शहरं
Join us  
Trending Stories
1
शिवाजीराव, तुमचे शिक्षण किती, पूर्वायुष्य काय..? मंत्री मुश्रीफ यांचे प्रत्युत्तर
2
जबलपूर हादरले! वादळामुळे बर्गी धरणात क्रूझ उलटली; ४० पैकी ५ जणांचे मृतदेह सापडले
3
धिरेंद्र कृष्ण शास्त्रीचा खरात होऊ शकतो! त्यांनी दिव्यशक्ती सिद्ध करावी, १० व्यक्ती अन् १०...; शाम मानव यांचं आव्हान
4
Exit Poll 2026: टुडेज चाणक्यचा एक्झिटपोल आला...! भाजपचं वादळ, ममतांसोबत 'खेला'; धक्कादायक आहे आकडेवारी
5
GT vs RCB : रजत पाटीदारच्या विकेटवरुन वाद; विराट कोहलीनं पंचांसोबत घातली हुज्जत! नेमकं काय घडलं?
6
म्हाडाने लॉटरीतील १२२१ घरांच्या किंमती ७.५ टक्क्यांनी कमी केल्या
7
जर कच्चे तेल नाही मिळाले तर चीन होर्मुझ ताब्यात घेणार? अमेरिकेच्या हातातून बाजी निसटणार, इराण अन्...
8
आता आरपारची लढाई! मोज्तबा खामेनेईंचा ट्रम्प यांना सज्जड इशारा; म्हणाले "समुद्रात गाडून टाकू..."
9
GT vs RCB : किंग कोहलीनं ५ चेंडूत केली गेलच्या विक्रमाशी बरोबरी; रबाडानं असा घेतला बदला (VIDEO)
10
रील स्टार पाटलाचा कारनामा, १२ वर्षांपूर्वीच्या अपहरण-खून प्रकरणाचा गुन्हे शाखेने केला उलगडा
11
“शिंदेंकडून मलाही ऑफर, पण मी फडणवीसांचा निष्ठावान कार्यकर्ता”; रवी राणांचा मोठा खुलासा
12
बुद्ध पौर्णिमा-पुष्टिपती विनायक जयंती २०२६: ९ राशींची इच्छा पूर्ण अन् धनलाभ; काळजी दूर होईल!
13
"उद्धव ठाकरेंनी स्वतःचा राजकीय बळी न देता.."; विधानपरिषद निवडणुकीवरून भाजपची घणाघाती टीका
14
‘मिसिंग लिंक’ नाव कसे पडले? ‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ची विशेष मार्गिका, वैशिष्ट्ये आहेत खास!
15
डाव उलटा पडलाय! प्रतिष्ठा जपायची असेल तर हार्दिक पांड्याला संघाबाहेर काढा; दिग्गजाचा MI ला सल्ला
16
पश्चिम बंगालच्या एक्झिट पोलवर CM ममता बॅनर्जी यांची पहिली प्रतिक्रिया; TMC ला किती जागा मिळणार? केली मोठी भविष्यवाणी
17
“पवारांविरुद्ध लढणार नाही”; सुप्रिया सुळेंच्या विधानावर सुनेत्रा पवारांचे एका वाक्यात भाष्य
18
"वादळ येतंय, कुणीही रोखू शकणार नाही!" डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने जगात खळबळ; नक्की संकेत कसले?
19
ओलाला गाशा गुंडाळावा लागणार! ओबेन रोर इवो इलेक्ट्रिक बाईक लाँच; १८० किमी रेंज आणि हायटेक फीचर्स, किंमत फक्त ९९,९९९ रुपये
20
Tech Tips : उन्हात तुमचा फोन होऊ शकतो टाइम बॉम्ब! 'या' एका चुकीमुळे स्मार्टफोन कायमचा होईल खराब
Daily Top 2Weekly Top 5

विजय मिळविणे अंतिम लक्ष्य : ताहिर

By admin | Updated: March 24, 2016 01:27 IST

आमच्या संघात उत्कृष्ट गोलंदाज असल्याने खेळपट्टीचे स्वरूप कसे असेल याची चिंता बाळगण्याचे कारण नाही. महत्त्वाच्या सामन्यात विजय हेच अंतिम लक्ष्य असेल असे

नागपूर : आमच्या संघात उत्कृष्ट गोलंदाज असल्याने खेळपट्टीचे स्वरूप कसे असेल याची चिंता बाळगण्याचे कारण नाही. महत्त्वाच्या सामन्यात विजय हेच अंतिम लक्ष्य असेल असे द. आफ्रिकेचा फिरकी गोलंदाज इम्रान ताहिर याचे मत आहे.सरावानंतर व्हीसीएच्या जामठा मैदानावर पत्रकारांशी बोलताना ताहिर म्हणाला,‘ विश्वचषकाच्या पहिल्या सामन्यात इंग्लंडविरुद्ध २२९ धावा केल्यानंतरही पराभवाचा सामना करावा लागला. अफगाणिस्तानविरुद्धच्या दुसऱ्या सामन्यात विजय मिळविल्याने उपांत्य फेरीच्या आशा कायम आहेत.’ विजयासाठी मात्र कष्ट घ्यावे लागले अशी कबुली ताहिरने दिली.विंडीजविरुद्ध विजयच हवापहिल्या दोन्ही सामन्यात फलंदाज व गोलंदाजांनी आपापली जबाबदारी पार पाडली. वेस्ट इंडिजविरुद्धची लढत आमच्यासाठी अतिशय महत्त्वाची आहे. या सामन्यात आम्ही पूर्ण ताकदीने खेळणार असून चुका टाळण्यावर भर असेल. वेस्ट इंडिज संघात ख्रिस गेल व अनेक आक्रमक फलंदाज आहेत. त्यांना रोखण्याची जबाबदारी गोलंदाजांची राहील. भेदक मारा व दमदार फलंदाजीच्या बळावर विजय मिळण्यात यश मिळेल यात शंका नसल्याचे ताहिरने स्पष्ट केले.खेळपट्टीची चिंता नाहीनागपूर येथील खेळपट्टीबद्दल विचारले असता ताहिर म्हणाला, खेळपट्टी फिरकीपटूंना मदत करीत असल्याबद्दल चर्चा सुरू असून अशा खेळपट्टीवर मारा करणे आवडेल. नोव्हेंबर महिन्यात याच स्टेडियमवर आम्ही कसोटी सामना खेळलो. त्या सामन्यात पराभव स्वीकारावा लागला होता. कसोटी आणि टी-२० सामन्यात फवरक असल्याचे ताहिरने स्पष्ट केले.ड्युमिनी संघाबाहेरअष्टपैलू खेळाडू जे.पी. ड्युमिनी पाठीच्या दुखापतीमुळे ‘अनफिट’ असून विंडीजविरुद्ध खेळणार नसल्याचे स्पष्ट करीत ताहिर म्हणाला, ड्युमिनी खेळत नसल्यामुळे संघाला काही प्रमाणात चिंता आहे. मात्र, संघातील इतर युवा खेळाडूंना प्रतिभा सिद्ध करण्याची सुवर्णसंधी मिळणार असून ज्यांना संधी मिळेल, त्यांनी जबाबदारी सांभाळावी. स्वत:च्या कामगिरीवर समाधान व्यक्त करीत इम्रान ताहिरने विश्वकरंडकात देशाचे प्रतिनिधित्व करणे, माझ्यासाठी अभिमानाची व गौरवाची बाब आहे. सर्वात मोठ्या स्पर्धेसाठी मला विशेष तयारी करावी लागली नाही असेही ताहिरने सांगितले. (क्रीडा प्रतिनिधी)