शहरं
Join us  
Trending Stories
1
"इराण तुम्हाला दोन मिनिटात उद्ध्वस्त करेल", अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प इटलीच्या पंतप्रधान मेलोनींवर भडकले 
2
IPL 2026 : चुकांवर चुका! तरीही CSK नं मारली बाजी; KKR च्या विजयाची पाटी अजूनही कोरीच
3
१८ अश्लील व्हिडीओ, ३९ फोटो आणि ८ तरुणींची पटली ओळख; अमरावतीत अयान अहमदसह साथीदाराने कळस गाठला
4
होर्मुझवरुन इराणसोबत तणाव वाढला! पंतप्रधान मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात ४० मिनिटे चर्चा
5
नूरचं अनोख सेलिब्रेशन! अजिंक्य रहाणे पाठोपाठ IPL मधील महागड्या खेळाडूला स्वस्तात तंबूत धाडले; अन्....
6
'राज्य सरकारचा निर्णय एकतर्फी, लोकशाहीविरोधी', बाजार समिती संचालक मंडळ बरखास्तीवर जयंत पाटील संतापले
7
सरसंघचालक भागवत यांनी घेतली माजी सरन्यायाधीश शरद बोबडे यांची सदिच्छा भेट
8
युद्धाचा मोठा फटका! इराणचं २७० अब्ज डॉलर्सचं नुकसान; या ५ आखाती देशांकडे मागितली भरपाई
9
लोकसभेतील खासदारांची संख्या ८५० पर्यंत वाढणार, महाराष्ट्रातून किती निवडून जाणार? केंद्राने तयार केला मसुदा
10
षटकार खाल्ला, मग Kartik Tyagi नं १४८.१ kmph वेगासह त्रिफळा उडवत घेतला Sanju Samson चा बदला
11
डीआरआयचे 'सिमोल्लंघन'; कोकेन प्रकरणात दिल्ली, बेंगळुरू आणि हैदराबादवर नजर, तस्करांविरुद्ध जोरदार आघाडी
12
मध्य पूर्वेतील तणाव : इटलीचा इस्रायलला मोठा दणका! पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी सर्व संरक्षण करार रोखले
13
शेतकऱ्याने मृत्युला कवटाळले, पोस्टमार्टमसाठी नातेवाईक दोन तास ताटकळले; बीड जिल्ह्यातील घटना
14
CSK साठी डोकेदुखी ठरतोय Ruturaj Gaikwad चा खराब फॉर्म; कमबॅक करण्यासाठी आता एकच मार्ग उरला
15
7 वर्षांपासून बेपत्ता! 10 हजार डॉलर्सचे बक्षीस, 'या' भारतीय विद्यार्थिनीला FBI का शोधतेय? जाणून घ्या...
16
पेट्रोल १८ तर डिझेल ३५ रुपयांनी महागणार?; ५ राज्यांच्या निवडणुकीनंतर दर वाढण्याची शक्यता
17
"मी आंबेडकरांची फॅन आहे", चिन्मयी सुमीतनं स्पष्टच सांगितलेलं 'जय भीम' म्हणण्यामागचं कारण
18
छत्तीसगडमधील वेदांता पॉवर प्लांटमध्ये बॉयलर स्फोटात १० जण ठार, अनेक जण जखमी
19
IPL 2026 : आधी एका रात्रीत दोन 'क्षेपणास्त्र' लॉन्च केली; आता काव्या मारनच्या SRH नं खेळला नवा डाव
20
आरजेडी-जेडीयूमध्ये पंख विस्तारले, भाजपामध्ये येऊन बनले मुख्यमंत्री; कोण आहेत सम्राट चौधरी?
Daily Top 2Weekly Top 5

मॉर्गनच्या खेळीने इंग्लंड विजयी

By admin | Updated: September 8, 2014 02:32 IST

कर्णधार इयान मॉर्गनच्या (३१ चेंडू, ७१ धावा) आक्रमक अर्धशतकी खेळीच्या जोरावर इंग्लंडने एकमेव टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामन्यात आज, रविवारी भारताचा ३ धावांनी पराभव केला

