शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
2
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
3
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
4
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
5
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
6
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
7
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
8
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
9
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
10
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
11
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
12
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
13
राज्यात 20 ते 22 एप्रिल दरम्यान वादळी पावसाची शक्यता, 'या' जिल्ह्यांना इशारा, शेतकऱ्यांना आवाहन 
14
"अभी तो मैं जवान हूँ..." फिटनेस किंग कोहलीची कमाल! २१ मीटर धावत येऊन KL राहुलच्या खेळीला लावला ब्रेक
15
क्रूरतेचा कळस! सख्ख्या भावावर कुऱ्हाडीने वार; मृतदेहाचे केले ९ तुकडे, थरकाप उडवणारी घटना
16
मोठी कारवाई! नोएडा हिंसाचार प्रकरणातील मास्टरमाइंड आदित्य आनंदला तामिळनाडूतून अटक
17
WWE नाही मनमाडच्या स्थानकावरील Video! अंगावर शहारे येतील, रेल्वेच्या ओव्हरहेड इलेक्ट्रिक खांबावर चढला माथेफिरू 
18
नाशिक TCS प्रकरण: निदा खान मुंब्र्यातील हॉस्पिटलमध्ये दोनदा आलेली; डॉक्टरांचा मोठा खुलासा, अटकपूर्व जामिनासाठी धडपड
19
जितेश शर्माला आपल्या क्रिजमध्ये पाहून क्रुणाल पांड्या गोंधळला; Run Out झाल्यावर रागही काढला (VIDEO)
20
होर्मुझच्या सामुद्रधुनीत जहाजांवर गोळीबार! इराणचा आक्रमक पवित्रा; पुन्हा युद्धाची ठिणगी?
Daily Top 2Weekly Top 5

इंग्लंडची दुसऱ्या डावात घसरगुंडी

By admin | Updated: January 7, 2016 00:12 IST

दक्षिण आफ्रिकेने दुसऱ्या कसोटी सामन्याच्या पाचव्या दिवशी अंधुक प्रकाशामुळे खेळ थांबला तेव्हा इंग्लंडचे ६ फलंदाज तंबूत धाडले आहेत

केपटाऊन : दक्षिण आफ्रिकेने दुसऱ्या कसोटी सामन्याच्या पाचव्या दिवशी अंधुक प्रकाशामुळे खेळ थांबला तेव्हा इंग्लंडचे ६ फलंदाज तंबूत धाडले आहेत. तथापि, त्यानंतरही या लढतीची वाटचाल अनिर्णीत अवस्थेकडे सुरू आहे.इंग्लंडने दुसऱ्या डावात अंधुक प्रकाशामुळे खेळ थांबला तेव्हा ६ बाद १५९ धावा केल्या असून, त्यांनी १६१ धावांची आघाडी घेतली आहे. अखेरच्या सत्रात ३१ षटके टाकणे बाकी आहेत. दोन्ही संघांनी पहिल्या डावात ६00 पेक्षा जास्त धावा केल्या. विशेष म्हणजे पहिल्या चार दिवसांत १३ विकेटस् गमावून १,२७२ धावा ठोकल्या गेल्या; परंतु अखेरचा दिवशी गोलंदाजांनी निरस सामना रोमहर्षक बनवला.अ‍ॅलेस्टर कुक आणि अ‍ॅलेक्स हेल हे दिवसाच्या पहिल्या तीन षटकांतच तंबूत परतले. दोघांनी कालच्या धावसंख्येत एकाही धावेची भर घातली नाही. कुकने ८ तर हेल्सने ५ धावा केल्या. कागिसो रबादाने कुकला यष्टिरक्षक क्विंटन डी कॉककरवी झेलबाद करीत दक्षिण आफ्रिकेला पहिले यश मिळवून दिले. त्यानंतर मोर्ने मॉर्कलच्या चेंडूंवर तिसऱ्या स्लीपमध्ये ख्रिस मॉरीसने हेल्सचा शानदार झेल टिपला.जो रुटने २९ चेंडूंत २९ धावा केल्या; परंतु मॉरीसने डावाच्या त्याच्या पहिल्याच चेंडूंवर जो रुट याला त्रिफळाबाद केले. रुट १७ धावांवर सुदैवी ठरला होता. तेव्हा मॉर्कलच्या गोलंदाजीवर स्लीपमध्ये अ‍ॅबी डिव्हिलियर्सने त्याचा झेल टिपला; परंतु तो नो बॉल ठरला. निक कॉम्पटनदेखील ६0 चेंडूंत १५ धावा केल्यानंतर फिरकी गोलंदाज डेन पीटच्या चेंडूवर फाफ डु प्लेसिसच्या हाती झेल देऊन बसला. इंग्लंडने दुसऱ्या सत्रात बेन स्टोक्स व जेम्स टेलर यांच्या विकेटस् गमावल्या. पहिल्या डावात २५८ धावा करणारा स्टोक्स २६ धावा केल्यानंतर पीटच्या गोलंदाजीवर हवेत खेळण्याच्या प्रयत्नात मिडविकेट सीमारेषेवर झेल देऊन बाद झाला. पीटच्या पुढच्या षटकांत टेलरदेखील शॉर्टलेगवर तेंबा बावुमाच्या हाती झेल देऊन तंबूत परतला. टेलरने ३७ धावा केल्या. त्या वेळेस संघाची धावसंख्या ६ बाद ११६ अशी झाली. त्यानंतर जॉनी बेयरस्टा (नाबाद ३0) आणि मोईन अली (नाबाद १0) यांनी चहापानापर्यंत संघाचे आणखी नुकसान होऊ दिले नाही.(वृत्तसंस्था)संक्षिप्त धावफलक : इंग्लंड ६ बाद ६२९ (घोषित). दुसरा डाव ६५ षटकांत ६ बाद १५९. (बेयरस्टा खेळत आहे ३0, जो रुट २९, टेलर २७, स्टोक्स २६, मोईन अली खेळत आहे १0. पीट ३/३८, मॉर्कल १/२६, रबाडा १/५७, मॉरीस १/२४). दक्षिण आफ्रिका (पहिला डाव) ७ बाद ६२७ (घोषित).