शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांची मोठी घोषणा...! 'या' देशांना दिली जाणार टॅरिफ सूट, नवा कार्यकारी आदेश जारी
2
पाकिस्तानात क्रिकेट सामन्यादरम्यानच मैदानात बॉम्बस्फोट; एकाचा मृत्यू, अनेक जखमी
3
भारत-रशिया-चीन एकत्र बघून NATOचं टेन्शन वाढलं? युक्रेन युद्धासंदर्भात 'या' नेत्याचं मोठं विधान!
4
आता रशिया-युक्रेन युद्ध थांबणार? पंतप्रधान मोदींची फ्रान्सच्या अध्यक्षांसोबत चर्चा; मॅक्रॉन म्हणाले...!
5
ओबीसींचा महामोर्चा काढणार, दोन पातळ्यांवर लढणार; काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा निर्धार
6
...अन् हिटमॅन रोहित शर्मानं चाहत्यांना हात जोडून केली विनंती; नेमकं काय घडलं? व्हिडिओ व्हायरल
7
विसर्जनासाठी गेलेला 'गणेश' गिरणा पात्रात वाहून गेला, आई-वडिलांच्या डोळ्यासमोरच तरुण मुलगा बुडाला... 
8
गुजरातमधील पंचमहल यथे मोठा अपघात; पावागडमध्ये रोपवे कोसळला, 6 जणांचा मृत्यू
9
भाईंदरमध्ये गणेश मंडळाच्या कार्यकर्त्याचा शॉक लागून मृत्यू 
10
“PM मोदींच्या नेतृत्वाखालील सक्षम, नवीन भारत आपले परराष्ट्र धोरण स्वतः ठरवतो”: CM फडणवीस
11
एकनाथ शिंदे यांनी घेतली शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद यांची भेट; म्हणाले, “अभिमानास्पद...”
12
गोपाळ शेट्टींसह मेहता, गुप्ता, मिश्रा अन् शर्मा यांच्यावर मुंबई भाजपानं दिली मोठी जबाबदारी
13
फक्त ३ वर्षांत दिला ५३२% परतावा, आता कंपनीला मिळाली ₹३,००,००,००० ची ऑरडर; ₹१०० पेक्षाही स्वस्त आहे शेअर!
14
Asia Cup Record : सचिन तेंडुलकर भारताचा 'नंबर वन ऑलराउंडर'; जयसूर्याची तर गोष्टच न्यारी
15
अमेरिका निघाली होती रशियाला पंगू बनवायला, आता स्वतःवरच आली अंडी खरेदीची वेळ! ३२ वर्षांत पहिल्यांदाच...
16
CM फडणवीसांकडून ग्रीन सिग्नल मिळताच अजित पवार गटाला बसणार झटका?; भाजपा आमदार लागले कामाला
17
राज ठाकरेंना मिळणार खास मान...यंदाचा शिवसेनेचा 'दसरा मेळावा' ठाकरे बंधू गाजवणार?
18
जीएसटी कमी झाल्यानंतर, किती रुपयांवर येईल Maruti Baleno? किती रुपयांचा होईल फायदा? जाणून घ्या
19
जगातील सगळ्यात महागडी शाळा; वर्षाची फी तब्बल १,१३,७३,७८० रुपये! आहे तरी कुठे नक्की?
20
चंद्रग्रहण २०२५: तुमच्या राशीनुसार करा ‘हे’ दान, धनवान बनाल; कल्याण होईल, सुख-सुबत्ता लाभेल

खेळाडू ‘हनी ट्रॅप’मध्ये अडकण्याची भीती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 15, 2015 01:38 IST

भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) खेळाडूने सट्टेबाजांच्या जाळ्यात न फसण्याचा सल्ला दिला आहे. त्यात प्रामुख्याने सुंदर ललनांपासून दूर राहण्याची सूचना केलेली आहे.

