शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमध्ये इराणचा सापळा! ६ महिने तेलपुरवठा ठप्प होण्याची भीती, जागतिक अर्थव्यवस्थेसमोर मोठे आव्हान
2
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
3
लग्नाहून परतणाऱ्या वऱ्हाड्यावर काळाचा घाला; व्हॅनला अपघात, पाच जणांचा मृत्यू
4
संजूचं नाबाद शतक! गोलंदाजीत अकिलचा इम्पॅक्टफुल 'चौकार'; MI च्या घरच्या मैदानात CSK चा विक्रमी विजय
5
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
6
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व कुटुंबियांना सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओद्वारे धमकी; नागपुरातील आरोपीविरोधात गुन्हा दाखल
7
लैंगिक शोषणामुळे पत्नी बनली मनोरुग्ण; न्याय मागणाऱ्या पतीवर वेडा होण्याची पाळी
8
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
9
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
10
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
11
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
12
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
13
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
14
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
15
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
16
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
17
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
18
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
19
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
20
Travel : निसर्गाची मुक्त हस्ताने उधळण! भारताच्या 'या' ४ सुंदर ठिकाणांपुढे स्वित्झर्लंडही पडेल फिके
Daily Top 2Weekly Top 5

भारतीय संघाच्या शिबिरात सर्वांचे लक्ष हरभजनवर

By admin | Updated: June 7, 2015 12:31 IST

भारतीय कसोटी क्रिकेट संघ बांगलादेशाच्या छोट्या दौऱ्याआधी ट्रेनिंग शिबिरासाठी जेव्हा ईडन गार्डन्सच्या मैदानात पाऊल ठेवेल तेव्हा

कोलकाता : भारतीय कसोटी क्रिकेट संघ बांगलादेशाच्या छोट्या दौऱ्याआधी ट्रेनिंग शिबिरासाठी जेव्हा ईडन गार्डन्सच्या मैदानात पाऊल ठेवेल तेव्हा सर्वांचे लक्ष असणार आहे ते दोन वर्षांनंतर संघात पुनरागमन करणाऱ्या हरभजनसिंगवर.भारताचा सर्वांत यशस्वी आॅफस्पिनर हरभजनसिंगने त्याचा याआधीचा कसोटी सामना हैदराबाद येथे आॅस्ट्रेलियाविरुद्ध २०१३ मध्ये खेळला होता. आता त्याला १० ते १४ जूनदरम्यान बांगलादेशात होणाऱ्या एकमेव कसोटीसाठी रवींद्र जडेजाच्या स्थानी भारतीय संघात स्थान देण्यात आले आहे.विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील भारतीय कसोटी संघ येथे पोहोचला आहे. हरभजनसिंगचे पुनरागमन आणि नियमित आॅफस्पिनर रवीचंद्रन आश्विन याच्या उपस्थितीत कोहली फतुल्लाह येथे होणाऱ्या एकमेव कसोटी सामन्यात दोन आॅफस्पिनरला मैदानात उतरवतो का हे पाहणे रोचक असणार आहे.विशेष म्हणजे कसोटी सामन्यासाठी कोणत्याही सिनिअर खेळाडूला विश्रांती देण्यात आलेली नाही. या दौऱ्यासाठी संघाचे संचालक रवी शास्त्री यांना कायम ठेवण्यात आलेले आहे. मधल्या फळीतील फलंदाज चेतेश्वर पुजारा इंग्लंडमध्ये कौंटी चॅम्पियनशिपमध्ये यॉर्कशायरकडून खेळल्यानंतर आता बांगलादेशमध्ये भरीव कामगिरी करण्यास आतुर असेल. भारतीय संघाचे फिटनेस आणि ट्रेनिंग शिबीर काल सकाळी होणार होते; परंतु उष्ण हवामानामुळे ते स्थगित करण्यात आले होते, असे बंगाल क्रिकेट संघटनेच्या अधिकाऱ्याने सांगितले. याशिवाय बीसीसीआय अध्यक्ष जगमोहन दालमिया यांच्या निवासस्थानी प्रथमच नवनियुक्त क्रिकेट सल्लागार समितीची बैठक आयोजित करण्यात आली आहे. (वृत्तसंस्था)