शहरं
Join us  
Trending Stories
1
दिवाळी एकत्र साजरी करू, पण अजित पवारांना पुन्हा पक्षात नो एंट्री; शरद पवारांनी परतीचे दरवाजे बंद केले...
2
सुप्रियाने पवार-सुळे असे नाव लावले असते तर..? शरद पवारांनी सांगितला तिने घेतलेला एक निर्णय...
3
भाजपाची चौथ्या-पाचव्या टप्प्यासाठी मोठी तयारी! जे.पी. नड्डा आज निवडणुकीचा आढावा घेणार
4
आजचे राशीभविष्य - ०९ मे २०२४ : आर्थिक फायदा संभवतो,विवाहेच्छुकांचे विवाह ठरू शकतील
5
महागाईवर सर्वात खळबळजनक रिपोर्ट; तीन वर्षांत कुटुंबांची घरगुती बचत ९ लाख कोटींनी घटली
6
साताऱ्याच्या बदल्यात राज्यसभा मिळाली! पार्थ पवारांना दिल्लीत पाठविण्यावर अजित पवारांचे मोठे संकेत
7
...म्हणून दक्षिण मुंबईची जागा लढवली नाही; मनसे नेते बाळा नांदगावकर यांचा खुलासा
8
अदानी-अंबानींकडून टेम्पाेने पैसा आला का? मोदींच्या सवालावर राहुल गांधींचे चोख प्रत्युत्तर...
9
नावात काय आहे? विचारत हायकोर्टाने फेटाळल्या नामांतराविरोधातील याचिका
10
कर्मचारी सुट्टीवर; विमाने जमिनीवर; ‘एअर इंडिया एक्स्प्रेस’ची ९० उड्डाणे रद्द
11
मी ठाण मांडून बसलो, म्हणजे करेक्ट कार्यक्रम होणार: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
12
शाळेत अ‍ॅडमिशन मिळणार का? न्यायालयात स्थगितीनंतर आरटीई ऑनलाइन अर्जाला ब्रेक, पालक अस्वस्थ 
13
हेड, अभिषेकने घातला धुमाकूळ; लखनौचा पाडला फडशा; हैदराबादचा १० गड्यांनी दणदणीत विजय
14
तीन वर्षांनंतर भारतात खेळणार नीरज; राष्ट्रीय फेडरेशन चषक स्पर्धेची उत्सुकता शिगेला
15
पूर्वेकडचे लोक चिनी, दक्षिणेतील आफ्रिकींसारखे; सॅम पित्रोदा यांचे वादग्रस्त उद्गार; काँग्रेसने घेतला राजीनामा
16
राज्यात लोकसभेनंतर रंगणार शिक्षक, पदवीधर निवडणूक; १० जूनला मतदान, १३ जूनला निकाल
17
महादेव ॲपशी निगडित १ हजार कोटी शेअर्समध्ये? बनावट कंपन्यांद्वारे गुंतवणुकीचा संशय
18
महिनाभरात २२ लाख वाहनांची विक्री; २७ टक्के वाढ;  देशभरातील खरेदीदारांमध्ये प्रचंड उत्साह
19
टेनिस बॉल क्रिकेटमधून शिकलो ‘सुपला शॉट’; सूर्यकुमार यादवने सांगितली आठवण; आपसूक मारला जातो हा फटका
20
काँग्रेसची धुळधाण हीच खरी देशभक्ती; एकनाथ शिंदेंची संगमनेरात जोरदार टीका

Fifa World Cup 2022 India: फीफा वर्ल्ड कपमध्ये का खेळत नाही भारत? एकदा संधी मिळाली होती पण...

By ऑनलाइन लोकमत | Published: November 09, 2022 12:18 PM

२० नोव्हेंबर पासून फीफा विश्वचषकाचा थरार रंगणार आहे.

नवी दिल्ली : आता जगभर सर्वत्र फीफा विश्वचषकाचे वारे वाहू लागले आहे. या नामांकित स्पर्धेचा थरार २० नोव्हेंबरपासून रंगणार आहे. जगातील सर्वात मोठ्या क्रीडा स्पर्धांपैकी एक म्हणून FIFA विश्वचषकाची ओळख आहे. कतारचे यजमानपद असलेल्या या स्पर्धेचा अंतिम सामना १८ डिसेंबर रोजी होणार आहे. फुटबॉल विश्वातील दिग्गज लिओनेल मेस्सी, ख्रिस्तियानो रोनाल्डो यांसारख्या महान खेळाडूंसाठी ही स्पर्धा शेवटची ठरण्याची शक्यता आहे. 

