युरो चषक : रशियाचा ३-० ने धुव्वा

By Admin | Updated: June 21, 2016 18:59 IST2016-06-21T18:59:04+5:302016-06-21T18:59:04+5:30

गारेथ बेल याने स्पर्धेतील तिसरा गोल नोंदवत वेल्स संघाला रशियाविरुद्ध ३-० ने विजय मिळवून दिला. याबरोबराच त्यांनी यूरो कप फुटबाल स्पर्धेच्या ब गटात

Euro Cup: Russia beat 3-0 | युरो चषक : रशियाचा ३-० ने धुव्वा

युरो चषक : रशियाचा ३-० ने धुव्वा

>ऑनलाइन लोकमत
तौलोस (फ्रांस), दि. 21 -  गारेथ बेल याने स्पर्धेतील तिसरा गोल नोंदवत वेल्स संघाला रशियाविरुद्ध ३-० ने विजय मिळवून दिला. याबरोबराच त्यांनी यूरो कप फुटबाल स्पर्धेच्या ब गटात अंतिम १६ मध्ये स्थान निश्चित केले आहे. सुरुवातीपासून वेल्स संघ आक्रमक होता. पहिल्या हाफध्ये आरोन रॅमसी तसेच नील टेलर यांनी प्रत्येकी एक गोल नोंदवून राशियाला सामन्यात पुनरागमन करण्याच्या आशेला धक्का दिला होता. त्यांचा आत्मविश्वासही डगमगला. रॅमसीने ११ व्या मिनिटाला आणि टेलरने २० व्या मिनिटाला गोल नोंदवून वेल्सला २-० अशी भक्कम आघाडी मिळवून दिली होती. पहिल्या हाफध्ये रशियाला एकही गोल नोंदवता आला नाही. दुस-या हाफध्येही रशियाने सर्व प्रयत्न केले मात्र वेल्सचा बचाव भेदणे त्यांना कठीण गेले. स्पर्धेत आतापर्यंत सर्वाधिक गोल नोदवणा-या वेल्सच्या गारेथ बेल याने ६७ व्या मिनिटाला गोल नोंदवला आणि विजयावर शिक्कामोर्तब केले. त्यानंतर रशियाचे सर्व प्रयत्न फोल ठरले.

Web Title: Euro Cup: Russia beat 3-0