क्रीडा महासंघांची आर्थिक स्थिती ढासळली;जगभरातील क्रीडा संघटना अडचणीत
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 3, 2020 06:47 IST2020-04-03T00:37:02+5:302020-04-03T06:47:16+5:30
कोरोना व्हायरस महामारीमुळे टोकियो आॅलिम्पिक स्थगित व क्रीडा स्पर्धा ठप्प झाल्यामुळे आंतरराष्ट्रीय क्रीडा महासंघांची आर्थिक स्थिती प्रभावित होत आहे.

क्रीडा महासंघांची आर्थिक स्थिती ढासळली;जगभरातील क्रीडा संघटना अडचणीत
लुसाने : कोरोना व्हायरस महामारीमुळे टोकियो आॅलिम्पिक स्थगित व क्रीडा स्पर्धा ठप्प झाल्यामुळे आंतरराष्ट्रीय क्रीडा महासंघांची आर्थिक स्थिती प्रभावित होत आहे. अनेक असे खेळ आहेत की जे आॅलिम्पिकचा भाग आहे आणि आपल्या कमाईसाठी आंतरराष्ट्रीय आॅलिम्पिक समितीकडून (आयओसी) प्रत्येक चार वर्षांनी मिळणाऱ्या धनराशीवर अवलंबून आहेत.
एका प्रमुख आंतरराष्ट्रीय महासंघाच्या अधिकाºयाने म्हटले की, ‘स्थिती तणावपूर्ण व निराशाजनक आहे. मूल्यांकन करण्यात येईल, अनेकांची नोकरी धोक्यात आहे.’
टोकियो आॅलिम्पिकमध्ये २८ आंतरराष्ट्रीय क्रीडा महासंघ उपस्थित राहणार होते आणि त्यांना आयओसीकडून पुरेशी रक्कमही मिळणार होती. पण स्पर्धा २०२१ पर्यंत स्थगित झाल्यामुळे त्यांना आता ही रक्कम मिळू शकणार नाही.
आंतरराष्ट्रीय उन्हाळी खेळ संघटनेच्या महासंघाचे (एएसओआयएफ) महासचिव अॅण्ड्र्यू रेयान म्हणाले, ‘आमचे अनेक आंतरराष्ट्रीय महासंघ आहेत. त्यांच्याकडे पुरेसा पैसा आहे, पण अन्य महासंघ वेगळ्या प्रकारच्या व्यावसायिक पद्धतीने चालतात. त्यांच्या मिळकतीचा मुख्य स्रोत क्रीडा स्पर्धा असते आणि या स्पर्धा सध्या ठप्प आहेत. जर त्यांच्याकडे पुरेसा पैसा नसेल तर त्यांना अडचणींना सामोरे जावे लागले. आंतरराष्ट्रीय महासंघाना पैसा पुरविण्यासाठी एएसओआयफ जबाबदार असते.
टोकिया आॅलिम्पिकमध्ये समावेश करण्यात आलेले कराटे, सर्फिंग, स्केटबोर्डिग, क्लाइंबिंग आणि बेसबॉल-सॉफ्टबॉल रक्कम मिळविण्यास पात्र नाहीत. (वृत्तसंस्था)
पंच गोळा करत आहेत निधी
मुंबई : कोरोना व्हायरसमुळे क्रिकेट सामने होत नसल्याने पूर्णपणे क्रिकेटवर अवलंबून असलेले स्थानिक पंच व स्कोअरर यांना आर्थिक संकटांना सामोरे जावे लागत आहे. अशा स्थितीत मुंबई क्रिकेट संघटनेच्या (एमसीए) व्यवस्थापन समितीतील माजी सदस्य व बीसीसीआयचे माजी पंच गणेश अय्यर यांच्या नेतृत्वाखाली पंचाचा एक गट त्यांच्यासाठी आशेचा किरण ठरला आहे.क्रिकेटवर उपजिविका असलेला पंच व स्कोअररसाठी या गटाने एक निधी उभारला आहे.