शहरं
Join us  
Trending Stories
1
"इराण तुम्हाला दोन मिनिटात उद्ध्वस्त करेल", अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प इटलीच्या पंतप्रधान मेलोनींवर भडकले 
2
IPL 2026 : चुकांवर चुका! तरीही CSK नं मारली बाजी; KKR च्या विजयाची पाटी अजूनही कोरीच
3
१८ अश्लील व्हिडीओ, ३९ फोटो आणि ८ तरुणींची पटली ओळख; अमरावतीत अयान अहमदसह साथीदाराने कळस गाठला
4
होर्मुझवरुन इराणसोबत तणाव वाढला! पंतप्रधान मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात ४० मिनिटे चर्चा
5
नूरचं अनोख सेलिब्रेशन! अजिंक्य रहाणे पाठोपाठ IPL मधील महागड्या खेळाडूला स्वस्तात तंबूत धाडले; अन्....
6
'राज्य सरकारचा निर्णय एकतर्फी, लोकशाहीविरोधी', बाजार समिती संचालक मंडळ बरखास्तीवर जयंत पाटील संतापले
7
सरसंघचालक भागवत यांनी घेतली माजी सरन्यायाधीश शरद बोबडे यांची सदिच्छा भेट
8
युद्धाचा मोठा फटका! इराणचं २७० अब्ज डॉलर्सचं नुकसान; या ५ आखाती देशांकडे मागितली भरपाई
9
लोकसभेतील खासदारांची संख्या ८५० पर्यंत वाढणार, महाराष्ट्रातून किती निवडून जाणार? केंद्राने तयार केला मसुदा
10
षटकार खाल्ला, मग Kartik Tyagi नं १४८.१ kmph वेगासह त्रिफळा उडवत घेतला Sanju Samson चा बदला
11
डीआरआयचे 'सिमोल्लंघन'; कोकेन प्रकरणात दिल्ली, बेंगळुरू आणि हैदराबादवर नजर, तस्करांविरुद्ध जोरदार आघाडी
12
मध्य पूर्वेतील तणाव : इटलीचा इस्रायलला मोठा दणका! पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी सर्व संरक्षण करार रोखले
13
शेतकऱ्याने मृत्युला कवटाळले, पोस्टमार्टमसाठी नातेवाईक दोन तास ताटकळले; बीड जिल्ह्यातील घटना
14
CSK साठी डोकेदुखी ठरतोय Ruturaj Gaikwad चा खराब फॉर्म; कमबॅक करण्यासाठी आता एकच मार्ग उरला
15
7 वर्षांपासून बेपत्ता! 10 हजार डॉलर्सचे बक्षीस, 'या' भारतीय विद्यार्थिनीला FBI का शोधतेय? जाणून घ्या...
16
पेट्रोल १८ तर डिझेल ३५ रुपयांनी महागणार?; ५ राज्यांच्या निवडणुकीनंतर दर वाढण्याची शक्यता
17
"मी आंबेडकरांची फॅन आहे", चिन्मयी सुमीतनं स्पष्टच सांगितलेलं 'जय भीम' म्हणण्यामागचं कारण
18
छत्तीसगडमधील वेदांता पॉवर प्लांटमध्ये बॉयलर स्फोटात १० जण ठार, अनेक जण जखमी
19
IPL 2026 : आधी एका रात्रीत दोन 'क्षेपणास्त्र' लॉन्च केली; आता काव्या मारनच्या SRH नं खेळला नवा डाव
20
आरजेडी-जेडीयूमध्ये पंख विस्तारले, भाजपामध्ये येऊन बनले मुख्यमंत्री; कोण आहेत सम्राट चौधरी?
Daily Top 2Weekly Top 5

मुंबई फायनलमध्ये, कोलकातावर 6 गडी राखून मात

By admin | Updated: May 19, 2017 23:37 IST

कोलकातानं दिलेल्या 107 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना मुंबईनं 6 गडी राखून 108 धावा विजय साजरा केला आहे.

ऑनलाइन लोकमतबंगळुरू, दि. 19 - कोलकातानं दिलेल्या 107 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना मुंबईनं 6 गडी राखून 108 धावा करत विजय साजरा केला आहे. मुंबईनं 33 चेंडू बाकी असताना शानदार विजय मिळवत आयपीएल स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक मारली आहे. सामन्याच्या सुरुवातीला मुंबईचीही कामगिरी समाधानकारक नसली तरी मुंबईकडून शर्मा आणि पांड्यानं 54 धावांची भागीदारी केली आहे. पांड्यानं नाबाद खेळीच्या जोरावर 30 चेंडूंत 8 चौकार लगावत 45 धावा केल्या आहेत. तर कर्णधार शर्मानं 1 चौकार आणि 1 षटकार लगावत 26 धावा फडकावल्यात. पटेलनंही 14 धावांची खेळी केली आहे. सिमॉन्स 3, रायडू 6 आणि पोलार्डनं नाबाद राहत 9 धावा केल्या आहेत. कोलकाताकडून यादवनं पटेलचा बळी मिळवला. चावलानं सिमॉन्स आणि रायडू यांना घरचा रस्ता दाखवला आहे. नाइलनं शर्माला बाद करत मुंबईला रोखण्याचा प्रयत्न केला आहे. तत्पूर्वी मुंबई इंडियन्सच्या विरोधात पहिल्यांदा फलंदाजी करणा-या कोलकातानं 18.5 षटकांत सर्व गड्यांच्या मोबदल्यात 107 धावा केल्या होत्या. कोलकाताकडून सूर्यकुमार यानं 31 तर इशांक जग्गीनं 28 धावा बनवल्या होत्या. मुंबईकडून कर्ण शर्मानं 4 गडी, तर जसप्रीत बुमराहनं 3 बळी मिळवले होते. सहाव्या विकेटसाठी इशांक जग्गी आणि सूर्यकुमार यांनी 56 धावांची भागीदारी केली होती.

नाणेफेक हरल्यानंतर फलंदाजीसाठी मैदानावर आलेल्या कोलकाताची सुरुवात अत्यंत निराशाजनक झाली होती. कोलकातानं दुस-याच षटकात पहिला बळी गमावला होता. बुमराहनं भेदक गोलंदाजीच्या जोरावर ख्रिस लिन(4)ला घरचा रस्ता दाखवला. त्यानंतर मुंबईच्या कर्ण शर्माच्या गोलंदाजीवर पार्थिव पटेलनं यष्टिचीत करत सुनील नारायण(24)चा बळी मिळवला. मैदानावर आलेल्या उथप्पाला एक धावेवर समाधान मानून माघारी परतावं लागलं आहे. बुमराहनं रॉबिन उथप्पाला (1) पायचीत केलं.सातव्या षटकांत मुंबईच्या कर्ण शर्मानं फिरकीच्या जोरावर दोन चेंडूंत दोन बळी घेऊन कोलकाताला नामोहरम केले होते. सातव्या षटकांत कर्णच्या गोलंदाजीवर गौतम गंभीर(12) हार्दिक पंड्याकरवी झेलबाद झाला. त्यानंतर पुढच्याच चेंडूवर कर्ण शर्मानं कोलिन ग्रँडहोम याला शून्यावरच बाहेरचा रस्ता दाखवला. सहावा बळीही कर्ण शर्मानंच मिळवला. कर्णनं 15व्या षटकांत इशांक जग्गी(28)ला मिशेल जॉनसनकरवी झेलबाद केले. जग्गीनं 31 चेंडूंत 3 चौकार लगावले. अखेर कोलकाताचा पराभव करत मुंबईनं अंतिम फेरीत प्रवेश केला आहे.