बर्मिंहॅम : कर्णधार इयान मॉर्गनच्या (३१ चेंडू, ७१ धावा) आक्रमक अर्धशतकी खेळीच्या जोरावर इंग्लंडने एकमेव टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामन्यात आज, रविवारी भारताचा ३ धावांनी पराभव केला. इंग्लंडने मॉर्गन व अ‍ॅलेक्स हेल्स (२५ चेंडू, ४० धावा) यांनी दिलेल्या उल्लेखनीय योगदानाच्या जोरावर ७ बाद १८० धावांची मजल मारली आणि प्रत्युुत्तरात खेळणाऱ्या भारताचा डाव ५ बाद १७७ धावांत रोखला. विराट कोहलीची (६६) अर्धशतकी खेळी अखेर व्यर्थच ठरली. कर्णधार महेंद्रसिंग धोनीने १८ चेंडूंमध्ये नाबाद २७ धावा फटकाविल्या; पण अखेरच्या दोन षटकांत त्याने तीनदा अंबाती रायडूसोबत एकेरी धाव घेण्यास नकार दिला. डेथ ओव्हरमधील गोलंदाजी उभय संघातील फरक स्पष्ट करणारी ठरली. इंग्लंडने अखेरच्या पाच षटकांमध्ये ८१ धावा वसूल केल्या, तर भारतीय संघाला केवळ ४२ धावा करता आल्या. यापूर्वी, भारताला कसोटी मालिकेत १-३ ने पराभव स्वीकारावा लागला होता, तर वन-डे सामन्यांच्या मालिकेत भारताने ३-१ ने सरशी साधली. लक्ष्याचा पाठलाग करताना भारताची सुरुवात निराशाजनक झाली. सलामीवीर अजिंक्य रहाणे (८) फिरकीपटू मोईन अलीचे लक्ष्य ठरला. त्यानंतर धवन (२८) व कोहली यांनी ८.५ षटकांत दुसऱ्या विकेटसाठी ७९ धावांची भागीदारी करीत डाव सावरला. धवन माघारी परतल्यानंतर कोहलीने रैनाच्या साथीने तिसऱ्या विकेटसाठी ४.१ षटकांत ४२ धावांची भागीदारी केली. भारताला अखेरच्या चार षटकांत विजयासाठी केवळ ४० धावांची गरज होती. गुर्नेने रैनाचा (२५) त्रिफळा उडवीत भारताचा डाव अडचणीत आणला. अखेरच्या षटकात भारताला विजयासाठी १७ धावांची गरज होती. धोनीने व्होक्सच्या षटकात पहिल्या चेंडूवर षटकार ठोकला, तर चौथ्या चेंडूवर चौकार वसूल केला; पण संघाला विजय मिळवून देण्यात त्याचे प्रयत्न अपुरेच पडले. भारताला अखेरच्या चेंडूवर विजयासाठी पाच धावांची गरज होती; पण त्यावर केवळ एक धाव घेता आली. त्याआधी, इयान मॉर्गनच्या (७१ धावा, ३१ चेंडू, ३ चौकार, ७ षटकार) अर्धशतकी खेळीच्या जोरावर इंग्लंडने ७ बाद १८० धावांची दमदार मजल मारली. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारणाऱ्या इंग्लंडला जेसन रॉय (८) व अ‍ॅलेक्स हेल्स (४०) यांनी चांगली सुरुवात करून दिली. रॉय व त्यानंतर मोईन अली (०) एकापाठोपाठ माघारी परतल्यानंतर, हेल्सने जो रुटच्या (२६) साथीने तिसऱ्या विकेटसाठी ४८ धावांची भागीदारी करीत डाव सावरला. हेल्स व रुट १० धावांच्या अंतरात माघारी परतले. जम बसल्यानंतर इयान मॉर्गनने भारतीय गोलंदाजांचा खरपूस समाचार घेत अर्धशतकी खेळी साकारली. मॉर्गनच्या अर्धशतकी खेळीत ३ चौकार व ७ षटकारांचा समावेश आहे. भारतातर्फे मोहम्मद शमी सर्वाधिक यशस्वी गोलंदाज ठरला. त्याने ३८ धावांच्या मोबदल्यात ३ बळी घेतले. मोहित शर्मा, कर्ण शर्मा व रवींद्र जडेजा यांनी प्रत्येकी १ बळी घेतला. इंग्लंडतर्फे या लढतीत जेसन रॉय व भारतातर्फे कर्ण शर्मा यांनी पदार्पणाची संधी मिळाली. भारताने वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमारला विश्रांती देताना मोहित शर्माला खेळविण्याचा निर्णय घेतला. (वृत्तसंस्था)