांस्य आणि 1973 मध्ये रौप्यपदक जिंकले होते. यानंतर 1978 ते 2014 पर्यंत भारताला ग्रुप स्टेजच्या पुढे जाता आले नाही. मागील वेळी देखील भुवनेश्वर येथे झालेल्या विश्वचषकात भारत उपांत्यपूर्व फेरीत नेदरलँड्सकडून पराभूत होऊन बाहेर पडला होता.

पहिल्या दिवशी होणार 4 सामनेस्पर्धेतील पहिला सामना भुवनेश्वरच्या कलिंगा स्टेडियमवर अर्जेंटिना आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात सामना रंगणार आहे. दुसरीकडे दिवसाच्या दुसऱ्या सामन्यात ऑस्ट्रेलियन संघ पूल-अ च्या फ्रान्सशी भिडणार आहे. त्यानंतरचा सामना 21000 प्रेक्षकांची क्षमता असलेल्या बिरसा मुंडा स्टेडियमवर इंग्लंड आणि वेल्स यांच्यात होईल. नंतर दिवसातील शेवटचा सामना भारत आणि स्पेन यांच्यात होईल. कलिंगा स्टेडियमवर या स्पर्धेतील 24 सामने आणि बिरसा मुंडा स्टेडियमवर 20 सामने खेळवले जाणार आहेत.

विश्वचषकासाठी भारतीय संघ - 

  • गोलरक्षक - कृष्ण बहादूर पाठक, पीआर श्रीजेश
  • बचावपटू - जर्मनप्रीत सिंग, सुरेंदर कुमार, हरमनप्रीत सिंग (कर्णधार), वरुण कुमार, अमित रोहिदास (उपकर्णधार), नीलम संजीप
  • मिडफिल्डर - मनप्रीत सिंग, हार्दिक सिंग, नीलकांत शर्मा, समशेर सिंग, विवेक सागर प्रसाद, आकाशदीप सिंग
  • फॉरवर्ड्स - मनदीप सिंग, ललित कुमार उपाध्याय, अभिषेक, सुखजीत सिंग
  • पर्यायी खेळाडू - राजकुमार पाल, जुगराज सिंग 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

टॅग्स :HockeyहॉकीHockey World Cup 2018हॉकी विश्वचषक स्पर्धाTeam Indiaभारतीय क्रिकेट संघ