शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
2
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
3
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
4
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
5
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
6
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
7
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
8
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
9
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
10
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
11
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
12
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
13
राज्यात 20 ते 22 एप्रिल दरम्यान वादळी पावसाची शक्यता, 'या' जिल्ह्यांना इशारा, शेतकऱ्यांना आवाहन 
14
"अभी तो मैं जवान हूँ..." फिटनेस किंग कोहलीची कमाल! २१ मीटर धावत येऊन KL राहुलच्या खेळीला लावला ब्रेक
15
क्रूरतेचा कळस! सख्ख्या भावावर कुऱ्हाडीने वार; मृतदेहाचे केले ९ तुकडे, थरकाप उडवणारी घटना
16
मोठी कारवाई! नोएडा हिंसाचार प्रकरणातील मास्टरमाइंड आदित्य आनंदला तामिळनाडूतून अटक
17
WWE नाही मनमाडच्या स्थानकावरील Video! अंगावर शहारे येतील, रेल्वेच्या ओव्हरहेड इलेक्ट्रिक खांबावर चढला माथेफिरू 
18
नाशिक TCS प्रकरण: निदा खान मुंब्र्यातील हॉस्पिटलमध्ये दोनदा आलेली; डॉक्टरांचा मोठा खुलासा, अटकपूर्व जामिनासाठी धडपड
19
जितेश शर्माला आपल्या क्रिजमध्ये पाहून क्रुणाल पांड्या गोंधळला; Run Out झाल्यावर रागही काढला (VIDEO)
20
होर्मुझच्या सामुद्रधुनीत जहाजांवर गोळीबार! इराणचा आक्रमक पवित्रा; पुन्हा युद्धाची ठिणगी?
Daily Top 2Weekly Top 5

द. आफ्रिकेकडून इंग्लंडचा सफाया

By admin | Updated: February 23, 2016 03:16 IST

काइल अ‍ॅबोटचे ३ बळी आणि अ‍ॅबी डिव्हिलियर्स व हाशिम आमला यांची १२५ धावांची सलामी या बळावर दक्षिण आफ्रिकेने इंग्लंडविरुद्ध दुसरा ट्वेंटी-२0 सामना ९ गडी राखून जिंकताना दोन

जोहान्सबर्ग : काइल अ‍ॅबोटचे ३ बळी आणि अ‍ॅबी डिव्हिलियर्स व हाशिम आमला यांची १२५ धावांची सलामी या बळावर दक्षिण आफ्रिकेने इंग्लंडविरुद्ध दुसरा ट्वेंटी-२0 सामना ९ गडी राखून जिंकताना दोन सामन्यांची मालिका २-0 अशी जिंकली व इंग्लंडचा सफाया केला.दक्षिण आफ्रिकेने नाणेफेक जिंकून इंग्लंडला प्रथम फलंदाजीची संधी दिली. त्यानंतर पाहुण्या संघाने १९.४ षटकांत १७१ धावा केल्या. लक्ष्याचा पाठलाग करताना यजमान संघाने ३२ चेंडू राखून फक्त १ गडी गमावत १४.४ षटकांत १७२ धावा करीत विजय मिळवला.दक्षिण आफ्रिकेकडून डिव्हिलियर्सने तडाखेबंद फलंदाजी करताना २९ चेंडूंत ६ चौकार आणि ६ षटकारांची उधळण करताना ७१ धावा ठोकल्या. अमलाने ३८ चेंडूंत ८ चौकार आणि ३ षटकारांसह नाबाद ६९ धावा केल्या. या दोघांनी सलामीसाठी १२५ धावांची महत्त्वपूर्ण भागीदारी केली. डिव्हिलियर्सला आदिल रशीदने जो रुटकरवी झेलबाद करीत दक्षिण आफ्रिकेला पहिला व एकमेव धक्का दिला.अमलाने दुसऱ्या विकेटसाठी कर्णधार फाफ डू प्लेसिस याच्या साथीने ४७ धावांची नाबाद भागीदारी करीत संघाला विजय मिळवून दिला. प्लेसिसने ३१ चेंडूंत २ चौकार मारत नाबाद २0 धावांचे योगदान दिले.त्याआधी इंग्लंडच्या पाच फलंदाजांना दुहेरी आकडी धावसंख्यादेखील गाठता आली नाही. त्यांच्याकडून रुटने ३४, कर्णधार इयॉन मॉर्गनने ३८ आणि यष्टिरक्षक जोस बटलरने ५४ धावांची खेळी करताना इंग्लंडचा डाव सावरला. बटलरने २८ चेंडूंत ४ चौकार व ४ षटकार मारले.दक्षिण आफ्रिकेकडून अ‍ॅबोटने २६ धावांत ३ गडी बाद केले. कॅगिसो रबादाने २८ आणि ख्रिस मॉरीसने ३३ धावांत प्रत्येकी २ गडी बाद केले. इम्रान ताहीरने १ गडी बाद केला. ताहीर मालिकावीर, तर डिव्हिलियर्स सामनावीर किताबाचा मानकरी ठरला.संक्षिप्त धावफलकइंग्लंड : १९.४ षटकांत सर्वबाद १७१. (जोस बटलर ५४, जो रुट ३४, मॉर्गन ३८, अ‍ॅबोट ३/२६, कॅगिसो २/२८, मॉरिस २/३३).दक्षिण आफ्रिका : १४.४ षटकांत १ बाद १७२. (डिव्हिलियर्स ७१, अमला नाबाद ६९, आदिल रशीद १/३0)