फीफा विश्वचषक २०२२ मध्ये एकूण ३२ संघ सहभागी होत आहेत, मात्र यामध्ये नेहमीप्रमाणे भारताला स्थान मिळाले नाही. कारण भारतीय संघ पुन्हा एकदा फीफा विश्वचषकाची पात्रता फेरी गाठण्यामध्ये अपयशी झाला. सुनील छेत्रीच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाला पात्रता फेरीतच दुसऱ्या फेरीत पराभवाचा सामना करावा लागला होता. मात्र कतार, सौदी अरेबिया, इराण, जपान, आणि दक्षिण कोरिया या आशियातील संघांना सहभागी होण्याची संधी मिळाली आहे. लक्षणीय बाब म्हणजे भारताने देखील एकदा या फुटबॉल विश्वचषकात जागा मिळवली होती मात्र एका कारणामुळे संघाचे ते स्वप्न स्वप्नच राहिले. 

शूज घालूनच खेळण्याची दिली होती परवानगी१९५० साली ब्राझीलमध्ये झालेल्या विश्वचषकासाठी भारत पात्र ठरला होता, तरीही संघाला सहभाग घेता आला नव्हता. यामागील सर्वात मोठे कारण म्हणजे तेव्हा भारतीय खेळाडूंना अनवाणी पायाने फुटबॉल खेळण्याची सवय होती, जी त्यांच्यासाठी घातक ठरली. मोहम्मद अब्दुल सलीम नावाचा भारतीय फुटबॉलपटू त्याच्या काळात स्कॉटिश फुटबॉल क्लब 'सेल्टिक'साठी अनवाणी पायाने हा खेळ खेळायचा. फीफाच्या नियमांनुसार, खेळाडूंना विश्वचषकात शूज घालूनच खेळायचे होते, परंतु भारतीय खेळाडूंना शूज घालून खेळण्याची सवय नव्हती. त्यामुळे त्यावेळेसही भारताला विश्वचषकापासून दूर राहावे लागले होते. 

तेव्हापासून स्वप्न स्वप्नच राहिलेदुसरे कारण असेही सांगण्यात आले की हा सामना परदेशी मैदानावर होणार असल्याने भारतीय फुटबॉल संघटनेने तसेच सरकारने खर्च उचलण्यास नकार दिला होता. विशेष बाब म्हणजे फीफा भारतीय संघाचा खर्च उचलण्यास तयार असतानाही भारताला या स्पर्धेत सहभागी होता आले नव्हते. संघातील निवडीवरून वाद, सरावाचा अभाव ही देखील सहभागी न होण्याची कारणे ठरली आहेत. 

रॅंकिंगच्या बाबतीत भारत खराब स्थितीतदरम्यान, भारतातील फुटबॉल चाहत्यांसाठी खेदाची बाब म्हणजे १९५०च्या विश्वचषकापासून भारतीय संघ पुन्हा एकदाही या मेगा टूर्नामेंटसाठी पात्र ठरू शकला नाही. फीफाच्या क्रमवारीतही भारतीय फुटबॉल संघाची स्थिती खराब असून सध्या संघ क्रमवारीत १०६व्या स्थानावर आहे. अर्थात टॉप-१०० मध्येही भारताचा समावेश नाही. 

यावेळी विजेत्या संघावर होणार पैशांचा पाऊसअलीकडेच फीफा विश्वचषकाची बक्षीस रक्कम देखील जाहीर करण्यात आली आहे. यावेळी संपूर्ण विश्वचषकात वाटण्यात येणारी बक्षीस रक्कम सुमारे ३,५८५ कोटी एवढी निश्चित करण्यात आली आहे. यामध्ये विश्वचषक विजेत्या संघाला ४२ मिलियन म्हणजेच सुमारे ३४२ कोटी रूपये मिळणार आहेत. मागील अर्थात २०१८च्या विश्वचषक स्पर्धेच्या तुलनेत ही रक्कम ४ मिलियन डॉलरहून अधिक आहे.   सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

टॅग्स :Fifa World Cup 2018फिफा विश्वचषक २०१८FootballफुटबॉलSunil Chhetriसुनील छेत्रीIndiaभारतQatarकतार