शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालमध्ये निवडणूक निकालापूर्वीच 'हायव्होल्टेज ड्रामा'! स्ट्राँग रूम बाहेर पोहोचल्या CM ममता, EVM सोबत छेडछाडीचा आरोप
2
शिवाजीराव, तुमचे शिक्षण किती, पूर्वायुष्य काय..? मंत्री मुश्रीफ यांचे प्रत्युत्तर
3
'प्रिन्स'च्या विकेटनंतर 'किंग'चा जल्लोष; पण शेवटी RCB ला पराभवाचा धक्का देत GT नं मारली बाजी!
4
रिलायन्सचा मोठा धमाका! अंबानींनी खरेदी केली प्रियांका चोप्राची कंपनी अन् तिलाच बनवलं 'बॉस'; संपूर्ण कंट्रोल कुणाकडे राहणार?
5
जबलपूर हादरले! वादळामुळे बर्गी धरणात क्रूझ उलटली; ४० पैकी ५ जणांचे मृतदेह सापडले
6
Bhuvneshwar Kumar: बुमराहपेक्षा भारी ठरला भुवी! असा पराक्रम करणारा पहिला भारतीय जलदगती गोलंदाज
7
तो, ती आणि खळबळजनक पोस्ट! IPL मधील स्टार क्रिकेटर मैदानाबाहेरील गोष्टीमुळे चर्चेत, काय आहे प्रकरण?
8
धिरेंद्र कृष्ण शास्त्रीचा खरात होऊ शकतो! त्यांनी दिव्यशक्ती सिद्ध करावी, १० व्यक्ती अन् १०...; शाम मानव यांचं आव्हान
9
Exit Poll 2026: टुडेज चाणक्यचा एक्झिटपोल आला...! भाजपचं वादळ, ममतांसोबत 'खेला'; धक्कादायक आहे आकडेवारी
10
GT vs RCB : रजत पाटीदारच्या विकेटवरुन वाद; विराट कोहलीनं पंचांसोबत घातली हुज्जत! नेमकं काय घडलं?
11
म्हाडाने लॉटरीतील १२२१ घरांच्या किंमती ७.५ टक्क्यांनी कमी केल्या
12
जर कच्चे तेल नाही मिळाले तर चीन होर्मुझ ताब्यात घेणार? अमेरिकेच्या हातातून बाजी निसटणार, इराण अन्...
13
आता आरपारची लढाई! मोज्तबा खामेनेईंचा ट्रम्प यांना सज्जड इशारा; म्हणाले "समुद्रात गाडून टाकू..."
14
GT vs RCB : किंग कोहलीनं ५ चेंडूत केली गेलच्या विक्रमाशी बरोबरी; रबाडानं असा घेतला बदला (VIDEO)
15
रील स्टार पाटलाचा कारनामा, १२ वर्षांपूर्वीच्या अपहरण-खून प्रकरणाचा गुन्हे शाखेने केला उलगडा
16
“शिंदेंकडून मलाही ऑफर, पण मी फडणवीसांचा निष्ठावान कार्यकर्ता”; रवी राणांचा मोठा खुलासा
17
बुद्ध पौर्णिमा-पुष्टिपती विनायक जयंती २०२६: ९ राशींची इच्छा पूर्ण अन् धनलाभ; काळजी दूर होईल!
18
"उद्धव ठाकरेंनी स्वतःचा राजकीय बळी न देता.."; विधानपरिषद निवडणुकीवरून भाजपची घणाघाती टीका
19
‘मिसिंग लिंक’ नाव कसे पडले? ‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ची विशेष मार्गिका, वैशिष्ट्ये आहेत खास!
20
डाव उलटा पडलाय! प्रतिष्ठा जपायची असेल तर हार्दिक पांड्याला संघाबाहेर काढा; दिग्गजाचा MI ला सल्ला
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्याचा आत्महत्येचा प्रयत्न !

By admin | Updated: October 9, 2015 01:19 IST

सततची नापिकी, त्यावर कोरड्या दुष्काळाचा मारा व सावकाराकडून घेतलेल्या कर्जाची परतफेड कशी होणार,

रुपेरा शिवारातील घटना : कर्जबाजारीपणाला कंटाळून केली कृतीतुमसर : सततची नापिकी, त्यावर कोरड्या दुष्काळाचा मारा व सावकाराकडून घेतलेल्या कर्जाची परतफेड कशी होणार, या विवंचनेत असलेल्या एका ५५ वर्षीय शेतकऱ्याने विष प्राशन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. ही घटना ६ ला दुपारी १ वाजताच्या दरम्यान रुपेरा येथे घडली. देवदास मारोती कावळे (५५) रा.मिटेवानी ता.तुमसर असे आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या शेतकऱ्याचे नाव आहे.देवदास कावळे यांच्याकडे साधारणत: अडीच ते तीन एकर शेतजमीन आहे. त्यात तो धानाचीच शेती करून त्यावर तो व त्याचे कुटुंब उदरनिर्वाह करीत होते. मात्र गत तीन वर्षांपासून सततची नापिकी होत होती. यावर्षी चांगले या आशेपोटी शेतकरी कामाला लागला. मात्र यावर्षीही पावसाने दगा दिला. देवदासने तुमसर येथील सावकारी दुकानदाराकडे घरातले २२ ग्रॅम सोने गहाण ठेवून पैशाची उचल केली. ही बाब त्याचकडे मिळालेल्या चिट्ठीवरून लक्षात आली. परंतु सावकाराचे कर्ज कसे फेडायचे या विवंचनेत असताना देवदास कावळे तुमसर येथे आला व तिथून तो हरदोली (सिहोरा) येथे उतरून पायवाटे रुपेराकडे जात असताना रुपेरा जंगलातील एका लिंबाच्या झाडाच्या आडोशाला बसून त्याने विष प्राशन केले. यावेळी शेतशिवारात पाणी देण्याकरिता आलेल्या एका महिलेने ही बाब बघितली. ही वार्ता घरच्यांना सांगितली. सिहोरा पोलिसांना माहिती मिळताच ते घटनास्थळी दाखल झाले. त्यावेळी देवदास जीवीत होता. लगेच त्याला उपचारार्थ येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र प्रकृती गंभीर असल्याने त्याला भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालयात हलविण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला. मात्र देवदासचे कोणतेही नातेवाईक नसताना प्रमोद तितीरमारे, बाळा ठाकूर यांनी सामाजिक बांधिलकी दाखवून त्याला सामान्य रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले. तपास सिहोरा पोलीस ठाण्याचे पोलीस हवालदार विजय डोंगरे करीत आहेत. (शहर प्रतिनिधी)