लाजीरवाणे...भारताच्या पराभवानंतर चाहत्यांनी केली तोडफोड

By Admin | Updated: March 26, 2015 18:34 IST2015-03-26T18:14:07+5:302015-03-26T18:34:24+5:30

सेमीफायनलमध्ये भारताचा दारुण पराभव झाल्यानंतर भारतीय संघाच्या चाहत्यांनी तोडफोड करुन संताप व्यक्त केला आहे.

Embarrassed ... After the defeat of the fans, the fanatics broke up | लाजीरवाणे...भारताच्या पराभवानंतर चाहत्यांनी केली तोडफोड

लाजीरवाणे...भारताच्या पराभवानंतर चाहत्यांनी केली तोडफोड

ऑनलाइन लोकमत

कानपूर, दि. २६ - सेमीफायनलमध्ये भारताचा दारुण पराभव झाल्यानंतर भारतीय संघाच्या चाहत्यांनी तोडफोड करुन संताप व्यक्त केला आहे. गोरखपूर व कानपूर येथे समर्थकांनी टीवी फोडले असून काही ठिकाणी अनुष्का शर्मा व विराट कोहलीचे पोस्टर्सही जाळण्यात आली आहे. या घटनांनंतर पोलिस यंत्रणाही सतर्क झाल्या असून कर्णधार महेंद्रसिंग धोनी, रोहित शर्मा आदी खेळाडूंच्या निवासस्थानाबाहेरील पोलिस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे.  

वर्ल्डकपमध्ये सलग सात सामने जिंकणा-या भारताचा विजयीरथ गुरुवारी ऑस्ट्रेलियाने रोखला. ऑस्ट्रेलियाकडून पराभव स्वीकारावा लागताच भारतीय संघाच्या समर्थकांनी संतप्त प्रतिक्रिया द्यायला सुरुवात केली आहे. सोशल मिडीयावर भारतीय फलंदाजांवर असभ्य भाषेत टीका होत असतानाच आता रस्त्यावर उतरुन चाहते संताप व्यक्त करत आहे. गोरखपूर व कानपूरमध्ये चाहत्यांनी टीव्ही संच फोडले. तसेच विराट व अनुष्काविरोधात घोषणाबाजी करत त्यांचे पोस्टर्सही जाळली. 

 

Web Title: Embarrassed ... After the defeat of the fans, the fanatics broke up