मुंबई : इंडियन प्रीमिअर लीगची (आयपीएल) प्रतिमा सुधारणे आणि स्पर्धेत सहभागी होणाऱ्या खेळाडूंचा सट्टेबाजीपासून बचाव करण्यासाठी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) खेळाडूने सट्टेबाजांच्या जाळ्यात न फसण्याचा सल्ला दिला आहे. त्यात प्रामुख्याने सुंदर ललनांपासून दूर राहण्याची सूचना केलेली आहे. आयपीएलमध्ये सट्टेबाजी व स्पॉट फिक्सिंगचे वृत्त पुढे आल्यानंतर बीसीसीआयने कडक पाऊल उचलले आहे. या स्पर्धेत सहभागी होणाऱ्या खेळाडूंनी सावधगिरी बाळगणे गरजेचे आहे. बीसीसीआयच्या भ्रष्टाचारविरोधी समितीच्या सदस्यांनी सर्व आठ संघांच्या खेळाडूंसोबत बैठक घेतली आणि त्यांना सट्टेबाज व त्यांच्या नव्या चालींमध्ये न अडकण्याचा सल्ला दिला आहे. गेल्या आठवड्यात राजस्थान रॉयल्सच्या एका खेळाडूसोबत मुंबईतील त्याच्या निवासस्थानी सट्टेबाजांनी संपर्क साधला, असे वृत्त आले होते. त्यानंतर बीसीसीआयने सट्टेबाजांना रोखण्यासाठी कडक पाऊल उचललेले आहे. दरम्यान, बोर्डाने यात सामील असलेल्या खेळाडूंची नावे जाहीर केलेली नाहीत. याबाबत बोलताना आयपीएलच्या एका फ्रॅन्चायझीच्या अधिकाऱ्याने नाव उघड न करण्याच्या अटीवर सांगितले की, बीसीसीआयने खेळाडूंना सट्टेबाजांच्या जाळ्यात न अडकण्याचा सल्ला दिला आहे. अधिकारी पुढे म्हणाले, ‘बीसीसीआयच्या भ्रष्टाचारविरोधी व सुरक्षा समितीच्या (एसीएसयू) सदस्यांनी खेळाडूंसोबत बैठक घेतली आणि सट्टेबाज खेळाडूंना जाळ्यात अडकवण्यासाठी नव्या योजना आखत असल्याचे सांगितले. त्यात सुंदर मुलींच्या माध्यमातून जाळ्यात अडकवण्याचा प्रयत्न होत असल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले. विशेषत: प्रथमच आयपीएल स्पर्धेत सहभागी होत असलेल्या युवा खेळाडूंनी सावधगिरी बाळगणे गरजेचे आहे.’ दरम्यान, बीसीसीआयने यापूर्वीही खेळाडूंना ‘हनी ट्रॅप’मध्ये न फसण्याबाबत सूचना केली होती, पण राजस्थान रॉयल्सच्या एका खेळाडूसोबत अलीकडेच सट्टेबाजांनी संपर्क साधल्याच्या वृत्तानंतर बोर्डाने कडक पाऊल उचलण्याची तयारी केली असून, खेळाडूंना सावधगिरी बाळगण्याचा सल्ला दिला आहे. सट्टेबाज खेळाडूंसोबत संपर्क साधण्यासाठी सुंदर मुलींचा आधार घेतात. त्या पार्श्वभूमीवर गेल्या वर्षी आयपीएल खेळाडूंना बीसीसीआयने सावधगिरी बाळगण्याचा सल्ला दिला होता. आयपीएल सुरू होण्याच्या एक आठवडापूर्वी संपलेल्या आयसीसी विश्वकप स्पर्धेदरम्यानही खेळाडूंना अनोळखी सुंदर मुलींपासून दूर राहण्याचा सल्ला देण्यात आला होता. बीसीसीआयच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अनेकदा सट्टेबाज खेळाडूंचे चाहते असल्याचे भासवताना त्यांच्या खासगी जीवनात स्थान मिळवतात आणि त्यानंतर खेळाडूंना नवे-नवे प्रलोभन दाखवत आपल्या जाळ्यात ओढण्याचा प्रयत्न करतात. सुंदर मुलींच्या माध्यमातून सट्टेबाज खेळाडूंना आपल्या जाळ्यात ओढतात आणि त्यानंतर त्यांना स्पॉट फिक्सिंग व सट्टेबाजीसाठी बाध्य करतात. (वृत्तसंस्था)च्बीसीसीआयच्या एका अधिकाऱ्याने याबाबत बोलताना सांगितले की, ‘सट्टेबाजीचा समूळ नायनाट करण्यासाठी बोर्डातर्फे कडक पावले उचलली जात आहेत. क्रिकेट बोर्ड सट्टेबाजीचा नायनाट करण्यासाठी प्रयत्नशील आहे.’ च्यापूर्वी राजस्थान रॉयल्सच्या एका खेळाडूसोबत सट्टेबाजाने संपर्क साधल्याच्या वृत्तानंतर आयपीएल चेअरमन राजीव शुक्ला यांनी खेळाडूंना सावधगिरी बाळगण्याचे व सट्टेबाजांबाबतची सूचना बोर्डाला देण्याचे आवाहन केले आहे.